वाशिम तालुक्यातील गट उमरा येथे नववधू वैष्णवी काळे यांनी दिले शिक्षणाला प्राधान्य लग्न मंडपातून थेट परीक्षेला प्राधान्य *वाशीम तालुक्यातील भटउमरा येथे नववधू वैष्णवी काळे ने शिक्षणाला प्राधान्य देत लग्न मंडपातून थेट परीक्षेला दिले प्राधान्य* आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या लग्नाच्या दिवशीही शिक्षणाला प्राधान्य देत थेट लग्न मंडपातून परीक्षेला हजेरी लावून एक आदर्श निर्माण" (वैष्णवीला पारंपरिक वेशभूषेत नववधू परीक्षा देताना पाहून परीक्षा केंद्रातील विद्यार्थी व शिक्षकही आश्चर्यचकित झाले) वाशीम: एप्रिल 2026 रोजी, वाशीम तालुक्यातील ग्राम भटउमरा येथील एक प्रेरणादायी घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. समाजकार्याचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आणि नववधू कु. वैष्णवी संतोष काळे हिने आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या दिवशी—लग्नाच्या दिवशीही—शिक्षणाला प्राधान्य देत थेट लग्न मंडपातून परीक्षेला हजेरी लावून एक आदर्श निर्माण केला आहे. दि. 28 एप्रिल 2026 रोजी वैष्णवीचा विवाह ज्ञानेश्वर राजू चौधरी (रा. भटउमरा) यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडत होता. लग्नाच्या विधी सुरू असतानाच, ठरलेल्या वेळेत परीक्षा देणे आवश्यक असल्यामुळे वैष्णवीने कोणतीही तडजोड न करता मंडपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक लग्नाच्या वेशभूषेतच ती वाशीम येथील राजस्थान महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर पोहोचली आणि आपली परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत दिली. पारंपरिक वेशात नववधू परीक्षा देताना पाहून परीक्षा केंद्रातील विद्यार्थी व शिक्षकही आश्चर्यचकित झाले. तिच्या या जिद्दीचे आणि शिक्षणावरील निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी या घटनेला “शिक्षण प्रथम” या विचाराचे उत्तम उदाहरण म्हणून गौरवले आहे. वैष्णवीच्या या कृतीने समाजासमोर एक सकारात्मक संदेश गेला असून, विशेषतः महिलांसाठी ती प्रेरणादायी ठरली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाला प्राधान्य द्यावे, हे तिने कृतीतून दाखवून दिले आहे. आजही अनेक ठिकाणी मुलींच्या शिक्षणाकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते, अशा परिस्थितीत वैष्णवीसारख्या तरुणींची उदाहरणे समाजात बदल घडवून आणणारी ठरत आहेत. यावेळी वैष्णवी ने सांगितले की "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही " बाबासाहेब दिलेला संदेश आणि अधिकार अंगी कारून,राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले त्यांचे विचार वारसा या शिक्षणाच्या माध्यमातून नेण्याचा मानस असल्याचे सांगितले. वैष्णवी ही वाशिम येथील श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाची बीए.स.डब्ल्यू भाग तीन ची विद्यार्थिनी असून तिने समाजकार्याच्या शिक्षणाला प्राधान्य देत आज लग्नाच्या दिवशीही तिने पेपरला हजेरी लावली आहे. ही शिक्षणाचे महत्त्व निर्णय घेण्याची क्षमता आणि ताकद दाखवून दिली आहे. स्थानिक नागरिक, शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी वैष्णवीच्या या निर्णयाचे मनापासून कौतुक केले. असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वैष्णवी आणि तिचे आई वडील,झालेला पती, सासू - सासरे नातेवाईक यांच्या धाडसी आणि सकारात्मक कृतीमुळे भटउमरा गावाचे नावही अभिमानाने घेतले जात आहे.

