अहमदपूर पोलिसांची सतर्कता, गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र चोरणाऱ्यांना पकडले अहमदपूर पोलिसांची सतर्कता ; बसस्थानकातील गर्दीत महिलेचे मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न फसला; चोरीला गेलेले मणी महिलेला मिळवून दिले अहमदपूर (प्रतिनिधी): अहमदपूर बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अयशस्वी ठरला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने चक्रे फिरवून नाकेबंदी केल्यामुळे चोरट्याला दागिना घेऊन पळता आले नाही आणि संबंधित महिलेला तिचे दागिने सुखरूप परत मिळाले. दि. १५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अहमदपूर बसस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. पिंपळदरी (ता. गंगाखेड) येथील रहिवासी सावित्राबाई विठ्ठल निरगुडे या अंबाजोगाईकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तोडले. मंगळसूत्र तुटल्याचे लक्षात येताच सावित्राबाईंनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी बसस्थानक परिसरात 'फिक्स्ड पॉईंट' ड्युटीवर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल गंगाधर चपडे हे आपल्या पथकासह सतर्कतेने गस्त घालत होते. आरडाओरड ऐकताच त्यांनी होमगार्ड कर्मचारी अमोल मुंडे, विलास कांबळे, बळीराम पोले आणि महिला होमगार्ड नीता सोळंके यांच्या मदतीने बसच्या आजूबाजूला वेढा घातला. पोलिसांनी तात्काळ परिसराचे निरीक्षण करून कोणालाही बाहेर जाऊ दिले नाही. पोलिसांच्या या कडक पवित्र्यामुळे चोरट्याला मंगळसूत्र घेऊन जाणे अशक्य झाले. त्यानंतर पाहणी केली असता, तुटलेल्या अवस्थेतील मंगळसूत्राचे मणी महिलेच्या जवळच सापडले. पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे पिंपळदरी येथील या महिलेचे मोठे आर्थिक नुकसान टळले आहे. अहमदपूर पोलिसांच्या या चोख कामगिरीबद्दल सावित्राबाई निरगुडे यांनी पोलिसांचे आभार मानले असून, प्रवाशांकडून पोलीस पथकाचे विशेष कौतुक होत आहे.
अहमदपूर पोलिसांची सतर्कता, गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र चोरणाऱ्यांना पकडले अहमदपूर पोलिसांची सतर्कता ; बसस्थानकातील गर्दीत महिलेचे मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न फसला; चोरीला गेलेले मणी महिलेला मिळवून दिले अहमदपूर (प्रतिनिधी): अहमदपूर बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अयशस्वी ठरला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने चक्रे फिरवून नाकेबंदी केल्यामुळे चोरट्याला दागिना घेऊन पळता आले नाही आणि संबंधित महिलेला तिचे दागिने सुखरूप परत मिळाले. दि. १५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अहमदपूर बसस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. पिंपळदरी (ता. गंगाखेड) येथील रहिवासी सावित्राबाई विठ्ठल निरगुडे या अंबाजोगाईकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तोडले. मंगळसूत्र तुटल्याचे लक्षात येताच सावित्राबाईंनी आरडाओरड
करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी बसस्थानक परिसरात 'फिक्स्ड पॉईंट' ड्युटीवर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल गंगाधर चपडे हे आपल्या पथकासह सतर्कतेने गस्त घालत होते. आरडाओरड ऐकताच त्यांनी होमगार्ड कर्मचारी अमोल मुंडे, विलास कांबळे, बळीराम पोले आणि महिला होमगार्ड नीता सोळंके यांच्या मदतीने बसच्या आजूबाजूला वेढा घातला. पोलिसांनी तात्काळ परिसराचे निरीक्षण करून कोणालाही बाहेर जाऊ दिले नाही. पोलिसांच्या या कडक पवित्र्यामुळे चोरट्याला मंगळसूत्र घेऊन जाणे अशक्य झाले. त्यानंतर पाहणी केली असता, तुटलेल्या अवस्थेतील मंगळसूत्राचे मणी महिलेच्या जवळच सापडले. पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे पिंपळदरी येथील या महिलेचे मोठे आर्थिक नुकसान टळले आहे. अहमदपूर पोलिसांच्या या चोख कामगिरीबद्दल सावित्राबाई निरगुडे यांनी पोलिसांचे आभार मानले असून, प्रवाशांकडून पोलीस पथकाचे विशेष कौतुक होत आहे.
- Post by Today One Live1
- उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील रहदारी झाली कमी..1
- Post by सारथी महाराष्ट्र न्यूज1
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.1
- महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी सचिव - तारेक खान दुर्राणीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनके 135 वे जयंती के मौके पर दी मुबारकबाद1
- विशेष अधिवेशन घेऊन नारिशक्ती वंदन या अभियाना अंतर्गत घटना दुरुस्ती करणार असल्यामुळे देशाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार -भारतीय जनता पार्टी प्रदेश उप अध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर1
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1