*सातारा पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे बालविवाह रोखण्यात यश!* *सातारा दि. 10 / 05 / 2026 रोजी कोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मा. पोलीस अधीक्षक सातारा यांना प्राप्त झाली. सदर माहितीची तात्काळ दखल घेऊन पोलीस अधिकारी व अंमलदार, महिला व बाल विकास विभाग, तसेच स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी भेट दिली. तपासणीअंती संबंधित मुलगी ही कायदेशीर विवाह वयापेक्षा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधित पालक व नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ अंतर्गत बालविवाह हा दंडनीय गुन्हा असल्याची समज देण्यात आली. तसेच बालविवाहामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशासनाच्या समुपदेशनानंतर संबंधित कुटुंबीयांनी विवाह थांबविण्यास सहमती दर्शवली असून नियोजित बालविवाह रोखण्यात मा.पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे सर,मा.अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर मॅडम सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली यश आले आहे. सदर कारवाईमध्ये API राजेश माने, पोलीस हवालदार मुनीर मुल्ला, महिला पोलीस क्रांती जाधव सर्व नेमणूक अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभाग,सातारा , प्रियांका देशमुख नेमणूक भरोसा सेल,सातारा तसेच कोरेगाव पोलीस ठाण्याचे PSI जगदाळे, महिला पोलीस हवालदार पाचांगणे,पोलीस कॉन्स्टेबल अक्षय शिंदे, महिला व बाल विकास विभागाच्या सुजाता शिंदे,चाईल्ड लाईन प्रतिनिधी वैभव इंगवले तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. समाजातील नागरिकांनी बालविवाहासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस प्रशासन किंवा चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. - API राजेश माने , अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभाग,सातारा.

- नसरापूर अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यात काढला मोर्चा ; नागरिक मोठ्या संख्येने सहभागी विक्रम शिंदे /भोर दि.१० नसरापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यातील बालगंधर्व चौकातून मूक मोर्चा काढण्यात आला. “चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे” आणि आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात पीडित मुलीचे आई-वडीलही सहभागी झाले होते. पुणे शहरातील विविध भागांतून नागरिक, महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संताप व्यक्त केला.1
- ट्री आर्मीच्या मदतीने पूर्ण मतदार संघात झाडे लावणार आमदार सुहास बाबर दोन दिवसांपूर्वी शूरु ॲपवर आमदार सुहास बाबर यांची बातमी प्रसिद्ध केली होती, तो व्हिडिओ तुफान वायरल झाला, नंतर आता आमदार सुहास बाबर यांनी सांगितले की ट्री आर्मीचे पदाधिकारी व आमचे पदाधिकारी पूर्ण खानापूर आटपाडी मतदारसंघात पिंपळाचे व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करणार आहे, तसेच वन विभागाकडून ही मदत घेऊन जंगल तयार करणार आहे. पाहूयात सुहास बाबर काय म्हणाले1
- अनेक पोकलेन, जेसीबी आणि शेकडो पोलिसांचा फौजफाटा कुदळवाडीमध्ये कोणासाठी...? पुन्हा "रात्रीस खेळ चाले" होणार का?1
- तळेगाव एमआयडीसीत आठव्या मजल्यावरून उडी; ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू... मावळ पुणे :- मावळमधील तळेगाव एमआयडीसी परिसरात अर्बन लाईफ टॉवर सोसायटीत एका ३५ वर्षीय महिलेने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.प्रतिभा शंकर असे मृत महिलेचे नाव असून, पतीसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.या प्रकरणात घरगुती वादाचे नेमके कारण काय होते आणि महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले होते का, याचा तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.... : लक्ष्मण कांबळे,पोलीस उपनिरीक्षक तळेगाव MIDC #तळेगाव #मावळ #तळेगावएमआयडीसी #अर्बनलाईफटॉवर #महिलेचामृत्यू #घरगुतीवाद #पोलीसतपास #पुणेबातम्या #Talegaon #Maval #TalegaonMIDC #UrbanLifeTower #WomanDeath #DomesticDispute #PoliceInvestigation #PuneNews1
- जीवन निरगुडे यांना त्यांच्या 19 वर्षांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनने अभिनंदन केले आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवेचे प्रतीक आहे.1
- पुण्यात वादळी वाऱ्यामुळे पुणे मेट्रोच्या बांधकामावरील पत्रे उडून गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मेट्रोच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1
- आई ती असते जी संघर्षांमध्येही कधी हार मानत नाही. परमेश्वराने आपल्याला जगातील सर्वात प्रेमळ आणि शक्तिशाली माता दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानूया.4
- मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय गायिका श्रेया घोषाला तिच्या गाण्यांमधून आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. 'मेंदीच्या पानावर' सारख्या गाण्यांमधून तिचा मधुर आवाज आजही अनेकांना भुरळ घालतो.1