- Post by Amravati News Update1
- अकोला: केळीवेळी दहीहंडा दर्यापूर मार्गांवर केळीवेळी येथे एका मुलाचा कारच्या धडकेत अपघात1
- मंगरूळपीर पंचायत समिती मध्ये आरो बंद पिण्याच्या पाण्याची कोमट सोय मंगरूळपीर प्रतिनिधी अनंता घुगे दिनांक 29 एप्रिल 2026 सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून मंगरूळपीर येथील शासकीय कार्यालयात मात्र पिण्याच्या पाण्याची कोमट सोय असल्यामुळे शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या ग्रामीण जनतेला पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती कार्यालयात तर वॉटर फिल्टर उपलब्ध आहे, मात्र आरो बंद असल्याने तसेच पडून आहे. यावर्षी उन्हाचा तडाख्यात झपाट्याने वाढ झालेली असून आताच तापमान ४० अंशापुढे गेले आहे. सकाळी ९ वाजेपासून उन्हाचा तडाखा वाढून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोठे उन दिसून येते. मंगरूळपीर येथे विविध कार्यालये असून तालुक्याचे मुख्यालय असलेले प्रशासकीय इमारतीत पंचायत समिती कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, रजिस्ट्री ऑफिस, सामाजिक असे तालुक्यातील कामकाज प्रामुख्याने पाहणारी कार्यालये आहेत. त्यामुळे तालुकाभरातून ग्रामस्थ या ठिकाणी विविध कामाकाजासाठी येतात. तसेच अभ्यागतांसाठी स्वच्छतागृह सुध्दा घाणच असते आता तर चक्क पिण्याच्या पाण्याची सोयही येथे दिसून येत नाही. पूर्वीच्या काळी काही सामाजिक संस्था, दानशूर लोक पाणपोई लावत होते. मात्र, हळूहळू ही प्रथा बंद पडून आता पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मंगरूळपीर येथील प्रशासकीय इमारतीतही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येणाऱ्याउपलब्ध नसल्याचे चित्र आहे. मंगरूळपीर येथील प्रशासकीय इमारतीतही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र शोध घ्यावा लागतो किंवा विकतचे पाणी घ्यावे लागते. प्रशासकीय इमारतीबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध योजनांचे स्त्रोत्र असलेल्या पंचायत समिती कार्यालयातही पिण्याच्या पाण्याची सोय दिसून येत नाही. विशेष म्हणजे येथे कुलर, त्याला लावलेला पाईप, नळ उपलब्ध आहेत त्यांची फिटिंग पण केलेली दिसते मात्र ते कुलर धूळ खात पडून आहे. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासकीय इमारतीत तर पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती यांनी पिण्याच्या पाण्याचा सोय करावी, अशी मागणी होत आहे.2
- यवतमाळ जिल्ह्यातील वडगांव जंगल पोलीस स्टेशन हद्दीतील बोरीसिंह गावात एका २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरुन ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. आशिष कांबळे असं मृतकांच नाव आहे.घटनेतील आरोपी पांडुरंग कांबळे याला वडगांव जंगल पोलीसांनी अटक केली आहे.1
- 📍 सिंभोरा रोड मोर्शी बालाजी नगर परिसरातील मूलभूत समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, नाल्यांची दयनीय अवस्था, साचलेला कचरा आणि बंद पडलेली स्ट्रीट लाईट्स यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः धोक्यात आले आहे. “बालाजी नगरच्या समस्या कागदावर नाही, जमिनीवर दिसतात,” असे ठाम मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त करत, नगर परिषद सदस्यांनी स्वतः येऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. ⚠️ अपघातांचा धोका वाढला खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे संतुलन बिघडत असून, अनेकदा अपघात टळता टळता टळतात. विशेषतः रात्रीच्या वेळी बंद स्ट्रीट लाईट्समुळे परिस्थिती अधिकच भीषण बनते. 