logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक:PMFME योजनेला मुदतवाढ; सूक्ष्म अन्न उद्योगांसाठी मोठी संधी केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेला २०२६-२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था व स्वयं सहायता गटांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी केले आहे. या योजनेत प्रकल्प खर्चाच्या ३५% पर्यंत (कमाल ३ कोटी) अनुदान मिळणार असून मार्केटिंगसाठी ५०% पर्यंत मदत मिळेल. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत कांदा प्रक्रियेला प्राधान्य देण्यात आले आहे. इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा.

1 hr ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
1 hr ago
c41ef8d2-d0fa-4510-b14d-feb168eb1d1c

नाशिक:PMFME योजनेला मुदतवाढ; सूक्ष्म अन्न उद्योगांसाठी मोठी संधी केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेला २०२६-२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था व स्वयं सहायता गटांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी केले आहे. या योजनेत प्रकल्प खर्चाच्या ३५% पर्यंत (कमाल ३ कोटी) अनुदान मिळणार असून मार्केटिंगसाठी ५०% पर्यंत मदत मिळेल. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत कांदा प्रक्रियेला प्राधान्य देण्यात आले आहे. इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ठाणे:शहापूर तालुक्यातील आधार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंदणी, वन हक्क दावे आणि तीव्र पाणी टंचाई यांसारख्या गंभीर समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सक्रिय झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, श्रमजीवी संघटना आणि विविध शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची संयुक्त समन्वय बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत महसूल, ग्रामविकास, वन आणि आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी, तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील आदिवासींच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून प्रशासनातर्फे एक कालबद्ध कृती आराखडा जाहीर करण्यात आला. या बैठकीत प्रामुख्याने आधारकार्ड नोंदणीवर विशेष भर देण्यात आला. शहापूर हा आदिवासीबहुल तालुका असल्याने, येथील आदिम कातकरी समाजातील अनेक नागरिकांकडे अद्याप आधार कार्ड नसल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून तातडीने 'आधार कॅम्प' लावण्याचे नियोजन करण्यात आले असून, मे महिन्यापर्यंत सर्व पात्र व्यक्तींचे आधार अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जेणेकरून कोणताही नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही. वन हक्क दाव्यांच्या संदर्भातही बैठकीत कडक पवित्रा घेण्यात आला. तालुक्यातील साधारण २५० दावे ग्रामपंचायत आणि महसूल स्तरावर, तर ७०० हून अधिक दावे वनविभागाकडे प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांची पुढील १५ दिवसांत सखोल पडताळणी करून ती मंजुरीसाठी उपविभागीय समितीकडे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तालुक्यातील भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेमार्फत 'वॉटर स्कॅर्सिटी मॅपिंग' करून टँकर पुरवठा आणि नादुरुस्त नळ पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे ठरविण्यात आले आहे. कोणत्याही पाड्याला उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी शहापूरचे गटविकास अधिकारी बाबुराव राठोड यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "शहापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांचे आधार कार्ड, वन हक्क दावे आणि पाणी टंचाई यांसारखे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. आम्ही सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन ठोस कृती आराखडा तयार केला असून मे महिन्यापर्यंत आधार नोंदणी पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल." या बैठकीला तहसीलदार परमेश्वर कासुले, गट विकास अधिकारी बाबुराव राठोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (ITDP) महेश कवडे, वनपरिक्षेत्रपाल लक्ष्मण चिखले, विस्तार अधिकारी एन. एच. पाटील, विलास जाधव, बी. आर. वाघचौरे, दिनेश घोलप, यशवंत धोत्रे आणि जी. के. ठिकामे आणि सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उपस्थित होते. श्रमजीवी संघटनेच्या वतीने राज्य संघटक सचिव सीता घाटाळ, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष माळू हुमणे, निरीक्षक लक्ष्मण चौधरी, सचिव प्रकाश खोडका, उपाध्यक्ष रुपेश आहिरे, विशाल मुकणे, दर्शना आगिवले, संघटक कैलास मुकणे, महिला प्रमुख लक्ष्मी वाघ, महिला सचिव कल्पना वाघ, कार्यालय सचिव कमलाकर शिंदे आणि माजी कातकरी प्रमुख संजय मुकणे यांनी उपस्थित राहून आदिवासींच्या समस्या मांडल्या. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
    1
    ठाणे:शहापूर तालुक्यातील आधार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंदणी, वन हक्क दावे आणि तीव्र पाणी टंचाई यांसारख्या गंभीर समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सक्रिय झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, श्रमजीवी संघटना आणि विविध शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची संयुक्त समन्वय बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत महसूल, ग्रामविकास, वन आणि आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी, तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील आदिवासींच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून प्रशासनातर्फे एक कालबद्ध कृती आराखडा जाहीर करण्यात आला.
