भक्तीच्या वाटेवर 'मुक्या' जिवांचा आधार: सहजसेवा ट्रस्टतर्फे जोतिबाच्या डोंगरावर चारा वाटप कोल्हापूर (जोतिबा डोंगर) ३१ सिटी न्यूज नेटवर्क 'चांगभलं'च्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत न्हाऊन निघणाऱ्या जोतिबाच्या चैत्र यात्रेला एक आगळीवेगळी परंपरा आहे. ही परंपरा आहे—आपल्या लाडक्या सर्जा-राजाला घेऊन शेकडो मैलांचा प्रवास करत देवाच्या भेटीला येणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याची. पण या भक्तिमय वातावरणात, कडाक्याच्या उन्हात पायपीट करणाऱ्या त्या मुक्या जनावरांची भूक व गरज ओळखून जाणीव ठेवून सहजसेवा ट्रस्ट गेली २५ वर्षे माणुसकी आणि 'भूतदया' यांचा एक अनोखा संगम घडवून आणत आहे. आजच्या धावपळीच्या युगातही अनेक भक्त आपल्या बैलगाड्या सजवून, रंगवून सपरिवार जोतिबाच्या डोंगरावर येतात. हा प्रवास सोपा नसतो. चैत्राचं रखरखीत ऊन आणि डोंगरावरची कठीण चढण पार करताना या बैलांची मोठी ओढाताण होते. डोंगरावर पोहोचल्यानंतर या मुक्या जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण होते. अशा वेळी, ज्या बैलांच्या कष्टावर शेतकऱ्याचा संसार चालतो, त्यांच्या श्रमाची जाण ठेवत सहजसेवा ट्रस्टने सेवेचा आगळा, वेगळा हात पुढे केला आहे. *२५ वर्षांचे अविरत सेवाव्रत* केवळ माणसांचीच नव्हे, तर पशूंचीही सेवा करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे, या भावनेतून ट्रस्ट गेल्या पाव शतकापासून हा उपक्रम राबवत आहे. यावर्षीही कडाक्याच्या उन्हाची तमा न बाळगता ट्रस्टच्या वतीने १०० हून अधिक बैलगाड्यांमधील बैलांना कपरी पेंड, भुस्सा आणि दर्जेदार चारा मनोभावे वाटप करण्यात आला. भूतदयेचा आदर्श जेव्हा एखादा शेतकरी आपल्या बैलाच्या मुखाशी चारा जाताना पाहतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांतील समाधान हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे असते. सहजसेवा ट्रस्टच्या या उपक्रमामुळे डोंगरावर विसावा घेणाऱ्या शेकडो बैलांना पोटभर अन्न मिळाले. 'अन्नछत्रा'च्या माध्यमातून भक्तांची सेवा करणाऱ्या या ट्रस्टने प्राण्यांप्रती दाखवलेली ही संवेदनशीलता आजच्या काळात समाजासमोर एक मोठा आदर्श निर्माण करत आहे. *"माणूस तर आपलं दुःख बोलून दाखवतो, पण या मुक्या जनावरांची भूक ओळखून त्यांना तृप्त करणं, हेच चैत्र यात्रेचं खरं पुण्य आहे."* अशा भावना यावेळी उपस्थित असलेल्या भाविकांनी व्यक्त केल्या. सहजसेवा ट्रस्टचे हे सेवाव्रत जोतिबाच्या चैत्र यात्रेतील माणुसकीचा एक अविभाज्य भाग बनले आहे.
भक्तीच्या वाटेवर 'मुक्या' जिवांचा आधार: सहजसेवा ट्रस्टतर्फे जोतिबाच्या डोंगरावर चारा वाटप कोल्हापूर (जोतिबा डोंगर) ३१ सिटी न्यूज नेटवर्क 'चांगभलं'च्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत न्हाऊन निघणाऱ्या जोतिबाच्या चैत्र यात्रेला एक आगळीवेगळी परंपरा आहे. ही परंपरा आहे—आपल्या लाडक्या सर्जा-राजाला घेऊन शेकडो मैलांचा प्रवास करत देवाच्या भेटीला येणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याची. पण या भक्तिमय वातावरणात, कडाक्याच्या उन्हात पायपीट करणाऱ्या त्या मुक्या जनावरांची भूक व गरज ओळखून जाणीव ठेवून सहजसेवा ट्रस्ट गेली २५ वर्षे माणुसकी आणि 'भूतदया' यांचा एक अनोखा संगम घडवून आणत आहे. आजच्या धावपळीच्या युगातही अनेक भक्त आपल्या बैलगाड्या सजवून, रंगवून सपरिवार जोतिबाच्या डोंगरावर येतात. हा प्रवास सोपा नसतो. चैत्राचं रखरखीत ऊन आणि डोंगरावरची कठीण चढण पार करताना या बैलांची मोठी ओढाताण होते. डोंगरावर पोहोचल्यानंतर या मुक्या जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण होते. अशा वेळी, ज्या बैलांच्या कष्टावर शेतकऱ्याचा संसार चालतो, त्यांच्या श्रमाची जाण ठेवत सहजसेवा ट्रस्टने सेवेचा आगळा, वेगळा हात पुढे केला