🚫 नाल्यांची अवस्था बिकट नाल्यांची साफसफाई नियमित होत नसल्यामुळे कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात हीच समस्या मोठ्या पूरस्थितीत रूपांतरित होण्याची भीती व्यक्त होत आहे. 📢 नागरिकांचा इशारा स्थानिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, 👉 “जर लवकरात लवकर नगर परिषद सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून काम सुरू केले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.” 🏛️ नगर परिषद मोर्शीला खुलं आवाहन बालाजी नगरचे नागरिक आता थेट आवाहन करत आहेत की, 👉 “नगर परिषद सदस्यांनी कार्यालयात बसून नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून समस्या पाहाव्यात.” 🔥 नागरिकांची एकमुखी मागणी ✔ तात्काळ साइट व्हिजिट ✔ रस्ते दुरुस्ती ✔ नाली स्वच्छता ✔ स्ट्रीट लाईट सुरू करणे 🗣️ शेवटचा सवाल: “नागरिकांनी कर भरायचा आणि मूलभूत सुविधा मागण्यासाठी संघर्ष करायचा, हीच का व्यवस्था?”4
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- 💥 *बड़ी खबर*💥 *बाइक और तेंदुए की भीषण टक्कर, चलती बाइक के चेन-स्पॉकेट में फंसा तेंदुआ, दहाड़ से मचा हड़कंप।* उत्तराखंड के नैनीताल के भीमताल में चलती बाइक से टकराया तेंदुआ। सड़क पार करते समय एक चलती बाइक से टकरा गया और उसके चेन-स्पॉकेट में फंस गया. प्रत्यक्षदर्शियों के अनुसार, तेंदुआ अचानक झाड़ियों से निकलकर सड़क पार कर रहा था, तभी वह एक तेज रफ्तार बाइक से टकरा गया। टक्कर इतनी जबरदस्त थी कि बाइक सवार दंपति गिर गए और तेंदुए का पैर बाइक की चेन और पिछले हिस्से में बुरी तरह फंस गया. घायल होने के कारण तेंदुआ आक्रामक हो गया और जोर-जोर से दहाड़ने लगा, जिससे वहां मौजूद राहगीरों में भगदड़ मच गई।1
- खामगाव : स्थानिक बर्डे प्लॉट परिसरातील जोशी लेआउटमध्ये लग्नात नाचण्याच्या वादातून झालेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणाला आता वेग आला आहे. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी आज आरोपींना घटनास्थळी आणले होते. २५ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०:४० च्या सुमारास बर्डे प्लॉटमधील जोशी लेआउटमध्ये एक विवाह सोहळा सुरू होता. लग्नात गाण्यावर नाचत असताना शोएब खान अमिन खान (वय २२, रा. बरकत किराणा जवळ) याचा शेख तालीब शेख रहमान (२२), फैजान खान बुढन खान (२५), मुज्जमील खान जमीन खान उर्फ आफताब (२२) आणि अकोला येथील एका आरोपीशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, चौघांनी संगनमत करून शोएबवर चाकू, फायटर, वस्तरा आणि दगडाने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शोएबचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. २६ एप्रिल रोजी सायंकाळी वरवट बकाल येथून बर्डे प्लॉटमधील तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. २७ एप्रिल रोजी या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पुढील तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अकोला येथील चौथा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. घटनास्थळाचा पंचनामा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर तपासाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून पोलिसांनी आज आरोपींना घटनास्थळी (जोशी लेआउट) आणले होते. प्रत्यक्ष घटना कशी घडली, हल्ल्यात नेमकी कोणती शस्त्रे वापरली गेली आणि गुन्ह्याचा घटनाक्रम काय होता, याचे चित्रीकरण आणि माहिती पोलिसांनी संकलित केली. यावेळी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.1
- बनावट जमिनीच्या व्यवहाराचा मोठा घोटाळा, तब्बल ३ कोटी रुपयांच्या प्रकरण उघडकीस1