logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 12 कागदपत्रे पुरावे अनुज्ञेय *नाशिक, दि. 8 जानेवारी 2026 :* राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नाशिक महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त अन्य 12 पुरावे अनुज्ञेय असल्याचे नाशिक महानगरपालिका प्रभाग 8 ते 11 चे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. *असे आहेत पुरावे* 1.भारताचा पासापोर्ट 2.आधार ओळखपत्र 3.वाहन चालविण्याचा परवाना 4.आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र 5. राज्य शासनाचे फोटो ओळखपत्र 6.राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफीस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक 7.सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला. 8.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र (MNREGA) जॉब कार्ड 9.निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा/अवलंबित व्यक्ती यांची फोटो असलेली निवृती वेतन विषयक कागदपत्रे उदा. पासबुक, प्रमाणपत्र इत्यादी 10.लोकसभा/ राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा/ विधानपरिषद/ सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र 11.स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र 12.केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड. इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. मतदान प्रक्रिया ही बहु सदस्य निवडणूक पद्धतीने होणार असल्याने प्रत्येक मतदाराला ४ मत देण्याचा अधिकार असणार आहे. प्रत्येक प्रभागात ४ जागा आहेत त्यांना जागा ‘अ’, जागा ‘ब’, जागा ‘क’ व जागा ‘ड’ याप्रमाणे नाव दिलेले आहे. या प्रत्येक जागेचे मतपत्रिकेला वेगवेगळा रंग दिलेला आहे. जागा ‘अ’ साठी पांढरा, जागा ‘ब’ साठी फिका गुलाबी, जागा ‘क’ साठी फिका पिवळा आणि जागा ‘ड’ मतपत्रिका फिका निळा रंगाची असणार आहे. मतदाराने मतदान केंद्रावर गेल्यांनतर या प्रत्येक जागेच्या एका उमेदवाराला एक याप्रमाणे चार मत नोंदविणे आवश्यक आहे, त्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्र व केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरात मोबाईल फोन, कॉडलेस फोन, वायरलेस फोन वापरण्यास प्रतिबंध केलेला आहे. तसे आढळून आल्यास संबंधित मतदारावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यामुळे मतदाराने मतदानास येतांना मोबाईल आणू नये, असेही आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.मंगरूळे यांनी केले आहे.

2 days ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer Nashik, Maharashtra•
2 days ago
14c53361-ec77-4457-a550-f2eb51867823

More news from Ahmednagar and nearby areas
  • नेपाल: कपिलवस्तु जिले के लुम्बिनी प्रांत में 5 जनवरी को हिंदूवादी समर्थकों ने कथित तौर पर एक मस्जिद के मीनार पर चढ़कर स्पीकर में तोड़फोड़ की, इस्लामी झंडा हटाया और भगवा झंडा फहराया! गौरतलब है कि कुछ दिन पहले नेपाल के धनुषा जिले में एक मस्जिद में तोड़फोड़ और पवित्र किताबें जलाए जाने की सूचना सामने आई थी. इस घटना के बाद मुसलमानों के विरोध प्रदर्शन शुरू हो गए. प्रदर्शन के दौरान हिंदूवादी समर्थकों ने कथित तौर पर हमला कर पत्थरबाजी की थी, जिससे स्थिति बिगड़ गई और हिंसा हुई थी.
    1
    नेपाल: कपिलवस्तु जिले के लुम्बिनी प्रांत में 5 जनवरी को हिंदूवादी समर्थकों ने कथित तौर पर एक मस्जिद के मीनार पर चढ़कर स्पीकर में तोड़फोड़ की, इस्लामी झंडा हटाया और भगवा झंडा फहराया!
गौरतलब है कि कुछ दिन पहले नेपाल के धनुषा जिले में एक मस्जिद में तोड़फोड़ और पवित्र किताबें जलाए जाने की सूचना सामने आई थी. इस घटना के बाद मुसलमानों के विरोध प्रदर्शन शुरू हो गए. प्रदर्शन के दौरान हिंदूवादी समर्थकों ने कथित तौर पर हमला कर पत्थरबाजी की थी, जिससे स्थिति बिगड़ गई और हिंसा हुई थी.
    user_MAKKI TV NEWS
    MAKKI TV NEWS
    Journalist Akole, Ahmednagar•
    15 hrs ago
  • शिखाडे वणी येथे जंगम पेट्रोलपंपाजवळ गोरक्षकांनी वाचवले ६३ गायींचे जीव
    1
    शिखाडे वणी येथे जंगम पेट्रोलपंपाजवळ गोरक्षकांनी वाचवले ६३ गायींचे जीव
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Journalist Chandvad, Nashik•
    2 hrs ago
  • राहुरी फॅक्टरी साई आदर्श मल्टी टेस्टच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
    1
    राहुरी फॅक्टरी साई आदर्श मल्टी टेस्टच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Journalist Rahuri, Ahmednagar•
    14 hrs ago
  • “प्रभाग २८ चा विकास, विश्वास आणि हक्क – मशाल चिन्हासोबत Please Subscribe My Channel Mi Marathi India
    1
    “प्रभाग २८ चा विकास, विश्वास आणि हक्क – मशाल चिन्हासोबत
Please Subscribe My Channel Mi Marathi India
    user_Simon Mascarenhas
    Simon Mascarenhas
    Local News Reporter मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • काठापुर खुर्द ता. शिरूर येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद https://dailynewspost24.com/?p=5415
    4
    काठापुर खुर्द ता. शिरूर येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद https://dailynewspost24.com/?p=5415
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Reporter शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Ek kavita...... HINDI.
