logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्याकडून उष्मघात उपाय योजने बाबत आढाव बैठक आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात उष्माघात उपाययोजनांबाबत आढावा उष्माघात दक्षतेबाबत जनजागृती करा; यंत्रणा सुसज्ज ठेवा जिल्हाधिका-यांचे निर्देश अकोला, दि. १५ : जिल्ह्यात वाढते तापमान, उष्मालाटेचा इशारा लक्षात घेता दक्षतेबाबत प्रभावी जनजागृती करावी, तसेच सर्व रूग्णालये, यंत्रणा सुसज्ज ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. उष्माघात उपाययोजनांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आरती फुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.संजय सोनूने आदी यावेळी उपस्थित होते. प्रत्येक आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यात शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्रा. आ. केंद्र येथे 137 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ओआरएस व औषधसाठा पुरेसा ठेवावा. त्याचप्रमाणे, नागरिकांमध्ये उष्माघातापासून दक्षता बाळगण्याबाबत प्रभावी जनजागृती करावी. ग्रामीण भागात दवंडी देऊन जनजागृती करावी महापालिका क्षेत्रात कचरा घंटागाडीमार्फत माहिती द्यावी. त्याचप्रमाणे, शहरात व जिल्ह्यात होर्डिंग्ज, सूचना, ध्वनीचित्रफीती आदींद्वारे प्रभावी जनजागृती करावी. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. कामगारांसाठी आस्थापनांनी पेयजल, कुलर आदी सुविधा ठेवाव्यात. उन्हात काम करणे टाळावे. उन्हात जास्त वेळ श्रमाची कामे करणे, कारखान्यांच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यांतील कामे किंवा जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णाचे शरीर तापमान कमी करण्यासाठी जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत. शरीराला घाम येणे, जास्त तहान लागणे, त्वचा कोरडी पडणे, १०२ अंशांपेक्षा जास्त ताप येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, अस्वस्थता, उलटी किंवा बेशुद्धावस्था ही उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. डॉ. मेश्राम, आर डी सी मालथने,डॉ.जावेद खान आदी उपस्थित होते. उष्माघात टाळण्यासाठी उपाय: * डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. * हलक्या रंगाचे सुती कपडे घालावेत. * दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घरातच राहावे. * भरपूर पाणी पिण्यासोबत ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यांचे सेवन करावे. टाळावयाच्या गोष्टी: * दुपारी १२ ते ४ दरम्यान उन्हात काम करणे टाळावे. * अनवाणी उन्हात चालू नये. * लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद गाडीत ठेवू नये. * मद्य, चहा, कॉफी व जास्त साखरयुक्त किंवा कार्बोनेटेड पेये टाळावीत. आरोग्य विभागामार्फत पोस्टर, बॅनर आणि हस्तपत्रिकांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. उष्माघात टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी केले आहे

11 hrs ago
user_महेंद्र कुमार महाजन
महेंद्र कुमार महाजन
Yoga instructor रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मंठा तालुक्यातील नवनिर्वाचित नगरसेवक शरद भाऊ मोरे यांचा भोंगाने दहिफळ गावच्या वतीने व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद गावातील ग्रामस्थ यांचा सहभाग होता.
    1
    मंठा तालुक्यातील नवनिर्वाचित नगरसेवक शरद भाऊ मोरे यांचा भोंगाने दहिफळ गावच्या वतीने व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद गावातील ग्रामस्थ यांचा सहभाग होता.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार मंठा, जालना, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Amol Gawai
    3
    Post by Amol Gawai
    user_Amol Gawai
    Amol Gawai
    Farmer चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाईसाहेब यांच्या ३७० व्या विवाह सोहळ्याच्या स्मृतींना उजाळा देणारा उत्सव आज करवंड येथे संपन्न झाले.
    1
    छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाईसाहेब यांच्या ३७० व्या विवाह सोहळ्याच्या स्मृतींना उजाळा देणारा उत्सव आज करवंड येथे संपन्न झाले.
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात **अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे** आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामुळे संपूर्ण डासाळा परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने आणि भक्तीरसाने न्हाऊन निघाला आहे. साप्ताहिकाच्या कालावधीत दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी विष्णूसहस्त्रनाम, दुपारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि सायंकाळी हरिपाठ असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. रात्री प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने होत असून, या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. ### **उत्सवाची वैशिष्ट्ये:** * **शिस्तबद्ध नियोजन:** गावातील तरुण मंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे चोख नियोजन करण्यात आले आहे. * **सामुदायिक भोजन:** दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून, संपूर्ण गाव एकत्र येऊन प्रसादाचा लाभ घेत आहे. * **हरिपाठ सोहळा:** सायंकाळी होणाऱ्या हरिपाठात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण मोठ्या तन्मयतेने सहभागी होत आहेत. या सप्ताहाची सांगता भव्य **काल्याच्या कीर्तनाने** आणि महाप्रसादाने होणार आहे. 'विठ्ठल विठ्ठल' च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात डासाळा गाव भक्तिमय झाले असून, या धार्मिक कार्यामुळे गावातील सामाजिक एकता अधिक वृद्धिंगत होताना दिसत आहे. ग्रामस्थांच्या वतीने परिसरातील सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात **अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे** आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामुळे संपूर्ण डासाळा परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने आणि भक्तीरसाने न्हाऊन निघाला आहे.
साप्ताहिकाच्या कालावधीत दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी विष्णूसहस्त्रनाम, दुपारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि सायंकाळी हरिपाठ असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. रात्री प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने होत असून, या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
### **उत्सवाची वैशिष्ट्ये:**
* **शिस्तबद्ध नियोजन:** गावातील तरुण मंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे चोख नियोजन करण्यात आले आहे.
* **सामुदायिक भोजन:** दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून, संपूर्ण गाव एकत्र येऊन प्रसादाचा लाभ घेत आहे.
* **हरिपाठ सोहळा:** सायंकाळी होणाऱ्या हरिपाठात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण मोठ्या तन्मयतेने सहभागी होत आहेत.
या सप्ताहाची सांगता भव्य **काल्याच्या कीर्तनाने** आणि महाप्रसादाने होणार आहे. 'विठ्ठल विठ्ठल' च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात डासाळा गाव भक्तिमय झाले असून, या धार्मिक कार्यामुळे गावातील सामाजिक एकता अधिक वृद्धिंगत होताना दिसत आहे.
ग्रामस्थांच्या वतीने परिसरातील सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Nishikant rodge
    Nishikant rodge
    Farmer Selu, Parbhani•
    22 hrs ago
  • परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
    1
    परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
    1
    जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    15 hrs ago
  • Post by Turab Sayyad
    1
    Post by Turab Sayyad
    user_Turab Sayyad
    Turab Sayyad
    Photographer सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत बाईक रॅली
    1
    नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत बाईक रॅली
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.