पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 'विचार प्रबोधन पर्व' आणि 'पुण्यश्लोक' महानाट्याला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १ जून २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त हजारो नागरिकांनी त्यांना अभिवादन केले. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो' अशा घोषणांनी नाट्यगृह दुमदुमले होते, तर पारंपरिक ढोल पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली. धनगरी नृत्यासह पिंगळा आणि वासुदेव यांसारख्या कलाकारांनी विविध प्रसंगांतून अहिल्यादेवींचे कार्य सादर करत रसिकांची टाळ्यांची दाद मिळवली. महापालिकेच्या वतीने सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात 'पुण्यश्लोक' या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ७५ कलाकारांनी सादर केलेल्या या महानाट्यातून अहिल्यादेवींचे दूरदर्शी नेतृत्व, प्रजेप्रती असलेली अपार बांधिलकी, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन आणि समाजहितासाठी केलेले कार्य यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महानाट्याची सुरुवात झाली. यावेळी नगरसदस्य माऊली जगताप, कार्यकारी अभियंता विजय भोजने, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह माजी नगरसदस्य राजू दुर्गे, पुण्यश्लोक फाउंडेशनचे धनंजय तानले, सामाजिक कार्यकर्ते अशोक खरात, सूर्यकांत गोफणे, नवनाथ बिडे, अभिमन्यू गाडेकर, विना सोनवलकर, अजय दुधभाते, बिरू व्हनमाने, सचिन सरक, दिपक भोजने, भरत महानवर, विजय महानवर, सुनील माने, विजय अर्जुन, सुमेध कावळे, देवराम बिरगड, विठ्ठल देवकाते आणि अन्य नागरिक उपस्थित होते. नेत्रदीपक अभिनय, भव्य नेपथ्य, सुरेख प्रकाशयोजना आणि भावस्पर्शी संगीताच्या माध्यमातून साकारलेल्या या महानाट्याने प्रेक्षकांना इतिहासाच्या वैभवशाली दालनात घेऊन जाण्याचा अविस्मरणीय अनुभव दिला. याच जयंतीनिमित्त, मोरवाडी चौक, पिंपरी येथे 'विचार प्रबोधन पर्व' अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अंबादास पडळकर आणि त्यांच्या ३० सहकाऱ्यांनी आकर्षक गजनृत्य सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सामना ढोलपथक, मुंबई यांनी ढोलवादनातून अहिल्यादेवी होळकरांना अनोखे अभिवादन केले. 'सुवर्ण महाराष्ट्राचा लोकोत्सव' या विशेष कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले. भूपाळी, वासुदेव, पिंगळा, वाघ्या-मुरळी, धनगरी नृत्य, शाहिरी पोवाडे, आदिवासी आणि डोंबारी अशा विविध लोककला व व्यक्तीछटांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. शाहिरी कार्यक्रमातून अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर घडवून आणण्यात आला. या सर्व कार्यक्रमांमधून लोककला, इतिहास आणि सांस्कृतिक वारसाचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळाली, तसेच अहिल्यादेवींचे जीवन आजच्या पिढीसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत असून त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने अंगीकारावा, असा संदेश देण्यात आला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 'विचार प्रबोधन पर्व' आणि 'पुण्यश्लोक' महानाट्याला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १ जून २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त हजारो नागरिकांनी त्यांना अभिवादन केले. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो' अशा घोषणांनी नाट्यगृह दुमदुमले होते, तर पारंपरिक ढोल पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली. धनगरी नृत्यासह पिंगळा आणि वासुदेव यांसारख्या कलाकारांनी विविध प्रसंगांतून अहिल्यादेवींचे कार्य सादर करत रसिकांची टाळ्यांची दाद मिळवली. महापालिकेच्या वतीने सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात 'पुण्यश्लोक' या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ७५ कलाकारांनी सादर केलेल्या या महानाट्यातून अहिल्यादेवींचे दूरदर्शी नेतृत्व, प्रजेप्रती असलेली अपार बांधिलकी, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन आणि समाजहितासाठी केलेले कार्य यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महानाट्याची सुरुवात झाली. यावेळी नगरसदस्य माऊली जगताप, कार्यकारी अभियंता विजय भोजने, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह माजी नगरसदस्य राजू दुर्गे, पुण्यश्लोक फाउंडेशनचे धनंजय तानले, सामाजिक कार्यकर्ते अशोक खरात, सूर्यकांत गोफणे, नवनाथ बिडे, अभिमन्यू गाडेकर, विना सोनवलकर, अजय दुधभाते, बिरू व्हनमाने, सचिन सरक, दिपक भोजने,
