logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अंबाजोगाईत मध्यरात्री भीषण अग्नितांडव: सुरवसे बंधूंचे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरचे दुकान, गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी अंबाजोगाईत मध्यरात्री भीषण अग्नितांडव: सुरवसे बंधूंचे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरचे दुकान, गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान अंबाजोगाई येथील रिंगरोडवरील बँक कॉलनी परिसरात मध्यरात्री लागलेल्या एका भीषण आगीत लहू आणि अंकुश सुरवसे या दोन भावांनी अत्यंत कष्टाने उभा केलेले 'विराट इलेक्ट्रॉनिक्स अँड भांडी फर्निचर' हे दुकान, गोडाऊन आणि फर्निचर तयार करण्याचा कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप ती पूर्णपणे आटोक्यात आणली. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने ग्राहकांसाठी दुकानामध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडी आणि तयार फर्निचरचा मोठा साठा करून ठेवण्यात आला होता. तसेच कारखान्यातही नवीन फर्निचर बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, मध्यरात्री अचानक लागलेल्या या भीषण आगीने सर्व स्वप्नांची राख रांगोळी केली असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट होऊ शकले नाही. अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभा केलेला हा व्यवसाय डोळ्यादेखत भस्मसात होताना पाहून सुरवसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.

2 hrs ago
user_सालेम पठाण
सालेम पठाण
Counsellor अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
2 hrs ago
1c73ea5c-8a03-488a-b481-0064357b3088

अंबाजोगाईत मध्यरात्री भीषण अग्नितांडव: सुरवसे बंधूंचे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरचे दुकान, गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी अंबाजोगाईत मध्यरात्री भीषण अग्नितांडव: सुरवसे बंधूंचे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरचे दुकान, गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान अंबाजोगाई येथील रिंगरोडवरील बँक कॉलनी परिसरात मध्यरात्री लागलेल्या एका भीषण आगीत लहू आणि अंकुश सुरवसे या दोन भावांनी अत्यंत कष्टाने उभा केलेले 'विराट इलेक्ट्रॉनिक्स अँड भांडी फर्निचर' हे दुकान, गोडाऊन आणि फर्निचर तयार करण्याचा कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप ती पूर्णपणे आटोक्यात आणली. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने ग्राहकांसाठी दुकानामध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडी आणि तयार फर्निचरचा मोठा साठा करून ठेवण्यात आला होता. तसेच कारखान्यातही नवीन फर्निचर बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, मध्यरात्री अचानक लागलेल्या या भीषण आगीने सर्व स्वप्नांची राख रांगोळी केली असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट होऊ शकले नाही. अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभा केलेला हा व्यवसाय डोळ्यादेखत भस्मसात होताना पाहून सुरवसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ज्ञानेश्वर विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा ९७.५७%  दमदार निकाल लातूर, दि. 11 (प्रतिनिधी):- लातूर शहरातील शाहू चौक परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९७.५७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वैष्णवी पानहळवे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सृष्टी चव्हाण हिने ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांची संस्थाअध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष प्रल्हाद दूडीले, सचिव डी.एन. शेळके, कोषाध्यक्ष विनायक पिनाटे, सहसचिव विठ्ठल इगे, संचालक प्रा. प्रकाशराव शिंगाडे, नाथराव कोल्हे माधवराव गोलावार अनिरुद्ध शेळके हरिचंद्र निर्मित डॉक्टर सोपानराव जटाळ चंदुलाल बलवा यांच्यासह प्राचार्य संजय मलवाडे उप प्राचार्य माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत बैनगिरे, पूनम पाटील, संजय कासले, परीक्षा प्रमुख सुधाकर बुरगे, लिपिक अजय अरदवाड आदींनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    1
    ज्ञानेश्वर विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा ९७.५७%  दमदार निकाल
लातूर, दि. 11 (प्रतिनिधी):- लातूर शहरातील शाहू चौक परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९७.५७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
यावर्षी आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वैष्णवी पानहळवे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सृष्टी चव्हाण हिने ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
विशेष म्हणजे शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांची संस्थाअध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष प्रल्हाद दूडीले, सचिव डी.एन. शेळके, कोषाध्यक्ष विनायक पिनाटे, सहसचिव विठ्ठल इगे, संचालक प्रा. प्रकाशराव शिंगाडे, नाथराव कोल्हे माधवराव गोलावार अनिरुद्ध शेळके हरिचंद्र निर्मित डॉक्टर सोपानराव जटाळ चंदुलाल बलवा यांच्यासह प्राचार्य संजय मलवाडे उप प्राचार्य माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत बैनगिरे, पूनम पाटील, संजय कासले, परीक्षा प्रमुख सुधाकर बुरगे, लिपिक अजय अरदवाड आदींनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    43 min ago
  • 📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात. अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू. 📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात. अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू. मृत्यू झालेला तरुण हैद्राबाद येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न
    1
    📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात.
अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू.
📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात.
अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू.
मृत्यू झालेला तरुण हैद्राबाद येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    3 hrs ago
  • चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
    1
    चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.
    2
    लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.
    user_Mahesh NIKAM
    Mahesh NIKAM
    औसा, लातूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.
    user_RAFTAR HINDUSTAN KI
    RAFTAR HINDUSTAN KI
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक डिझेल टँकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून, कॅन-बाटल्या घेऊन डिझेल जमा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.
    1
    बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक डिझेल टँकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून, कॅन-बाटल्या घेऊन डिझेल जमा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आंबेजोगाई रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    1
    लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आंबेजोगाई रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.