logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उदगीर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी पदनिर्मिती व इमारत बांधकामास मंजुरी देण्याची आमदार बनसोडे यांची मागणी उदगीर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी पदनिर्मिती व इमारत बांधकामास मंजुरी द्या- आ. बनसोडे उदगीर (प्रतिनिधी) उदगीर येथे मार्च - २०२४ मध्ये नव्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले असून या कार्यालयात पदनिर्मिती, स्वतंत्र इमारत बांधकाम आणि आवश्यक प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेकडे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन संबंधित विभागास तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आली असल्याची माहिती माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी बोलताना दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी मंत्रालय, मुंबई येथे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान उदगीरसह परिसरातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाने, करसंकलन यांसारख्या कामांसाठी सध्या दूरच्या ठिकाणी जावे लागते, त्यामुळे स्थानिक पातळीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अत्यंत आवश्यक आहे. वाढती लोकसंख्या व दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या आणि त्यांना पुरविण्यात येणा-या सोयी लक्षात घेता उदगीर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यावर परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, पदनिर्मिती प्रक्रिया, आवश्यक मनुष्यबळ उपलब्धता तसेच इमारत बांधकामाबाबत शासनस्तरावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना देऊन प्रस्तावाला गती देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे उदगीर शहरासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, शासकीय सेवांचा लाभ स्थानिक पातळीवरच मिळणार आहे. तसेच यामुळे वेळ व खर्चाची बचत होऊन प्रशासन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. या भेटीमुळे उदगीरच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

16 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
16 hrs ago
2e50ac57-3109-4495-9705-c833546c9285

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by MAHARAJ TRAVELS NILANGA
    1
    Post by MAHARAJ TRAVELS NILANGA
    user_MAHARAJ TRAVELS NILANGA
    MAHARAJ TRAVELS NILANGA
    निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजितभैय्या गायकवाड यांच्या पुढाकाराने आज 30 एप्रिल रोजी इंजिनिअर विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेर तालुका उदगीर येथे स्तुत्य उपक्रम राबविला. गावातील निराधार अंध राम सूर्यवंशी यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. रस्त्याच्या कडेला प्रांतविधिला जाताना कित्येकदा गाडयांना धडकून तो जखमी झाला. जेवण वेळेवर मिळत नसल्याने उपासमार त्याच्यावर आली होती. आज सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या यांनी रामला सुलभ शोचालय बांधून दिले आणि त्याच्या दोन वेळच्या जेवणाची कायमस्वरूपी व्यवस्था केली. आज खऱ्या अर्थाने विश्वजित भैय्याचा वाढदिवस लहान भावाने समाजाला खूप मोलाचा संदेश देऊन साजरा केला. अश्वजित भैय्या आपल्या हातून असेच कार्य घडो आणि सेवाकुंड यशोशिखराला जाओ! हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
    1
    डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजितभैय्या गायकवाड यांच्या पुढाकाराने आज 30 एप्रिल रोजी इंजिनिअर विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेर तालुका उदगीर येथे स्तुत्य उपक्रम राबविला. 
गावातील निराधार अंध राम सूर्यवंशी यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. रस्त्याच्या कडेला प्रांतविधिला जाताना कित्येकदा गाडयांना धडकून तो जखमी झाला. जेवण वेळेवर मिळत नसल्याने उपासमार त्याच्यावर आली होती. 
आज सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या यांनी रामला सुलभ शोचालय बांधून दिले आणि त्याच्या दोन वेळच्या जेवणाची कायमस्वरूपी व्यवस्था केली. आज खऱ्या अर्थाने विश्वजित भैय्याचा वाढदिवस लहान भावाने समाजाला खूप मोलाचा संदेश देऊन साजरा केला. 