भरत महानवर, विजय महानवर, सुनील माने, विजय अर्जुन, सुमेध कावळे, देवराम बिरगड, विठ्ठल देवकाते आणि अन्य नागरिक उपस्थित होते. नेत्रदीपक अभिनय, भव्य नेपथ्य, सुरेख प्रकाशयोजना आणि भावस्पर्शी संगीताच्या माध्यमातून साकारलेल्या या महानाट्याने प्रेक्षकांना इतिहासाच्या वैभवशाली दालनात घेऊन जाण्याचा अविस्मरणीय अनुभव दिला. याच जयंतीनिमित्त, मोरवाडी चौक, पिंपरी येथे 'विचार प्रबोधन पर्व' अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अंबादास पडळकर आणि त्यांच्या ३० सहकाऱ्यांनी आकर्षक गजनृत्य सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सामना ढोलपथक, मुंबई यांनी ढोलवादनातून अहिल्यादेवी होळकरांना अनोखे अभिवादन केले. 'सुवर्ण महाराष्ट्राचा लोकोत्सव' या विशेष कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले. भूपाळी, वासुदेव, पिंगळा, वाघ्या-मुरळी, धनगरी नृत्य, शाहिरी पोवाडे, आदिवासी आणि डोंबारी अशा विविध लोककला व व्यक्तीछटांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. शाहिरी कार्यक्रमातून अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर घडवून आणण्यात आला. या सर्व कार्यक्रमांमधून लोककला, इतिहास आणि सांस्कृतिक वारसाचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळाली, तसेच अहिल्यादेवींचे जीवन आजच्या पिढीसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत असून त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने अंगीकारावा, असा संदेश देण्यात आला.
- पुणे विधान परिषद निवडणुकीत होणारी लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी नसेल. या निवडणुकीत मुख्य सामना महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच पाहायला मिळेल.1
- केशव सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. या वीज समस्येमुळे शेतकरी सध्या त्रस्त आहेत.1
- पिंपरी-चिंचवड येथील भोसरी परिसरातून तृतीयपंथी समाजसेविका सोनी बाबू वाघमारे यांनी काही व्यक्तींविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी खंडणीची मागणी, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, बदनामी आणि मानसिक छळ अशा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींकडून वाघमारे यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करण्यात येत असून, ती पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. याशिवाय, तक्रारदार, त्यांच्या कुटुंबीयांना आणि शिष्यांना त्रास देणे, त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण करणे आणि त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाघमारे यांनी काही व्यक्तींची नावे नमूद करत त्यांच्याकडून संघटित पद्धतीने छळ केला जात असल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सांगत, सोनी बाबू वाघमारे यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांची पोलीस प्रशासनाकडून पडताळणी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच यातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.1
- पिंपरी चिंचवडमधील म्हाळुंगे सावरदरी येथील 'टाईने रिबेल' या नव्याने स्थापन होत असलेल्या बीअर कंपनीतून ३६ लाख रुपये किमतीच्या १० बीअर स्टोअरेज टँकची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलिसांनी यशस्वीरित्या छडा लावला असून, या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, कंपनीच्या एका विश्वासू माजी कामगारानेच या चोरीचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. फिर्यादी विवेक खैरे यांना सुमारे ४० दिवसांनंतर या चोरीची माहिती मिळाल्याने पोलिसांना तपासासाठी कोणताही थेट दुवा उपलब्ध नव्हता. मात्र, पोलीस पथकाने परिसरातील जवळपास ३० ते ३५ कंपन्यांचे ६०० GB पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे संशयित क्रेन आणि ट्रकची ओळख पटवण्यात आली. तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी कंपनीचा माजी कामगार प्रसाद विनोद राजळे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात मुख्य सूत्रधार प्रसाद राजळे याच्यासह चोरीला मदत करणारे आणि मुद्देमाल खरेदी करणारे चंदन अर्जुन सिंग, अली अहमद चौधरी, फिरोज असगर अली खान, किसनकुमार सुभाषचंद्र गुप्ता आणि नियाज मोहम्मद इसराईल यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून कुदळवाडी, चिखली आणि मुंब्रा येथून चोरीला गेलेल्या ३६ लाख रुपये किमतीच्या सर्व १० स्टील टाक्या यशस्वीरित्या जप्त केल्या आहेत.1