या बैठकीत प्रामुख्याने आधारकार्ड नोंदणीवर विशेष भर देण्यात आला. शहापूर हा आदिवासीबहुल तालुका असल्याने, येथील आदिम कातकरी समाजातील अनेक नागरिकांकडे अद्याप आधार कार्ड नसल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून तातडीने 'आधार कॅम्प' लावण्याचे नियोजन करण्यात आले असून, मे महिन्यापर्यंत सर्व पात्र व्यक्तींचे आधार अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जेणेकरून कोणताही नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही. वन हक्क दाव्यांच्या संदर्भातही बैठकीत कडक पवित्रा घेण्यात आला. तालुक्यातील साधारण २५० दावे ग्रामपंचायत आणि महसूल स्तरावर, तर ७०० हून अधिक दावे वनविभागाकडे प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांची पुढील १५ दिवसांत सखोल पडताळणी करून ती मंजुरीसाठी उपविभागीय समितीकडे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
तालुक्यातील भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेमार्फत 'वॉटर स्कॅर्सिटी मॅपिंग' करून टँकर पुरवठा आणि नादुरुस्त नळ पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे ठरविण्यात आले आहे. कोणत्याही पाड्याला उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी शहापूरचे गटविकास अधिकारी बाबुराव राठोड यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "शहापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांचे आधार कार्ड, वन हक्क दावे आणि पाणी टंचाई यांसारखे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. आम्ही सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन ठोस कृती आराखडा तयार केला असून मे महिन्यापर्यंत आधार नोंदणी पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल."
या बैठकीला तहसीलदार परमेश्वर कासुले, गट विकास अधिकारी बाबुराव राठोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (ITDP) महेश कवडे, वनपरिक्षेत्रपाल लक्ष्मण चिखले, विस्तार अधिकारी एन. एच. पाटील, विलास जाधव, बी. आर. वाघचौरे, दिनेश घोलप, यशवंत धोत्रे आणि जी. के. ठिकामे आणि सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उपस्थित होते. श्रमजीवी संघटनेच्या वतीने राज्य संघटक सचिव सीता घाटाळ, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष माळू हुमणे, निरीक्षक लक्ष्मण चौधरी, सचिव प्रकाश खोडका, उपाध्यक्ष रुपेश आहिरे, विशाल मुकणे, दर्शना आगिवले, संघटक कैलास मुकणे, महिला प्रमुख लक्ष्मी वाघ, महिला सचिव कल्पना वाघ, कार्यालय सचिव कमलाकर शिंदे आणि माजी कातकरी प्रमुख संजय मुकणे यांनी उपस्थित राहून आदिवासींच्या समस्या मांडल्या. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ​येवला: श्री ऋणमुक्तेश्वर महादेव भक्त परिवाराच्या वतीने शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या दोन भव्य संकल्पित प्रवेशद्वारांपैकी, नांदगाव रोडवरील प्रवेशद्वाराचे अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भक्तीमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झाले. ​भोलेनाथांच्या आशीर्वादाने आणि एका महान दात्याच्या गुप्तदानामुळे हे भव्य प्रवेशद्वार साकार होत आहे. सदर दात्याने केलेल्या या निस्वार्थ सेवेबद्दल सर्व भक्त परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली आहे. नांदगाव रोडचे काम सुरू झाले असून, वैजापूर रोडवरील दुसऱ्या प्रवेशद्वाराचे कामही लवकरच पूर्णत्वास येईल, असा संकल्प यावेळी सोडण्यात आला. ​या मंगलप्रसंगी डॉ. निलेश पटेल, सोमनाथ गुंड, अतिष लाड, अतुल घटे, चेतन चवळे, प्रशांत वडनेरे, मोनल बाकळे, चंचल सुपेकर, कान्हा नागपुरे, अक्षय चव्हाण, कृपल पटेल, कुणाल सोनवणे, संदीप लकारे यांसह महादेव भक्त परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​या प्रवेशद्वारामुळे शहराच्या सौंदर्यात तर भर पडेलच, शिवाय भाविकांसाठी ही एक आनंदाची पर्वणी ठरणार आहे. 'ऋणमुक्तेश्वर महादेव सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करो', अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
    1
    ​येवला: श्री ऋणमुक्तेश्वर महादेव भक्त परिवाराच्या वतीने शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या दोन भव्य संकल्पित प्रवेशद्वारांपैकी, नांदगाव रोडवरील प्रवेशद्वाराचे अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भक्तीमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झाले.
