मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून46/52 पालखेड चारीला उन्हाळी आवर्तन सुरू; पूर्व भागाला मोठा दिलासा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे येवला तालुक्यातील पालखेड चारी क्रमांक ४६/५२ ला अखेर उन्हाळी आवर्तन सुरू झाले आहे. अनेक वर्षांपासून या चारीचा उन्हाळ्यातील पाणीपुरवठा बंद असल्याने गवंडगाव व परिसरातील शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत नागरिकांनी मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेऊन मागणी केली होती. याची दखल घेत समीर भुजबळ यांनी कार्यकारी अभियंता श्री. भागवत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी, आज या चारीत पाणी सोडण्यात आले. या आनंदाप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते पालखेड कॅनॉल येथे जलपूजन करण्यात आले. या आवर्तनामुळे पूर्व भागातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थांनी भुजबळ कुटुंबियांचे आभार मानले आहेत. "शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अधिकाऱ्यांना सूचना दिल्यामुळे आज हे यश मिळाले असून, यामुळे तालुक्यातील पूर्व भागाला मोठा दिलासा मिळेल," अशी प्रतिक्रिया समीर भुजबळ यांनी व्यक्त केली.
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून46/52 पालखेड चारीला उन्हाळी आवर्तन सुरू; पूर्व भागाला मोठा दिलासा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे येवला तालुक्यातील पालखेड चारी क्रमांक ४६/५२ ला अखेर उन्हाळी आवर्तन सुरू झाले आहे. अनेक वर्षांपासून या चारीचा उन्हाळ्यातील पाणीपुरवठा बंद असल्याने गवंडगाव व परिसरातील शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत नागरिकांनी मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेऊन मागणी केली होती. याची दखल
घेत समीर भुजबळ यांनी कार्यकारी अभियंता श्री. भागवत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी, आज या चारीत पाणी सोडण्यात आले. या आनंदाप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते पालखेड कॅनॉल येथे जलपूजन करण्यात आले. या आवर्तनामुळे पूर्व भागातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थांनी भुजबळ कुटुंबियांचे आभार मानले आहेत. "शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अधिकाऱ्यांना सूचना दिल्यामुळे आज हे यश मिळाले असून, यामुळे तालुक्यातील पूर्व भागाला मोठा दिलासा मिळेल," अशी प्रतिक्रिया समीर भुजबळ यांनी व्यक्त केली.
- आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस उजाडूनही विकासकामांची बिले न मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील ठेकेदारांनी आज संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांची भेट घेऊन ठेकेदारांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. सध्या राज्यातील ठेकेदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. स्वत:चे भांडवल, कर्ज आणि उसनवारी करून ठेकेदारांनी सरकारी कामे पूर्ण केली. मात्र, लेखाशीर्षक ०४ आणि ०३ अंतर्गत असलेल्या कामांना एक रुपयाही निधी प्राप्त झालेला नाही. काही कामांना अत्यंत अल्प निधी मिळाल्याने आणि गेल्या दोन-तीन वर्षांपासून बिले थकल्याने बँकांचे हप्ते व देणी कशी फेडायची, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. याप्रसंगी रमेश शेठ शिरसाट, राजेंद्र पानसरे, आर. टी. शिंदे, अमोल मोरे, दत्ताजी शेलार, भगवान चित्ते, गोविंदराव गायके यांसह अनेक ठेकेदारांनी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. "शासनाने तातडीने लक्ष देऊन विकासकामांना हातभार लावणाऱ्या ठेकेदारांना न्याय द्यावा," अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुपारच्या सुमारास झालेल्या या आंदोलनाने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.1
- चांदवड तालुक्यातील पाटे गावातील वाल्मिक माधवराव कासव यांच्या मालकीचे शेत गट नंबर 173 मध्ये लोमकळणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किट मुळे दोन बिघे गव्हाला आग2
- Post by सुनिलआण्णा सोनवणे1
- Post by Anand Gangurde4
- Post by Afsjcjryued1
- Anant Singh के गांव में ता/बड़तोड़ फा/यरिंग, खुली चुनौती,बल्लव यादव को ठो/क दिया,मचा हड़कंप...1
- सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत असेच एक दृश्य डोंगरगाव गावामध्ये पाहायला मिळाले पावसा सहित गारपीट ही होत आहे1
- येवला-कोपरगाव रस्त्यावरील म्हसोबावाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 'श्री म्हसोबा महाराज यात्रा उत्सव' अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पाच गावांच्या शिवेवर वसलेले हे देवस्थान पंचक्रोशीत अत्यंत जागृत मानले जाते. यात्रेनिमित्त सकाळी कोपरगाव येथून कावडमध्ये गंगेचे पवित्र पाणी आणण्यात आले. गावाच्या मुख्य भागापासून वाजत-गाजत आणि डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुलांसह तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत 'म्हसोबा महाराज की जय'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या कावडच्या पाण्याने महाराजांना विधिवत अभिषेक घालण्यात आला. उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ह.भ.प. गोरख महाराज काळे (अंगणगावकर) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. १९८९ पासून सुरू असलेली ही यात्रा परंपरा म्हसोबावाडी, बदापूर, नांदेसर, आडगाव चोथवा आणि पारेगाव या पाच गावांच्या भाविकांकडून मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे. सध्या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून 'म्हसोबावाडी मित्र मंडळ' व ग्रामस्थ यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. बदापूर येथील तरुण भजनी मंडळाचा आदर्श या यात्रेचे भूषण ठरला. या सोहळ्यासाठी आबालवृद्ध आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला4