logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खालसा म्हाळुंगे-मलंगड येथे जिवंत कासव, साळींदराचे मांस जप्त; दोघांना अटक, दोघे फरार वनपथकाची धडक कारवाई; शिकारीचे साहित्य व मोबाईलसह १ लाख १८ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त चंदगड प्रतिनिधी : संजय आगाशे चंदगड तालुक्यातील पाटणे वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील तुडयेपासून काही अंतरावर असलेल्या खालसा म्हाळुंगे-मलंगड येथे वनपथकाने धडक कारवाई करत एका घरावर छापा टाकला. या कारवाईत जिवंत कासव तसेच साळींदराची शिकार करून त्याचे मांस शिजविले जात असल्याचे निदर्शनास आले. वनपथकाने घटनास्थळावरून साळींदराचे शिल्लक मांस, शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य, मोबाईल फोन तसेच मांस शिजविण्यासाठी वापरलेली भांडी असा एकूण १ लाख १८ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वनपथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खालसा म्हाळुंगे-मलंगड येथील एका घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी घरामध्ये जिवंत कासव पकडून ठेवलेले आढळून आले. तसेच साळींदराची शिकार करून त्याचे मांस शिजविले जात असल्याचेही वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर वनविभागाने तातडीने कारवाई करत संबंधित साहित्य व मुद्देमाल ताब्यात घेतला. वनपथकाच्या कारवाईदरम्यान संशयितांपैकी दोघे जण घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणात पुंडलिक निंगाप्पा गुरव (वय ४६, रा. खालसा म्हाळुंगे-मलंगड, ता. चंदगड, मूळ रा. गोल्याळी, ता. खानापूर, जि. बेळगाव), देवाप्पा बाबू कुलम (वय ३४), रामलिंग धोंडीबा गवस (वय ३१) आणि तुकाराम शंकर गावडे (वय ४०, तिघेही रा. गोल्याळी, ता. खानापूर, जि. बेळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून दोघे जण फरार झाले आहेत. ही कारवाई पाटणे वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल शितल पाटील, वनपाल वर्षा पावसकर, जॉन्सन डिसोझा, बाळासाहेब भांडकोळी, वनरक्षक श्रेया रायके यांच्यासह अन्य वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. दरम्यान, घटनास्थळावरून फरार झालेल्या दोन्ही संशयितांचा वनविभागाकडून शोध सुरू आहे. वन्यजीवांची शिकार व त्यांची बेकायदेशीर विक्री अथवा तस्करी करणाऱ्यांविरोधात वनविभागाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. या कारवाईमुळे वन्यजीव संरक्षणाबाबत वनविभागाची दक्षता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

3 hrs ago
user_Sanjay Aagashe
Sanjay Aagashe
Accountant चांदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पिकासाठी राबले दिवसरात्र, हातात मात्र शून्य; चोपड्यात मूग पिकावर वखर
    1
    पिकासाठी राबले दिवसरात्र, हातात मात्र शून्य; चोपड्यात मूग पिकावर वखर
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे
    1
    जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे
अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला
    1
    खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . 
खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!
    1
    कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    11 hrs ago
  • शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण जाहीर -शिक्षकमंत्री दादाजी भुसे विक्रम शिंदे /भोर दि. 26 राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय घेतला असून खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, जाहीर केले आहे. यामुळे मात्र क्लासचालकांची धाकधूक वाढली आहे.
    1
    शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण जाहीर -शिक्षकमंत्री दादाजी भुसे 
विक्रम शिंदे /भोर दि. 26
राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय घेतला असून खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, जाहीर केले आहे. यामुळे मात्र क्लासचालकांची धाकधूक वाढली आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • नेपाळ मधील आलेल्या पुराचे रौद्र रूप. डोळ्यात पाणी आणणारी दृश्य.
    1
    नेपाळ मधील आलेल्या पुराचे रौद्र रूप. डोळ्यात पाणी आणणारी दृश्य.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    55 min ago
  • 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..
    1
    🚨 BARAMATI CRIME :  “जंगल अपना, कानून भी अपना…!”  हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 

🚨 BARAMATI CRIME :  “जंगल अपना, कानून भी अपना…!”  हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 
बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • शॉर्टसर्किटचा भडका! बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत आग; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद!
    1
    शॉर्टसर्किटचा भडका! बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत आग; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद!
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.