​भोलेनाथांच्या आशीर्वादाने आणि एका महान दात्याच्या गुप्तदानामुळे हे भव्य प्रवेशद्वार साकार होत आहे. सदर दात्याने केलेल्या या निस्वार्थ सेवेबद्दल सर्व भक्त परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली आहे. नांदगाव रोडचे काम सुरू झाले असून, वैजापूर रोडवरील दुसऱ्या प्रवेशद्वाराचे कामही लवकरच पूर्णत्वास येईल, असा संकल्प यावेळी सोडण्यात आला.
​या मंगलप्रसंगी डॉ. निलेश पटेल, सोमनाथ गुंड, अतिष लाड, अतुल घटे, चेतन चवळे, प्रशांत वडनेरे, मोनल बाकळे, चंचल सुपेकर, कान्हा नागपुरे, अक्षय चव्हाण, कृपल पटेल, कुणाल सोनवणे, संदीप लकारे यांसह महादेव भक्त परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​या प्रवेशद्वारामुळे शहराच्या सौंदर्यात तर भर पडेलच, शिवाय भाविकांसाठी ही एक आनंदाची पर्वणी ठरणार आहे. 'ऋणमुक्तेश्वर महादेव सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करो', अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by AQUEEL CABLE NETWORK
    1
    Post by AQUEEL CABLE NETWORK
    user_AQUEEL CABLE NETWORK
    AQUEEL CABLE NETWORK
    Cable provider मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • 🟥 GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज 📍 सुरत (गुजरात) रविवारी सकाळी उधना रेल्वे स्थानक येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी रांगा तोडत स्टेशन परिसरात धाव घेतली. 🚆 सकाळी ११:१५ वाजता सुटणाऱ्या उधना–हसनपूर (बिहार) या गाडीसाठी सुमारे ११ वाजता मोठ्या प्रमाणात प्रवासी एकत्र जमले होते. गर्दी इतकी वाढली की अनेक महिला व लहान मुले घाबरून गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आली. 😢 या गोंधळादरम्यान एका तरुणाचा “आता परत नाही येणार, मित्रा… नाही येणार…” असा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे परिस्थितीची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे. ⚠️ प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. #बातमी #MarathiNews #BreakingNews #Surat #Railway #GBKNEWS
    1
    🟥 GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज
📍 सुरत (गुजरात)
रविवारी सकाळी उधना रेल्वे स्थानक येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी रांगा तोडत स्टेशन परिसरात धाव घेतली.
🚆 सकाळी ११:१५ वाजता सुटणाऱ्या उधना–हसनपूर (बिहार) या गाडीसाठी सुमारे ११ वाजता मोठ्या प्रमाणात प्रवासी एकत्र जमले होते. गर्दी इतकी वाढली की अनेक महिला व लहान मुले घाबरून गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आली.
