शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुप्टाचे तीव्र निदर्शने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुप्टाचे तीव्र निदर्शने माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन; प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी - शरद मगर बीड : महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन (मुप्टा) बीड जिल्हा शाखेच्या वतीने प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड येथे तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण विभागाकडे सादर करून प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. मुप्टाच्या वतीने इयत्ता ११ वी व १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी सध्या असलेली ३० विद्यार्थ्यांची बॅच रद्द करून पूर्वीप्रमाणे २० विद्यार्थ्यांची बॅच कायम ठेवावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच बीड जिल्ह्यातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची थकीत वेतन देयके तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय देयके, वरिष्ठ वेतनश्रेणी फरक, निवडश्रेणी फरक तसेच सातवा वेतन आयोग फरक यांचा समावेश आहे. शिक्षण विभागातील वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या प्रलंबित संचिका तात्काळ मंजूर कराव्यात, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ आयडीच्या शिफारस प्रस्तावांचा तातडीने निपटारा करावा, जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे त्वरीत समायोजन करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. सन २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांची बंद करण्यात आलेली जीपीएफ खाती पूर्ववत करून नियमित कपात सुरू करावी. सातव्या वेतन आयोगातील फरकाचा पाचवा हप्ता रोखीने द्यावा. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पर्यंतची जीपीएफ खाते स्लिप वितरित करून जीपीएफ खाती ऑनलाइन करण्यात यावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे. याशिवाय प्रचलित अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यात यावा आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. यावेळी मुप्टा बीड जिल्हाध्यक्ष शरद मगर आणि जिल्हासचिव शशिकांत जावळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सर्व पदाधिकारी ज्युनियर विभाग चे जिल्हाध्यक्ष नारायण घोलप, जिल्हा सचिव प्रा.संजय बागुल, माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार तरकसे, माध्यमिक विभाग जिल्हा सचिव प्राचार्य श्री श्रीकांत वारभुवन, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद साळवे ,प्रवीणकुमार डावरे उपप्राचार्य चांगण एन एस, प्रा संजय काकडे ,शेख मसूर अन्वर, अमित वाघमारे, राऊत अमोल, लेंडाळ एसडी ,घोडके ए एस ,घायाळ एचबी ,काझी एम एस आर ,पवार बी बी, चौधरी के एम ,पाटील बी पी गुरव जी एच, सोळंके जे ए हावळे आर एन ,चौरे डी पी , कुटे एस टी ,राठोड पी एम, डोंगरे आर आर ,खटाने बी आर, जरे ए बी ,राऊत एस एस ,जगताप यु एस ,जोगदंड डी पी, मुंडे एन एस ,मोरे सुनील ,वीर एस बी,जाधव के जी,डोंगरे एस डी,शिरसट व्ही ए ,बिक्कड डी आर,काळे पी आर ,तांदळे एल आर,पोकळे डीबी ,शेळके जे ,कंधारे आर एस ,सवासे ए आर ,गवते एन के ,जरांगे डी एस ,सावंत बी व्ही,पठाण एस एन,गचांडे एस ए ,शिंदे डी एस,आदी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

- बीड वकील संघ सचिव नितीन शिंदे तर कोषाध्यक्ष पदी विद्या गायकवाड यांची निवड झाल्याने केला भव्य सत्कार बीड २८(प्रतिनिधी)बीड वकील संघाचे महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी कोषाध्यक्ष विद्या गायकवाड सचिव नितीन शिंदे यांचा बीड वकील संघ 2026 च्या निवडणुकीत विजयी प्रतिनिधी यांचा पेढे भरवुन भव्य सत्कार ॲड सुनिल साळवे व अँड महेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक वकील बांधव व भगीणी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड वकील संघाच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या मत मोजणी द्वारा घोषीत महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी 8 मताने तर सचिव नितीन शिंदे २३ मताने व कोषाध्यक्ष म्हणुन विद्या गायकवाड 25 मताने विजयी झाल्या , या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड सुनील साळवे यांनी विशेष परीश्रम घेतले .1
- ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. २६ ऑगस्ट २०२६ रोजी बीड येथील जालना रोडवरील विठ्ठल साई प्रतिष्ठान येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर भेटलेल्या बालपणीच्या मैत्रिणींनी शालेय जीवनातील जुन्या आणि सोनेरी आठवणींना उजाळा दिला. संसाराच्या व्यापातून स्वतःसाठी एक दिवस सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी नागापुरे (कळसकर) यांच्या विशेष पुढाकाराने या अनोख्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लग्नानंतर संसाराच्या व्यापात आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या महिलांना एक दिवस स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगता यावा, हा यामागचा प्रमुख उद्देश होता. यासाठी कुमशी, घोसापुरी आणि नामलगाव परिसरातील १९९०-९१ या बॅचच्या (इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वी) माजी विद्यार्थिनींना एकत्र आणण्यात आले. खेळ, शिदोरी आणि मनमोकळ्या गप्पा तब्बल साडेतीन दशकांनंतर भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. या सर्वजणींनी संपूर्ण दिवस एकमेकींना गजरे लावून, सुख-दुःखाच्या गप्पा मारत आणि मनमोकळेपणाने संवाद साधत (शेअरिंग करून) बालपणातील ते दिवस पुन्हा अनुभवले. या मेळाव्यातील काही खास क्षण: पारंपरिक खेळ: या वयातही महिलांनी शाळेच्या मैदानावर खेळले जाणारे खो-खो, आंधळी कोशिंबीर आणि पायदोड यांसारखे पारंपरिक खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला. सहभोजन: प्रत्येकीने घरून आणलेली 'शिदोरी' एकत्र करून सर्वजणींनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. रक्षाबंधन व स्नेहभेट: मैत्रिणींनी एकमेकींना राखी बांधून मैत्रीचे हे अतूट नाते अधिक घट्ट केले आणि एकमेकींना स्नेहभेटही दिली. या आनंददायी आणि भावपूर्ण मेळाव्याला मीरा बांड, शिवकन्या बांड, शारदा शेळके, किस्किनदा बांड, मंगल करपे, कांता शिंदे, उषा जाधव, शालिनी नेरे, दैवशाला डोळस आणि रुक्मिणी नागापुरे आदी माजी विद्यार्थिनींची प्रमुख उपस्थिती होती. ३५ वर्षांनंतरचा हा मेळावा सर्वांसाठीच एक अविस्मरणीय अनुभव ठरला.2
- धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* *धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* मुंबई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुंबई येथे आपल्या भगिनी मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री आदिती ताई तटकरे तसेच पुणे येथे सौ. प्रमिलाताई पुरुषोत्तम केंद्रे यांच्या कडून राखी बांधून रक्षा बंधन साजरे केले आहे. तीनही बहिणींकडून राखी बांधून तिघींच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा तसेच कायम जनतेची सेवा घडावी, अशा शुभेच्छा धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणींना दिल्या. पंकजाताई मुंडे, प्रमिलाताई केंद्रे तसेच आपल्या सर्व बहिणी यांच्याबरोबरच आदितीताई तटकरे यांच्या समवेत धनंजय मुंडे हे दरवर्षी न चुकता रक्षा बंधन साजरे करतात, ही परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे.2
- जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जालना महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांविरोधात कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. येणारा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, पदपथ तसेच कचराकुंड्यांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अनेक वेळा ही जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होतो. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांच्या मालकांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे.1
- *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* बदनापूर येथील जलसंपदा विभागाच्या (पाटबंधारे विभाग) उपविभागीय कार्यालयाची आणि वसाहतीची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. वर्षानुवर्षे या इमारतींची योग्य डागडुजी न झाल्यामुळे या शासकीय कार्यालयाची अवस्था एखाद्या पडक्या वाड्यासारखी झाली असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी तातडीने लक्ष देऊन शासन पातळीवरून नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व निवासस्थाने मंजूर करून आणावीत, अशी तीव्र मागणी बदनापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमधून केली जात आहे.