कामगारांनी काम बंद आंदोलन केल्यास मनपाकडून अमृत एंटरप्राईझेस कंपनीला गुन्हा दाखल करण्याची नोटीस नांदेड ( जि.प्र.) मनपातील सफाई कामगारांना कामावर परत घेण्यात यावे या मागणीसाठी नांदेड वाघाळा महानगर पालिका कामगार कर्मचारी युनियनचे संस्थापक अध्यक्ष गणेश शिंगे यांच्या नेतृत्वाखाली द्वारसभा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी धरणे , मुंडन आंदोलन पार पडले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांना घेराव घालण्यात आला. यावेळी कदम व सफाई कामगारांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आज बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मनपावर शिंगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चा मनपावर धडकला. तत्पूर्वी मनपा प्रशासनाने सफाई कामगारांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली. यावेळी उद्या 30 एप्रिल पासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा दिला. सफाई कामगारांच्या आंदोलनाची मनपा प्रशासनाने दखल घेऊन सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन झाले तर अमृत एंटरप्राईझेस कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची नोटीस बजावली. या नोटीसची अमृत एंटरप्राईझेस कंपनीने दखल घेत शिंगे यांना सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन रद्द करण्याची विनंती केली. अमृत कंपनीच्या विनंतीला शिंगे यांनी मान देत उद्या गुरुवार पासूनचे काम बंद आंदोलन स्थगित केले. मनपा प्रशासन व अमृत एंटरप्राईझेस कंपनीवर विश्वास ठेऊन उद्या गुरुवारपासूनचे आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले असल्याचे शिंगे यांनी सांगितले. येत्या आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास कामावरून कमी केलेल्या 80-85 कामगारांसोबत मनपाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा शिंगे यांनी दिला. चौकट सफाई कामगारांच्या मागण्या सोडविण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरले, असा आरोप शिंगे यांनी केला. मनपा प्रशासन अमृत एंटरप्राईझेस कंपनीला समोर करत आहे. सफाई कामगारांच्या मागण्या सोडविल्या नाही तर यापुढे मनपा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिंगे यांनी दिला.
कामगारांनी काम बंद आंदोलन केल्यास मनपाकडून अमृत एंटरप्राईझेस कंपनीला गुन्हा दाखल करण्याची नोटीस नांदेड ( जि.प्र.) मनपातील सफाई कामगारांना कामावर परत घेण्यात यावे या मागणीसाठी नांदेड वाघाळा महानगर पालिका कामगार कर्मचारी युनियनचे संस्थापक अध्यक्ष गणेश शिंगे यांच्या नेतृत्वाखाली द्वारसभा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी धरणे , मुंडन आंदोलन पार पडले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांना घेराव घालण्यात आला. यावेळी कदम
व सफाई कामगारांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आज बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मनपावर शिंगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चा मनपावर धडकला. तत्पूर्वी मनपा प्रशासनाने सफाई कामगारांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली. यावेळी उद्या 30 एप्रिल पासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा दिला. सफाई कामगारांच्या आंदोलनाची मनपा प्रशासनाने दखल घेऊन सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन झाले तर अमृत एंटरप्राईझेस
कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची नोटीस बजावली. या नोटीसची अमृत एंटरप्राईझेस कंपनीने दखल घेत शिंगे यांना सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन रद्द करण्याची विनंती केली. अमृत कंपनीच्या विनंतीला शिंगे यांनी मान देत उद्या गुरुवार पासूनचे काम बंद आंदोलन स्थगित केले. मनपा प्रशासन व अमृत एंटरप्राईझेस कंपनीवर विश्वास ठेऊन उद्या गुरुवारपासूनचे आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले असल्याचे शिंगे यांनी सांगितले. येत्या
आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास कामावरून कमी केलेल्या 80-85 कामगारांसोबत मनपाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा शिंगे यांनी दिला. चौकट सफाई कामगारांच्या मागण्या सोडविण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरले, असा आरोप शिंगे यांनी केला. मनपा प्रशासन अमृत एंटरप्राईझेस कंपनीला समोर करत आहे. सफाई कामगारांच्या मागण्या सोडविल्या नाही तर यापुढे मनपा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिंगे यांनी दिला.
- नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.1
- Post by Today One Live1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- Post by Jafar tarodekar1
- Post by Mohsin ahmed khan1
- खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ1
- Post by Mushtaq Shaikh1
- Post by Today One Live1