- ८९ टक्के दिव्यांग असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला घराघरांत जाऊन जनगणनेचे काम करण्याचे आदेश देण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आणि सामाजिक संघटनांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणी सामाजिक संघटनांनी प्रशासनाला जाब विचारला असून त्यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.1
- पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील सारोळा परिसरात एका भीषण अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. कॉलेजमध्ये प्रवेशाची स्वप्ने उराशी बाळगून घराबाहेर पडलेले हे तरुण घरी परतलेच नाहीत. अवघ्या तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या नव्या दुचाकीवरून कॉलेजचे ॲडमिशन करून परत येत असताना, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या दोन मित्रांना आपला जीव गमवावा लागला. सारोळा येथील या भीषण अपघातामुळे नायगाव आणि शिरवळ परिसरात शोककळा पसरली आहे.1
- शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील कर्डे घाट परिसरात सोमवारी सायंकाळी भररस्त्यात झालेल्या थरारक गोळीबार आणि हल्ल्यात शिरूर येथील विशाल काळे (वय ३०) याचा मृत्यू झाला असून, केदार झाडगे जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिरूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी गावच्या हद्दीत न्हावरा फाटा-न्हावरा मार्गावरील राजस्थान ढाब्यासमोर सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. विशाल काळे, उमेश अनिल जगदाळे (वय २६) आणि केदार झाडगे हे तिघे जण टोयोटा टायझर (एमएच १२ एक्सक्यू ५१०४) या कारमधून न्हावऱ्याकडून शिरूरकडे जात होते. त्यावेळी न्हावरा फाटा बाजूकडून आलेल्या किया सोनेट (एमएच १४ एलए ११२८) या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर सोनेटमधून उतरलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी टोयोटा कारच्या पुढील काचेवर चार राउंड गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यानंतर तिघेही कारमधून उतरून जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांपैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पुन्हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी विशाल काळे हा मृतावस्थेत आढळून आला, त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मोठ्या दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा दिसून आल्या. मृतदेहाजवळ दोन रिकामी काडतुसे आणि काही मोठे दगड आढळले आहेत. केदार झाडगे याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शिरूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश जगदाळे हा घटनेच्या वेळी घटनास्थळावरून पळून गेला होता; मात्र तो नंतर पोलिसांसमोर हजर झाला. घटनेनंतर आरोपी किया सोनेट कार आणि मोटारसायकलवरून पसार झाले. शिरूर पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली असून फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. आरोपी सनी यादव आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विशाल काळे तसेच संशयित आरोपी सनी यादव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या घटनेमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्याचा तपास सुरू आहे. या निर्घृण हत्येमुळे शिरूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात या हल्ल्यामागील सूत्रधार आणि अन्य सहभागी आरोपींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.2
- माजी अर्थमंत्री आणि आमदार जयंत पाटील यांनी 'लाडकी बहीण योजना' आणि 'जलजीवन मिशन योजना' या सरकारी योजनांवर तीव्र टीका केली आहे. त्यांच्या मते, या दोन्ही योजनांचा फोलपणा आता जनतेसमोर उघड झाला आहे.1