भटक्या कुत्र्यांचा हैदोस! आईवर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला... पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस कायम असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. एका चिमुरड्याला घेऊन जात असलेल्या आईवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे आईच्या हातातून एक वर्षांचा चिमुरडा निसटून थेट रस्त्यावर पडला. सुदैवाने मुलाला गंभीर इजा झाली नाही. मात्र, आई अमृता बसन्नावार या हल्ल्यात जखमी झाल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या प्रभागातच ही घटना घडल्याने भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीवरून महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता महापालिका ठोस पावलं उचलणार का, हा सवाल आहे... #भटक्याकुत्रे #कुत्र्यांचाहल्ला #पिंपरीचिंचवड #DogAttack #StrayDogs #PCMC #पिंपरीचिंचवडमहापालिका #नागरिकसुरक्षा #CCTV #भटक्याकुत्र्यांचीदहशत #कुत्र्यांचाउपद्रव #महापालिका #PCMCNews #PimpriChinchwadNews #MaharashtraNews #TheNayakNews
भटक्या कुत्र्यांचा हैदोस! आईवर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला... पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस कायम असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. एका चिमुरड्याला घेऊन जात असलेल्या आईवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे आईच्या हातातून एक वर्षांचा चिमुरडा निसटून थेट रस्त्यावर पडला. सुदैवाने मुलाला गंभीर इजा झाली नाही. मात्र, आई अमृता बसन्नावार या हल्ल्यात जखमी झाल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या प्रभागातच ही घटना घडल्याने भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीवरून महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता महापालिका ठोस पावलं उचलणार का, हा सवाल आहे... #भटक्याकुत्रे #कुत्र्यांचाहल्ला #पिंपरीचिंचवड #DogAttack #StrayDogs #PCMC #पिंपरीचिंचवडमहापालिका #नागरिकसुरक्षा #CCTV #भटक्याकुत्र्यांचीदहशत #कुत्र्यांचाउपद्रव #महापालिका #PCMCNews #PimpriChinchwadNews #MaharashtraNews #TheNayakNews
- जगाला टेक्नॉलॉजी देणारी हिंजवडी मूलभूत सुविधांसाठी त्रस्त; IT अभियंते उतरणार रस्त्यावर..! हिंजवडी पुणे : चाकण MIDCतील लघुउद्योजकांच्या आंदोलनानंतर आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत मूलभूत सुविधांचा अभाव, वाहतूक कोंडी, खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला आहे. याच प्रश्नांवर येत्या 6 सप्टेंबरला आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. हिंजवडी... देशाच्या आयटी क्षेत्राची ओळख बनलेलं पुण्याचं महत्त्वाचं केंद्र... हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या या आयटी हबमध्ये दररोज लाखो कर्मचारी कामासाठी येतात... मात्र कार्यालयात पोहोचण्याआधीच त्यांना रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय. कुठे तासन्तास वाहतूक कोंडी... कुठे रस्त्यांवर जीवघेणे खड्डे... तर कुठे अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अपघातांचा धोका... याच समस्यांमुळे आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांचा संयम सुटला आहें. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, वारंवार प्रशासनाकडे तक्रारी आणि पाठपुरावा करूनही समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. गेल्या दीड वर्षात रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांमुळे 37 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांकडून केला जातोय. एकीकडे हिंजवडीत सुमारे 800 कंपन्या आणि लाखो आयटी अभियंते मोठ्या प्रमाणावर कर भरतात... मात्र त्या तुलनेत मूलभूत सुविधा मिळत नसल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे, चाकण MIDCतील 20 लघुउद्योजकांनी कंपन्या बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकार आणि प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या. मग हिंजवडीतील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागणार का? हा सवाल आता आयटी अभियंते उपस्थित करत आहेत. हिंजवडी सोडून कंपन्या आणि कर्मचारी जाण्याची वेळ आल्यानंतर सरकार जागं होणार का..? की त्याआधीच या समस्यांवर तोडगा काढला जाणार? याच मागण्यांसाठी येत्या 6 सप्टेंबरला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जगाला टेक्नॉलॉजी देणाऱ्या हिंजवडीला मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय... त्यामुळे प्रश्न फक्त वाहतूक कोंडीचा नाही... प्रश्न आहे—हिंजवडीसारख्या जागतिक दर्जाच्या आयटी हबच्या पायाभूत सुविधांचा! आता आयटी अभियंत्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तरी प्रशासन जागं होणार का..? #Hinjewadi #HinjewadiITPark #Pune #PuneNews #ITEngineers #ITEmployees #HinjewadiNews #PuneTraffic #HinjewadiTraffic #RoadProblems #Potholes #Infrastructure #ITPark #Protest #Andolan #6September #MaharashtraNews #PuneUpdates #TheNayakNews #न्यूज #हिंजवडी #पुणे #आंदोलन1
- "त्या देशातून आपल्याला पैसाही परत आणता येत नाही...; लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो..!"1
- मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧 भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧 भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा, वसतिगृह, प्रशिक्षण केंद्रे आणि शहरातील संवेदनशील भागांत गस्त सुरू झाली आहे. हीच अपेक्षा होती — मुलींना सुरक्षित वातावरण, निर्भय शिक्षण आणि सक्षम भविष्य! पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, दामिनी पथक आणि भोकरदन पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार! 🙏 मुली शाळेत जातील… शिकतील… सक्षम होतील! ✊ #प्रा_सौ_अनिता_अंकुश_जाधव1
- लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! रक्षाबंधनाआधीच सरकारची ओवाळणी | Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी... लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच सरकारनं ओवाळणी दिलीय... लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय.... सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्यांच वितरण सुरु करण्यात आलंय... ladki bahin yojana, ladki bahin yojana latest news, mukhyamantri majhi ladki bahin yojana, ladki bahin 1500, ladki bahin installment, ladki bahin july installment, ladki bahin payment, ladki bahin money credited, maharashtra ladki bahin, ladki bahin scheme, ladki bahin yojana update, women scheme maharashtra, maharashtra government scheme, ladki bahin news, raksha bandhan, maharashtra news,1
- खालुंब्रे गावात गुटख्याची खुलेआम विक्री? पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह1
- लांडेवाडी भोसरी ब्रिज उड्डाणपूल याच्याबद्दल थोडीशी माहिती पिंपरी-चिंचवडमधील या उड्डाणपुलाच्या बांधकामाची सुरुवात 2009 च्या सुमारास झाली. सुरुवातीचा अंदाज ₹12 ते ₹15 कोटी होता; नंतर खर्च वाढून सुमारे ₹21.5 कोटी झाला. बांधकाम 2013 मध्ये पूर्ण झाले आणि जानेवारी 2014 मध्ये उद्घाटन झाल्याची नोंद आहे. सुरुवातीच्या अंदाजापेक्षा प्रत्यक्ष खर्चात मोठी वाढ झाल्याचे या कागदपत्रातून दिसते.1
- भटक्या कुत्र्यांचा हैदोस! आईवर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला... पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस कायम असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. एका चिमुरड्याला घेऊन जात असलेल्या आईवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे आईच्या हातातून एक वर्षांचा चिमुरडा निसटून थेट रस्त्यावर पडला. सुदैवाने मुलाला गंभीर इजा झाली नाही. मात्र, आई अमृता बसन्नावार या हल्ल्यात जखमी झाल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या प्रभागातच ही घटना घडल्याने भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीवरून महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता महापालिका ठोस पावलं उचलणार का, हा सवाल आहे... #भटक्याकुत्रे #कुत्र्यांचाहल्ला #पिंपरीचिंचवड #DogAttack #StrayDogs #PCMC #पिंपरीचिंचवडमहापालिका #नागरिकसुरक्षा #CCTV #भटक्याकुत्र्यांचीदहशत #कुत्र्यांचाउपद्रव #महापालिका #PCMCNews #PimpriChinchwadNews #MaharashtraNews #TheNayakNews1
- हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत विषारी दारू सेवनामुळे घडलेल्या दुर्घटनेत तब्बल २२ नागरिकांचे बळी गेले होते, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. गुन्ह्यांची नोंद व पार्श्वभूमी: सदर प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये खालीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत: हडपसर पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ३७९/२०२६ दापोडी पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ११४/२६, कलम १०५, १२३, १२५ भारतीय न्याय संहिता कारवाई आणि आरोपीला अटक: गुन्ह्यातील पाहिजे असलेला सराईत आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) हा शिंदवणे व शिंदवणे घाट परिसरात येणार असल्याची आणि तो पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेषांतर करून व रूप बदलून फिरत असल्याबाबतची अत्यंत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून शोध घेतला असता, आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे हा पुरंदर तालुक्यातील राजेवाडी गावी वेषांतर करून, रूप बदलून आणि आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलून त्या ठिकाणावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तातडीने सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याची ओळख पटवून उरूळी कांचन पोलीस ठाण्यात आणले. सद्यस्थितीत सदर कारवाई उरूळी कांचन पोलीस ठाणे व सी.आय.डी. पुणे यांनी संयुक्तपणे केली असून, आरोपीला पुढील तपासकामी सी.आय.डी. पुणे पथकाचे प्रमुख डी.वाय.एस.पी. शामराव काळे व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी: सदरची संपूर्ण कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली: श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) शफकत अमना (पोलीस अधीक्षक, सी.आय.डी. पुणे घटक) श्री. गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक) श्री. बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग, पुणे ग्रामीण) तपास पथकातील अधिकारी व अंमलदार: गुन्ह्याची गोपनियता पाळून आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या उरूळी कांचन पोलीस स्टेशनच्या विशेष पथकात खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता: विजयमाला पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) पांडुरंग पवार (सहायक पोलीस निरीक्षक) अजिनाथ शिंदे (पोलीस उपनिरीक्षक) रमेश भोसले (सहायक फौजदार) सोमनाथ चितारे (पोलीस हवालदार) सचिन जगताप (पोलीस हवालदार) कमलेश होले (पोलीस हवालदार) अक्षय कामठे (पोलीस शिपाई) ऋषिकेश रासकर (पोलीस शिपाई) संजय दाणे (पोलीस शिपाई) सोमनाथ सुपेकर (पोलीस शिपाई)1