logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सैनिकाच्या सामाजिक योगदानाला बीह्यूमन्स वेल्फेअर फाउंडेशनचा सलाम. नांदेड प्रतिनिधी गजानन बिडकर :- समाजसेवा, मानवता आणि गरजूंच्या निःस्वार्थ सेवेसाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल भारतीय सैन्याचे जवान कमलेश कुमार यादव उर्फ 'कमलेश रघुकुला' यांना बीह्यूमन्स वेल्फेअर फाउंडेशनतर्फे प्रतिष्ठित "कम्युनिटी सपोर्ट अवॉर्ड" देऊन सन्मानित करण्यात आले. कमलेश कुमार यादव हे सध्या भारतीय सैन्यात कार्यरत असून झारखंडमधील युवकांमध्ये प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. सोशल मीडियावरही त्यांची मोठी लोकप्रियता असून लाखो चाहते आणि अनुयायी आहेत. सैन्य सेवेसोबतच ते समाजसेवा, मानव कल्याण आणि गरजूंच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत BEHUMANS WELFARE FOUNDATION ने त्यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मान सोहळ्यास बीह्यूमन्स वेल्फेअर फाउंडेशनच्या संचालिका माधुरी गजानन बिडकर, गौरव गजानन बिडकर, गिरीश गजानन बिडकर, फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गजानन गंगाधरराव बिडकर तसेच जयंत शर्मा उपस्थित होते. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक व सीईओ गजानन गंगाधरराव बिडकर यांनी सांगितले की, "देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या एका शूर सैनिकाचा समाजसेवेसाठी सन्मान करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. कमलेश कुमार यादव यांसारखे तरुण सैनिक समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. ते भविष्यातही राष्ट्रसेवेसोबत मानवसेवेतही अग्रणी राहतील, असा आम्हाला विश्वास आहे." कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी कमलेश कुमार यादव यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि समाजसेवेचे कार्य असेच सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

2 hrs ago
user_Informative news
Informative news
Nanded, Maharashtra•
2 hrs ago
55fce2a6-507a-4fef-b440-a35298722f3c

सैनिकाच्या सामाजिक योगदानाला बीह्यूमन्स वेल्फेअर फाउंडेशनचा सलाम. नांदेड प्रतिनिधी गजानन बिडकर :- समाजसेवा, मानवता आणि गरजूंच्या निःस्वार्थ सेवेसाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल भारतीय सैन्याचे जवान कमलेश कुमार यादव उर्फ 'कमलेश रघुकुला' यांना बीह्यूमन्स वेल्फेअर फाउंडेशनतर्फे प्रतिष्ठित "कम्युनिटी सपोर्ट अवॉर्ड" देऊन सन्मानित करण्यात आले. कमलेश कुमार यादव हे सध्या भारतीय सैन्यात कार्यरत

f6378f5e-713e-44c3-a70b-c48a629812b6

असून झारखंडमधील युवकांमध्ये प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. सोशल मीडियावरही त्यांची मोठी लोकप्रियता असून लाखो चाहते आणि अनुयायी आहेत. सैन्य सेवेसोबतच ते समाजसेवा, मानव कल्याण आणि गरजूंच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत BEHUMANS WELFARE FOUNDATION ने त्यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मान

ccecbebd-7172-4a60-ae00-fed6898af7ec

सोहळ्यास बीह्यूमन्स वेल्फेअर फाउंडेशनच्या संचालिका माधुरी गजानन बिडकर, गौरव गजानन बिडकर, गिरीश गजानन बिडकर, फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गजानन गंगाधरराव बिडकर तसेच जयंत शर्मा उपस्थित होते. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक व सीईओ गजानन गंगाधरराव बिडकर यांनी सांगितले की, "देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या एका शूर सैनिकाचा समाजसेवेसाठी सन्मान

0805e55e-f808-4f04-b8db-e17b3af6696c

करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. कमलेश कुमार यादव यांसारखे तरुण सैनिक समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. ते भविष्यातही राष्ट्रसेवेसोबत मानवसेवेतही अग्रणी राहतील, असा आम्हाला विश्वास आहे." कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी कमलेश कुमार यादव यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि समाजसेवेचे कार्य असेच सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi
    1
    पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 
पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! 
पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 
🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा!
#Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.
    1
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले.  या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    2
    ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न



मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली  मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. 
या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
    user_Milind Manohar Kamble
    Milind Manohar Kamble
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​२९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले. ​त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    1
    नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल


नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​२९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले.
​त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
    user_महाराष्ट्र वृत्तवेध
    महाराष्ट्र वृत्तवेध
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे.  जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे.  हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    1
    हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी  103.9  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. 
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2),  वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस  पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026  पर्यंत सरासरी  408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. 
हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर
    1
    उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन 
उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    Beverage Store उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • उमरखेड आगाराला मोठी भेट! पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नांतून ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे दमदार आगमन महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन व लोकार्पण; प्रवाशांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व सुलभ वाहतुकीची अपेक्षा उमरखेड आगाराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे आज उत्साहात पूजन व लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री व स्थानिक आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे या बस उमरखेड आगाराला प्राप्त झाल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसांचे विधिवत पूजन करून त्या प्रवासी सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या. नवीन बसांमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि नियमित एसटी सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अशा बसांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. प्रवाशांच्या अपेक्षा काय? दुर्गम भागात नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात. वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. बसची देखभाल व स्वच्छता नियमित ठेवावी. सार्वजनिक सेवेत पारदर्शकता व उत्तरदायित्व राखावे.कायदेशीर अपेक्षा सार्वजनिक निधीतून उपलब्ध झालेल्या या बससेवेचे संचालन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लागू नियमांनुसार, शासनाच्या धोरणांनुसार आणि सर्व प्रवाशांना समान व पारदर्शक सेवा मिळेल, या तत्त्वावर होणे आवश्यक आहे. बस मार्गांचे नियोजन, फेऱ्यांचे वेळापत्रक आणि सेवा वितरणात प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे. "नवीन बसांचे आगमन ही केवळ वाहनांची भर नसून, ग्रामीण जनतेच्या प्रवासाला नवी गती देणारी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणारी महत्त्वाची पायरी आहे," अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
    3
    उमरखेड आगाराला मोठी भेट!

पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नांतून ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे दमदार आगमन

महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन व लोकार्पण; प्रवाशांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व सुलभ वाहतुकीची अपेक्षा
उमरखेड आगाराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे आज उत्साहात पूजन व लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री व स्थानिक आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे या बस उमरखेड आगाराला प्राप्त झाल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसांचे विधिवत पूजन करून त्या प्रवासी सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या.
नवीन बसांमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि नियमित एसटी सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अशा बसांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
प्रवाशांच्या अपेक्षा काय?
दुर्गम भागात नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात.
वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
बसची देखभाल व स्वच्छता नियमित ठेवावी.
सार्वजनिक सेवेत पारदर्शकता व उत्तरदायित्व राखावे.कायदेशीर अपेक्षा
सार्वजनिक निधीतून उपलब्ध झालेल्या या बससेवेचे संचालन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लागू नियमांनुसार, शासनाच्या धोरणांनुसार आणि सर्व प्रवाशांना समान व पारदर्शक सेवा मिळेल, या तत्त्वावर होणे आवश्यक आहे. बस मार्गांचे नियोजन, फेऱ्यांचे वेळापत्रक आणि सेवा वितरणात प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
"नवीन बसांचे आगमन ही केवळ वाहनांची भर नसून, ग्रामीण जनतेच्या प्रवासाला नवी गती देणारी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणारी महत्त्वाची पायरी आहे," अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • माहूर गडाकडे जाणाऱ्या भाविकांनी प्रवास टाळावा; पैनगंगा नदीला पूर, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे आवाहन नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पैनगंगा धनोडा नदीवर सध्या पाण्याची पातळी वाढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माहूर गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनी सध्याचा प्रवास शक्यतो टाळावा, असे नम्र आवाहन माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी केले आहे. ​परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी पूर्ण सतर्कता बाळगावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी नगर पंचायत माहूर, तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन तत्पर आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित स्थळी राहावे आणि गरज भासल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
    1
    माहूर गडाकडे जाणाऱ्या भाविकांनी प्रवास टाळावा; पैनगंगा नदीला पूर, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे आवाहन


नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पैनगंगा धनोडा नदीवर सध्या पाण्याची पातळी वाढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माहूर गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तसेच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनी सध्याचा प्रवास शक्यतो टाळावा, असे नम्र आवाहन माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी केले आहे.
​परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून नागरिकांनी पूर्ण सतर्कता बाळगावी आणि स्वतःची काळजी घ्यावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी नगर पंचायत माहूर, तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन तत्पर आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित स्थळी राहावे आणि गरज भासल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
    user_महाराष्ट्र वृत्तवेध
    महाराष्ट्र वृत्तवेध
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.