अश्वजित भैय्या आपल्या हातून असेच कार्य घडो आणि सेवाकुंड यशोशिखराला जाओ!  हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    4 hrs ago
  • लातूरच्या चित्रपटगृहात राजा शिवाजी प्रदर्शित. रितेश देशमुख दिग्दर्शनात राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी गर्दी. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शुक्रवार दिनांक एक मे 2026. लातूर शहरात आज महाराष्ट्र दिनी 1 मे 2026 रोजी राजा शिवाजी चित्रपट रितेश देशमुख दिग्दर्शित प्रदर्शित झाला रितेश देशमुख यांच्या जन्म ठिकाणी त्यांनी पहिला शो प्रेक्षकांच्या साक्षीने पाहिला प्रेक्षकांच्या गर्दीने रितेश देशमुख यांचे मने जिंकली. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख यांनी महाराष्ट्राला अनमोल भेट दिली. राजा शिवाजी या चित्रपटात शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांचा दडलेला इतिहास पुढे आणला यामुळे शिवप्रेमींच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी रितेश देशमुख यांनी बोलताना प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.
    1
    लातूरच्या चित्रपटगृहात राजा शिवाजी प्रदर्शित. 
रितेश देशमुख दिग्दर्शनात राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी गर्दी. 
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
शुक्रवार दिनांक एक मे 2026.
लातूर शहरात आज महाराष्ट्र दिनी 1 मे 2026 रोजी राजा शिवाजी चित्रपट रितेश देशमुख दिग्दर्शित प्रदर्शित झाला रितेश देशमुख यांच्या जन्म ठिकाणी त्यांनी पहिला शो प्रेक्षकांच्या साक्षीने पाहिला प्रेक्षकांच्या गर्दीने रितेश देशमुख यांचे मने जिंकली.
आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख यांनी महाराष्ट्राला अनमोल भेट दिली. राजा शिवाजी या चित्रपटात शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांचा दडलेला इतिहास पुढे आणला यामुळे शिवप्रेमींच्या वतीने आभार मानण्यात आले. 
यावेळी रितेश देशमुख यांनी बोलताना प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    1
    Post by बाळकृष्ण प्रकाश कदम
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
    1
    नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.  आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. 
नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
  • महाराणा प्रताप नगरचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कायापालट सुरू -आमदार अमित देशमुख, तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती. ₹१.६० कोटींच्या 16 विविध विकासकामांचा शुभारंभ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 01 एप्रिल 2026. लातूर शहरालगतच्या नव्या वस्त्या व गावांना शहरासारख्याच दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत अंतर्गत येथे ₹१ कोटी ६० लाखांच्या विकासकामांना गती मिळाली आहे. आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, तर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार निधीतून एकत्रितपणे विविध मूलभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला असून, एकाच गावात अनेक कामे केल्यास त्यांचा दर्जा सुधारतो आणि नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळतो, असे देशमुख यांनी सांगितले. हद्दवाढीतील तांत्रिक अडचणींमुळे ‘झालर क्षेत्रा’तील नागरिकांना सुविधा मिळण्यात अडथळे येतात, ही समस्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा, रस्ते, सिटीबस सेवा आणि इतर सोयी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या भागासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करून या परिसराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार १६ विविध कामांना मंजुरी देण्यात आली असून काही कामे खासदार निधीतूनही राबवली जाणार आहेत. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
    1
    महाराणा प्रताप नगरचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कायापालट सुरू -आमदार अमित देशमुख, 
तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती.
₹१.६० कोटींच्या 16 विविध विकासकामांचा शुभारंभ.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर.
शुक्रवार दिनांक 01 एप्रिल 2026. 
लातूर शहरालगतच्या नव्या वस्त्या व गावांना शहरासारख्याच दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत अंतर्गत येथे ₹१ कोटी ६० लाखांच्या विकासकामांना गती मिळाली आहे. आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, तर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार निधीतून एकत्रितपणे विविध मूलभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला असून, एकाच गावात अनेक कामे केल्यास त्यांचा दर्जा सुधारतो आणि नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळतो, असे देशमुख यांनी सांगितले. हद्दवाढीतील तांत्रिक अडचणींमुळे ‘झालर क्षेत्रा’तील नागरिकांना सुविधा मिळण्यात अडथळे येतात, ही समस्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा, रस्ते, सिटीबस सेवा आणि इतर सोयी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या भागासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करून या परिसराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार १६ विविध कामांना मंजुरी देण्यात आली असून काही कामे खासदार निधीतूनही राबवली जाणार आहेत.
कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.