Shuru
Apke Nagar Ki App…
नेपाळ मधील आलेल्या पुराचे रौद्र रूप. डोळ्यात पाणी आणणारी दृश्य.
Shoukat Shaikh
नेपाळ मधील आलेल्या पुराचे रौद्र रूप. डोळ्यात पाणी आणणारी दृश्य.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नेपाळ मधील आलेल्या पुराचे रौद्र रूप. डोळ्यात पाणी आणणारी दृश्य.1
- 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..1
- जगाला टेक्नॉलॉजी देणारी हिंजवडी मूलभूत सुविधांसाठी त्रस्त; IT अभियंते उतरणार रस्त्यावर..! हिंजवडी पुणे : चाकण MIDCतील लघुउद्योजकांच्या आंदोलनानंतर आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत मूलभूत सुविधांचा अभाव, वाहतूक कोंडी, खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला आहे. याच प्रश्नांवर येत्या 6 सप्टेंबरला आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. हिंजवडी... देशाच्या आयटी क्षेत्राची ओळख बनलेलं पुण्याचं महत्त्वाचं केंद्र... हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या या आयटी हबमध्ये दररोज लाखो कर्मचारी कामासाठी येतात... मात्र कार्यालयात पोहोचण्याआधीच त्यांना रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय. कुठे तासन्तास वाहतूक कोंडी... कुठे रस्त्यांवर जीवघेणे खड्डे... तर कुठे अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अपघातांचा धोका... याच समस्यांमुळे आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांचा संयम सुटला आहें. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, वारंवार प्रशासनाकडे तक्रारी आणि पाठपुरावा करूनही समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. गेल्या दीड वर्षात रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांमुळे 37 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांकडून केला जातोय. एकीकडे हिंजवडीत सुमारे 800 कंपन्या आणि लाखो आयटी अभियंते मोठ्या प्रमाणावर कर भरतात... मात्र त्या तुलनेत मूलभूत सुविधा मिळत नसल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे, चाकण MIDCतील 20 लघुउद्योजकांनी कंपन्या बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकार आणि प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या. मग हिंजवडीतील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागणार का? हा सवाल आता आयटी अभियंते उपस्थित करत आहेत. हिंजवडी सोडून कंपन्या आणि कर्मचारी जाण्याची वेळ आल्यानंतर सरकार जागं होणार का..? की त्याआधीच या समस्यांवर तोडगा काढला जाणार? याच मागण्यांसाठी येत्या 6 सप्टेंबरला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जगाला टेक्नॉलॉजी देणाऱ्या हिंजवडीला मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय... त्यामुळे प्रश्न फक्त वाहतूक कोंडीचा नाही... प्रश्न आहे—हिंजवडीसारख्या जागतिक दर्जाच्या आयटी हबच्या पायाभूत सुविधांचा! आता आयटी अभियंत्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तरी प्रशासन जागं होणार का..? #Hinjewadi #HinjewadiITPark #Pune #PuneNews #ITEngineers #ITEmployees #HinjewadiNews #PuneTraffic #HinjewadiTraffic #RoadProblems #Potholes #Infrastructure #ITPark #Protest #Andolan #6September #MaharashtraNews #PuneUpdates #TheNayakNews #न्यूज #हिंजवडी #पुणे #आंदोलन1
- "त्या देशातून आपल्याला पैसाही परत आणता येत नाही...; लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो..!"1
- भटक्या कुत्र्यांचा हैदोस! आईवर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला... पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस कायम असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. एका चिमुरड्याला घेऊन जात असलेल्या आईवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे आईच्या हातातून एक वर्षांचा चिमुरडा निसटून थेट रस्त्यावर पडला. सुदैवाने मुलाला गंभीर इजा झाली नाही. मात्र, आई अमृता बसन्नावार या हल्ल्यात जखमी झाल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या प्रभागातच ही घटना घडल्याने भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीवरून महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता महापालिका ठोस पावलं उचलणार का, हा सवाल आहे... #भटक्याकुत्रे #कुत्र्यांचाहल्ला #पिंपरीचिंचवड #DogAttack #StrayDogs #PCMC #पिंपरीचिंचवडमहापालिका #नागरिकसुरक्षा #CCTV #भटक्याकुत्र्यांचीदहशत #कुत्र्यांचाउपद्रव #महापालिका #PCMCNews #PimpriChinchwadNews #MaharashtraNews #TheNayakNews1
- अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे1
- निर्वी येथे NH-548D मार्गावर दुचाकीचा अपघात; बाप्पू धुमाळ जखमी निर्वी : NH-548D निर्वी–जामखेड मार्गावर आज, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप्पू धुमाळ, रा. धुमाळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पू धुमाळ हे Hero Splendor दुचाकी क्रमांक MH-12-OB-5976 वरून प्रवास करत असताना निर्वी परिसरात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमी बाप्पू धुमाळ यांना तातडीने न्हावरे येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शिरूर येथे पाठवण्यात आले. अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले. या अपघातामुळे NH-548D निर्वी–जामखेड मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.4
- हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत विषारी दारू सेवनामुळे घडलेल्या दुर्घटनेत तब्बल २२ नागरिकांचे बळी गेले होते, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. गुन्ह्यांची नोंद व पार्श्वभूमी: सदर प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये खालीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत: हडपसर पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ३७९/२०२६ दापोडी पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ११४/२६, कलम १०५, १२३, १२५ भारतीय न्याय संहिता कारवाई आणि आरोपीला अटक: गुन्ह्यातील पाहिजे असलेला सराईत आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) हा शिंदवणे व शिंदवणे घाट परिसरात येणार असल्याची आणि तो पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेषांतर करून व रूप बदलून फिरत असल्याबाबतची अत्यंत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून शोध घेतला असता, आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे हा पुरंदर तालुक्यातील राजेवाडी गावी वेषांतर करून, रूप बदलून आणि आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलून त्या ठिकाणावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तातडीने सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याची ओळख पटवून उरूळी कांचन पोलीस ठाण्यात आणले. सद्यस्थितीत सदर कारवाई उरूळी कांचन पोलीस ठाणे व सी.आय.डी. पुणे यांनी संयुक्तपणे केली असून, आरोपीला पुढील तपासकामी सी.आय.डी. पुणे पथकाचे प्रमुख डी.वाय.एस.पी. शामराव काळे व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी: सदरची संपूर्ण कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली: श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) शफकत अमना (पोलीस अधीक्षक, सी.आय.डी. पुणे घटक) श्री. गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक) श्री. बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग, पुणे ग्रामीण) तपास पथकातील अधिकारी व अंमलदार: गुन्ह्याची गोपनियता पाळून आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या उरूळी कांचन पोलीस स्टेशनच्या विशेष पथकात खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता: विजयमाला पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) पांडुरंग पवार (सहायक पोलीस निरीक्षक) अजिनाथ शिंदे (पोलीस उपनिरीक्षक) रमेश भोसले (सहायक फौजदार) सोमनाथ चितारे (पोलीस हवालदार) सचिन जगताप (पोलीस हवालदार) कमलेश होले (पोलीस हवालदार) अक्षय कामठे (पोलीस शिपाई) ऋषिकेश रासकर (पोलीस शिपाई) संजय दाणे (पोलीस शिपाई) सोमनाथ सुपेकर (पोलीस शिपाई)1