आहे. *२५ वर्षांचे अविरत सेवाव्रत* केवळ माणसांचीच नव्हे, तर पशूंचीही सेवा करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे, या भावनेतून ट्रस्ट गेल्या पाव शतकापासून हा उपक्रम राबवत आहे. यावर्षीही कडाक्याच्या उन्हाची तमा न बाळगता ट्रस्टच्या वतीने १०० हून अधिक बैलगाड्यांमधील बैलांना कपरी पेंड, भुस्सा आणि दर्जेदार चारा मनोभावे वाटप करण्यात आला. भूतदयेचा आदर्श जेव्हा एखादा शेतकरी आपल्या बैलाच्या मुखाशी चारा जाताना पाहतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांतील समाधान हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे असते. सहजसेवा ट्रस्टच्या या उपक्रमामुळे डोंगरावर विसावा घेणाऱ्या शेकडो बैलांना पोटभर अन्न मिळाले. 'अन्नछत्रा'च्या माध्यमातून भक्तांची सेवा करणाऱ्या या ट्रस्टने प्राण्यांप्रती दाखवलेली ही संवेदनशीलता आजच्या काळात समाजासमोर एक मोठा आदर्श निर्माण करत आहे. *"माणूस तर आपलं दुःख बोलून दाखवतो, पण या मुक्या जनावरांची भूक ओळखून त्यांना तृप्त करणं, हेच चैत्र यात्रेचं खरं पुण्य आहे."* अशा भावना यावेळी उपस्थित असलेल्या भाविकांनी व्यक्त केल्या. सहजसेवा ट्रस्टचे हे सेवाव्रत जोतिबाच्या चैत्र यात्रेतील माणुसकीचा एक अविभाज्य भाग बनले आहे.
- Post by E city news network1
- जोतिबा डोंगर: जोतिबा यात्रेसाठी रत्नागिरीवरून पायी जाणारे भाविक सायकलवर शासनकाठी घेऊन चालले होते. कडक उन्हामुळे त्यांना प्रचंड त्रास होत होता. त्यांच्या या कष्टाला वाडी रत्नागिरी मार्गावरील एका दुचाकी चालकाने मदतीचा हात दिला. जोतिबा डोंगर यात्रेसाठी भाविक आपापल्या भागातून शासनकाठी घेऊन येतात. शासनकाठी खूप लांब असते आणि ती सायकलवर सुरक्षितपणे ठेवणे कठीण असते. हे भाविक रत्नागिरीवरून सायकलवर शासनकाठी घेऊन चालले होते. त्यांच्या या अडचणीला बाईकस्वाराने मदतीचा हात दिला. त्याने तरुणांना आपल्या दुचाकीवर बसवले आणि शासनकाठी देखील सुरक्षितपणे दुचाकीवर ठेवली. अशा प्रकारे तरुणांना प्रवासात मदत झाली आणि त्यांना कडक उन्हाचा त्रास कमी झाला. बाईकस्वाराच्या या कृत्यमुळे उपस्थित सर्वांनी त्याचे कौतुक केले. जोतिबा यात्रेत अशा प्रकारे माणुसकीचे दर्शन घडल्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला.1
- भोंदू बाबा अशोक खरात यांच्या मुलीच्या लग्नपत्रिकेवर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे नाव छापण्यात आल्याबाबत कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. “त्या नावाबद्दल मला काहीच माहिती नाही. कोणीही कोणाचेही नाव पत्रकांवर टाकतो,” असे त्यांनी म्हटले.1
- इचलकरंजी येथील विक्रम नगर, आरगे भवन परिसरात गॅस पाईपलाईन साठ्याला भीषण आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अग्निशामक दलाने वेळेत धाव घेतल्याने मोठी हानी टळली. महापौर उदय धातुंडे यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सविस्तर बातमीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा.2
- Post by कोयनानगर प्रतिनिधी अरुण सुर्यव1
- थोपटेवाडी गावात काही भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन रस्त्याच्या कामामुळे फूटल्याने आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल झाल्याने संतप्त नागरिक व महिला भगिनींनी पंचायत समिती बारामती या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व तात्काळपाणी पुरवठा सुरु न झाल्यास बारामती पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यासंदर्भातील निवेदन तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आणि नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी थोपटेवाडी गावाला भेट देऊन फुटलेल्या पाईपलाईन ठिकाणी मुख्य रस्त्यावरती भर उन्हात उभे राहून नागरिकांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या व त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना सरपंच रेखा बनकर व ग्रामसेविका वर्षा सालगुडे आणि ग्रामपंचायत सदस्य यांना दिल्या.1
- विक्रम शिंदे /दि.३१ भोर-महाड मार्गावर शिरगाव गावाच्या हद्दीत टेम्पो सुमारे २० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोमधील ९ जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील किवत गावचे १५ ते २० नागरिक एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी टेम्पोने महाडकडे जात होते. दरम्यान शिरगाव परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना दरीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी भोर पोलीस पुढील तपास करत आहेत.2
- बारामतीतील डॉक्टर गावडे यांनी शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का प्रमाणपत्रावर मारल्याने त्यांना अटक होणार का?1