😢 या गोंधळादरम्यान एका तरुणाचा “आता परत नाही येणार, मित्रा… नाही येणार…” असा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे परिस्थितीची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे.
⚠️ प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
#बातमी #MarathiNews #BreakingNews #Surat #Railway #GBKNEWS
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नमाज़ के फायदे बताना बना विवाद, नमिता थापर ने दिया करारा जवाब ! Breaking Bytes
    1
    नमाज़ के फायदे बताना बना विवाद, नमिता थापर ने दिया करारा जवाब ! Breaking Bytes
    user_Zahid Shaikh
    Zahid Shaikh
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नमाज़ वाले विज्ञापन पर घिरीं Namita Thapar, सोशल मीडिया पर बढ़ा विवाद न्यूज़: बिजनेस लीडर और Shark Tank India की जज Namita Thapar एक विज्ञापन को लेकर विवादों में आ गई हैं। रिपोर्ट्स के मुताबिक, यह ऐड नमाज़ के फायदों से जुड़ा था, जो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो गया। इसके बाद कई लोगों ने इस विज्ञापन को अलग-अलग तरीके से समझा और उनके खिलाफ नकारात्मक टिप्पणियां और ट्रोलिंग शुरू हो गई। कुछ यूज़र्स ने आपत्तिजनक भाषा का भी इस्तेमाल किया, जिससे यह मुद्दा करीब 3 हफ्तों तक सोशल मीडिया पर चर्चा में बना रहा। विवाद बढ़ने के बाद नमिता थापर ने एक वीडियो संदेश जारी किया, जिसमें उन्होंने कहा, “silence is not a virtue” और अगर किसी के साथ अपमान या अन्याय होता है तो उसके खिलाफ आवाज़ उठानी चाहिए। उन्होंने यह भी कहा कि वह पहले से ही ट्रोलिंग का सामना करती रही हैं, लेकिन उनका फोकस जागरूकता और सम्मान पर है। इस पूरे मामले में जहां कुछ लोगों ने उनका समर्थन किया और इसे मानवता के नजरिए से देखने की बात कही, वहीं कुछ ने धार्मिक दृष्टिकोण से आपत्ति जताई। #NamitaThapar #SharkTankIndia #Controversy #Namaz #SocialMedia #ViralNews #IndiaNews
    1
    नमाज़ वाले विज्ञापन पर घिरीं Namita Thapar, सोशल मीडिया पर बढ़ा विवाद
न्यूज़:
बिजनेस लीडर और Shark Tank India की जज Namita Thapar एक विज्ञापन को लेकर विवादों में आ गई हैं। रिपोर्ट्स के मुताबिक, यह ऐड नमाज़ के फायदों से जुड़ा था, जो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो गया।
इसके बाद कई लोगों ने इस विज्ञापन को अलग-अलग तरीके से समझा और उनके खिलाफ नकारात्मक टिप्पणियां और ट्रोलिंग शुरू हो गई। कुछ यूज़र्स ने आपत्तिजनक भाषा का भी इस्तेमाल किया, जिससे यह मुद्दा करीब 3 हफ्तों तक सोशल मीडिया पर चर्चा में बना रहा।
विवाद बढ़ने के बाद नमिता थापर ने एक वीडियो संदेश जारी किया, जिसमें उन्होंने कहा, “silence is not a virtue” और अगर किसी के साथ अपमान या अन्याय होता है तो उसके खिलाफ आवाज़ उठानी चाहिए। उन्होंने यह भी कहा कि वह पहले से ही ट्रोलिंग का सामना करती रही हैं, लेकिन उनका फोकस जागरूकता और सम्मान पर है।
इस पूरे मामले में जहां कुछ लोगों ने उनका समर्थन किया और इसे मानवता के नजरिए से देखने की बात कही, वहीं कुछ ने धार्मिक दृष्टिकोण से आपत्ति जताई।
#NamitaThapar #SharkTankIndia #Controversy #Namaz #SocialMedia #ViralNews #IndiaNews
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • शहरातील प्रतिष्ठित 'नथानंद पैठणी' तर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 'शिंदे पाटील फाउंडेशन'च्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. फाउंडेशनच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. ​याप्रसंगी शिंदे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे, उपाध्यक्ष सुनीलभाऊ शिंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, तसेच विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ​कार्यक्रमाला नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, सनी पटणी,योगेश सोनवणे,शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी,इंजिनिअर प्रशांत शिनकर, संजय शिंदे, राजू बाकळे, दीपक घिगे, सुशांत हजारे, पप्पू वाणी आणि दीपक गुप्ता यांच्यासह फाउंडेशनचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधीलकी जपत फाउंडेशनने आजवर अनेक गरजूंना मदत केली असून, हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची पावती असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या गौरवाबद्दल शिंदे पाटील फाउंडेशनच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    शहरातील प्रतिष्ठित 'नथानंद पैठणी' तर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 'शिंदे पाटील फाउंडेशन'च्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. फाउंडेशनच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
