सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका फेटाळली मौलाना मोहम्मद अली जौहर शिक्षण संस्थेच्या भरती प्रक्रियेवरील उच्च न्यायालयाचा आदेश कायम सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका फेटाळली मौलाना मोहम्मद अली जौहर शिक्षण संस्थेच्या भरती प्रक्रियेवरील उच्च न्यायालयाचा आदेश कायम नवी दिल्ली, दि. २२ ऑगस्ट २०२६ : मौलाना मोहम्मद अली जौहर एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष शेख मोहम्मद कैसर आझाद व इतरांविरुद्ध पठाण बनेखा नूरखा यांनी दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (Special Leave Petition) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २ जुलै २०२६ रोजी दिलेला आदेश कायम राहिला आहे. सदर याचिका रिट याचिका क्रमांक ८४३१/२०२४ व ८४४६/२०२४ मधील उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाविरोधात दाखल करण्यात आली होती. २२ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह व न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रे व प्रकरणातील नोंदींचा विचार केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यासारखी कोणतीही त्रुटी आढळत नसल्याचे नमूद करत विशेष अनुमती याचिका फेटाळली. दरम्यान, सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी संबंधित विषयासंदर्भात नवीन शासन निर्णय (जी.आर.) जारी झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हा शासन निर्णय उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या एक दिवस आधी जारी झाला होता; मात्र तो उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणता आला नसल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले. भविष्यातील भरती प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राबवू नये, अशी विनंतीही याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका फेटाळल्याने उच्च न्यायालयाचा आदेश कायम राहिला आहे. या निर्णयामुळे संस्थेच्या भरती प्रक्रियेसंदर्भातील न्यायालयीन प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि संस्थेचे शैक्षणिक कामकाज सुरळीत सुरू राहावे, अशी अपेक्षा शिक्षणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैसर आझाद शेख यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

- Sillod छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का भव्य रैली के साथ स्वागत, | AQS NEWS #sillod sillod update: chhatrapati shivaji maharaj ki pratima ka bhavya rally ke saath swagat, hazaron shiv bhakt hue shamil | AQS NEWS #Sillod #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivBhakt #SillodNews #AQSNEWS #AQSNEWSDIGITAL #सिल्लोड #छत्रपतिशिवाजीमहाराज #सिल्लोडन्यूज #महाराष्ट्रnews1
- सिल्लोड कायगाव अज्ञात आरोपीने कपाशी पिकाची केली नुकसान वडोद बाजार पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे अज्ञात आरोपीने कपाशी पिकाचे झाडे उपटून फेकत खोडके या शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे सदरील घटनेची नोंद वडोद बाजार पोलिसांनी घेतली आहे1
- दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या, जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या, जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव1
- निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ वर्षांतील निधीचा हिशोब देण्याची ग्रामस्थांची मागणी1
- आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार1
- आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते1
- जलगाव जिल्हे मे एक औरत को नहाते हुए छेड रहा था एक आदमी उसे पकड के चारो तरफ से की पिटाई जलगाव लेटेस्ट न्यूज #जलगावन्यूज #जळगावजिल्हा #viralnewz #shuruapp1
- भांडुप पूर्व सनशाइन सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून महिलेने उडी मारली मात्र झाडात अटकली दोन तास भांडुप पूर्व येथील सनशाइन सोसायटी येथील दहाव्या मजल्यावरून महिलेने उडी घेतली मात्र महिला एका झाडाला चक्क दोन तास अडकले होती महिलेला झाडावरून काढण्यासाठी फायर ब्रिगेड व पोलिसांना दोन तासाचा वेळ लागला सदरील घटनेत महिलेचे जीव वाचले मात्र फायर ब्रिगेड व पोलिसांना दोरीवरची कसरत करावा लागली1