    1
    Ek kavita...... HINDI.
    user_Shyam pokra
    Shyam pokra
    Mumbai, Maharashtra•
    9 hrs ago
  • धुळ्यात गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई; आरोपीच्या घरातून जिवंत काडतुसे जप्त
    1
    धुळ्यात गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई; आरोपीच्या घरातून जिवंत काडतुसे जप्त
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • *चांदवड तालुका होणार पाणीदार; 'विशेष जलसमृद्धी अभियानाचा' आमदार राहुल आहेरांच्या उपस्थितीत दिमाखदार प्रारंभ* ​चांदवड: तालुक्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने आज तहसील कार्यालय, चांदवड येथे 'विशेष जलसमृद्धी अभियान' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तालुक्यातील विविध मान्यवरांच्या साक्षीने या अभियानाचे बिगुल वाजवण्यात आले. ​याप्रसंगी माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे व संदीप काळे, माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर यांची विशेष उपस्थिती होती. या अभियानाद्वारे तालुक्यातील जलस्त्रोत बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. ​अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणेने कंबर कसली आहे. कार्यक्रमाला प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार अनिल चव्हाण, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे आणि कृषी अधिकारी निलेश मावळे उपस्थित होते. तसेच सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील प्रमुख अधिकारी, ज्यात सुनंदा घुगे, सुभाष पगार, माधुरी वाडिले, वासंती बोरसे, प्रसाद सोनवणे आणि प्रतीक धुमारे यांचा समावेश होता, त्यांनी तांत्रिक नियोजनाबाबत माहिती दिली. ​या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब माळी, अशोक भोसले, बाळासाहेब वाघ, निवृत्ती शिंदे, मोहन शर्मा, पंढरीनाथ खताळ यांसह अनेकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. ​या अभियानामुळे आगामी काळात तालुक्यातील धरणांमधील साठा वाढण्यास आणि शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. "तालुक्याचा शाश्वत विकास करायचा असेल, तर जलसमृद्धी हाच एकमेव मार्ग आहे. लोकसहभाग आणि प्रशासकीय नियोजन यांच्या जोरावर चांदवड तालुका पाणीदार करू." — *डॉ. राहुल दादा आहेर* (आमदार, चांदवड-देवळा)
    1
    *चांदवड तालुका होणार पाणीदार; 'विशेष जलसमृद्धी अभियानाचा' आमदार राहुल आहेरांच्या उपस्थितीत दिमाखदार प्रारंभ*
​चांदवड: तालुक्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने आज तहसील कार्यालय, चांदवड येथे 'विशेष जलसमृद्धी अभियान' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तालुक्यातील विविध मान्यवरांच्या साक्षीने या अभियानाचे बिगुल वाजवण्यात आले.
​याप्रसंगी माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे व संदीप काळे, माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर यांची विशेष उपस्थिती होती. या अभियानाद्वारे तालुक्यातील जलस्त्रोत बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
​अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणेने कंबर कसली आहे. कार्यक्रमाला प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार अनिल चव्हाण, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे आणि कृषी अधिकारी निलेश मावळे उपस्थित होते. तसेच सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील प्रमुख अधिकारी, ज्यात सुनंदा घुगे, सुभाष पगार, माधुरी वाडिले, वासंती बोरसे, प्रसाद सोनवणे आणि प्रतीक धुमारे यांचा समावेश होता, त्यांनी तांत्रिक नियोजनाबाबत माहिती दिली.
​या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब माळी, अशोक भोसले, बाळासाहेब वाघ, निवृत्ती शिंदे, मोहन शर्मा, पंढरीनाथ खताळ यांसह अनेकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.
​या अभियानामुळे आगामी काळात तालुक्यातील धरणांमधील साठा वाढण्यास आणि शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
"तालुक्याचा शाश्वत विकास करायचा असेल, तर जलसमृद्धी हाच एकमेव मार्ग आहे. लोकसहभाग आणि प्रशासकीय नियोजन यांच्या जोरावर चांदवड तालुका पाणीदार करू."
— *डॉ. राहुल दादा आहेर* (आमदार, चांदवड-देवळा)
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Journalist Chandvad, Nashik•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.