इमारतींवर झाडीझुडपांचे साम्राज्य, भिंतींना तडेसध्या या कार्यालयाची आणि निवासस्थानांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. देखभालीअभावी छतांवर आणि भिंतींवर मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडीझुडपे उगवली आहेत. झाडांची मुळे भिंतींमध्ये खोलवर गेल्याने इमारतीला मोठे तडे गेले असून संपूर्ण सिमेंटचे बांधकाम कमकुवत झाले आहे.ताडपत्रीचा आधार; राहणाऱ्यांच्या जीवितास मोठा धोकाकार्यालयाच्या व निवासस्थानांच्या छताचे प्लास्टर आणि सिमेंटचे भाग सतत निखळून पडत आहेत. पावसाळ्यात छतातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असल्याने, छताचे रक्षण करण्यासाठी त्यावर चक्क प्लास्टिक आणि ताडपत्री टाकण्याची वेळ आली आहे. ही ताडपत्री तात्पुरता आडोसा देत असली, तरी मूळ इमारत कधीही कोसळू शकते अशी भयानक स्थिती आहे. अशा धोकादायक छताखाली दिवस-रात्र राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या निष्पाप कुटुंबाच्या जीवितास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी एखादी भिंत किंवा छत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासकीय दप्तर आणि रेकॉर्ड धोक्यातछताच्या सततच्या गळतीमुळे केवळ माणसांचाच जीव धोक्यात आहे असे नाही, तर तालुक्यातील जलप्रकल्प, कालवे आणि शेतजमिनींच्या नोंदी असलेले अत्यंत महत्त्वाचे शासकीय दप्तर, नकाशे व मोलाच्या फाईल्स भिजून कायमच्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांना फाईल्स वाचवण्यासाठी प्लास्टिकचा वापर करावा लागत आहे.परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाटया आवारात राहणारे कर्मचारी, अधिकारी आणि कामानिमित्त येणारे शेतकरी यांच्या जीवाला इमारतीसोबतच आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरामध्ये वाढलेल्या अस्ताव्यस्त झाडीझुडपांमुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. यामुळे कर्मचारी व त्यांच्या मुलांना नेहमीच भीतीचा सामना करावा लागत आहे.आमदार नारायण कुचे यांच्याकडून निधीची अपेक्षाबदनापूर तालुक्यातील सिंचन व्यवस्थापनाच्या आणि शेतकर्यांच्या दृष्टीने हे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने या जागेची पाहणी करावी, तसेच शासन पातळीवर ताकदीने पाठपुरावा करून या धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि येथे नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करून आणावा, अशी आग्रही मागणी आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.2
- संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..1
- पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन! दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.1
- जालन्यात चौधरी नगरात ‘तीज महोत्सवा’चा जल्लोष!.. बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा जागर; महिला-तरुणींसह समाजबांधवांची जय्यत तयारी.. जालन्यात चौधरी नगरात ‘तीज महोत्सवा’चा जल्लोष!.. बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा जागर; महिला-तरुणींसह समाजबांधवांची जय्यत तयारी.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि लोककलेचे दर्शन घडविणाऱ्या ‘तीज महोत्सवा’चा उत्साह जालन्यात शिगेला पोहोचला आहे. चौधरी नगर परिसरातील संत सेवालाल महाराज व आई जगदंबा माता मंदिराच्या प्रांगणात २९ व ३० ऑगस्ट २०२६ रोजी दोन दिवसीय भव्य तीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चौधरी नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तयारीला वेग आला आहे. भव्य मंडप उभारण्यात आला असून, कार्यक्रमासाठी आवश्यक सजावट व इतर तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी बंजारा समाजातील महिला, तरुणी, पुरुष, नागरिक आणि बालके मोठ्या उत्साहाने एकत्र येत पारंपरिक कार्यक्रमांचा सराव करत आहेत. ढोलाच्या तालावर आणि पारंपरिक बंजारा लोकगीतांच्या सुरांवर महिला व तरुणी वर्तुळाकार रिंगणात फेर धरून नृत्याचा सराव करताना दिसत आहेत. पारंपरिक वेशभूषा, लोकगीते आणि नृत्यामुळे चौधरी नगर परिसरात सध्या बंजारा संस्कृतीचा अनोखा रंग पाहायला मिळत आहे. संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा मातेच्या आशीर्वादाने या महोत्सवाची सुरुवात होणार असून, दोन दिवसांच्या कालावधीत बंजारा समाजाच्या परंपरा जपणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. यामध्ये पारंपरिक बंजारा लोकनृत्य, तीज गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.1