​याप्रसंगी शिंदे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे, उपाध्यक्ष सुनीलभाऊ शिंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, तसेच विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
​कार्यक्रमाला नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, सनी पटणी,योगेश सोनवणे,शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी,इंजिनिअर प्रशांत शिनकर, संजय शिंदे, राजू बाकळे, दीपक घिगे, सुशांत हजारे, पप्पू वाणी आणि दीपक गुप्ता यांच्यासह फाउंडेशनचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधीलकी जपत फाउंडेशनने आजवर अनेक गरजूंना मदत केली असून, हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची पावती असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या गौरवाबद्दल शिंदे पाटील फाउंडेशनच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • संसदेत भारतीय जनता पार्टी ने सादर केलेले विधेयक ना मंजूर झाले आहे, सदर विधेयक काँग्रेस मुळे नामंजूर झाल्याचा ठपका ठेवत भाजपने देशभरात काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू केले असून काँग्रेसही भारतीय जनता पार्टीचा दु टप्पीपणा समोर आणण्यासाठी व्यूह रचना करत आहे, यावर प्रकाश झोत टाकणारे संपादकीय
    1
    संसदेत भारतीय जनता पार्टी ने सादर केलेले विधेयक ना मंजूर झाले आहे, सदर विधेयक काँग्रेस मुळे नामंजूर झाल्याचा ठपका ठेवत भाजपने देशभरात काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू केले असून काँग्रेसही भारतीय जनता पार्टीचा दु टप्पीपणा समोर आणण्यासाठी व्यूह रचना करत आहे, यावर प्रकाश झोत टाकणारे संपादकीय
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • 🔴 GBK NEWS अपडेट डोंबिवलीत लोकलचा डबा रुळावरून घसरला; मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत मुंबई : Central Railway मार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी विस्कळीत झाल्याची घटना Dombivli स्थानकात घडली. कळवा कारशेडमधून Kalyanच्या दिशेने निघालेल्या लोकल ट्रेनचा एक डबा डोंबिवली स्थानक परिसरात रुळावरून घसरला. सुदैवाने ही लोकल रिकामी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सकाळच्या गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील इतर लोकल गाड्यांचे वेळापत्रक बिघडले असून अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली असून स्थानकांवर गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. रेल्वे प्रशासनाकडून रुळावरून घसरलेला डबा हटवण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. #CentralRailway #Dombivli #MumbaiLocal #BreakingNews #GBKNews
    1
    🔴 GBK NEWS अपडेट
डोंबिवलीत लोकलचा डबा रुळावरून घसरला; मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत
मुंबई : Central Railway मार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी विस्कळीत झाल्याची घटना Dombivli स्थानकात घडली. कळवा कारशेडमधून Kalyanच्या दिशेने निघालेल्या लोकल ट्रेनचा एक डबा डोंबिवली स्थानक परिसरात रुळावरून घसरला.
सुदैवाने ही लोकल रिकामी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सकाळच्या गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.
या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील इतर लोकल गाड्यांचे वेळापत्रक बिघडले असून अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली असून स्थानकांवर गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून रुळावरून घसरलेला डबा हटवण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
#CentralRailway #Dombivli #MumbaiLocal #BreakingNews #GBKNews
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.