बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांची गय नको ; महसूल व पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचा निपटारा : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी, दि. १५ : प्रवरा नदीपात्रातून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत महसूल व पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी. संबंधित व्यक्ती किंवा कार्यकर्ता कोणाचाही असो, त्याला पाठीशी न घालता कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. लोणी येथे गुरुवारी आयोजित 'जनता दरबारा'त मंत्री डॉ. विखे पाटील यांनी राज्यभरातून व जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी सामाजिक व व्यक्तिगत स्वरूपातील निवेदने स्वीकारून संबंधित प्रश्नांचा निपटारा करण्याच्या, तसेच निर्धारित वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. सध्या प्रवरा नदीपात्रातून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी जनता दरबारात प्राप्त झाल्या. याची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी महसूल व पोलीस प्रशासनाची तातडीने बैठक घेतली. अधिकाऱ्यांनी कोणताही निष्काळजीपणा न करता कडक धोरण अवलंबवावे. ज्या भागातून वाळू उपसा होत असेल, त्याची जबाबदारी संबंधित गावातील तलाठी व मंडल अधिकारी यांच्यावर निश्चित करून वेळप्रसंगी त्यांच्यावरही कारवाई करावी. तसेच प्रशासनाच्या नावाखाली अशा बेकायदेशीर कृत्याला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींची गय करू नका, असे निर्देशही डॉ. विखे पाटील यांनी दिले. शासकीय योजना व घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून देताना कागदपत्रांची सखोल पडताळणी करूनच निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सूचित केले. या बैठकीला संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी येथील प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार व मंडल अधिकारी उपस्थित होते. आचारसंहिता शिथिल झाल्याने शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. प्रलंबित विकासात्मक कामांना प्राधान्य देऊन ती तातडीने मार्गी लावावीत, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले. *******

- नेकनूर येथे कासार समाजाचा महाकुंभ..! कालिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी..1
- Post by कर्जत लाईव्ह1
- ___ जिल्हाधिकारी श्री.विवेक जॉन्सन यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू असून, आतापर्यंत ५८४५ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या पैकी प्रतिनिधिक स्वरूपात १० कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पुढील तीन महिन्यांत सर्व उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील सर्व उसतोड कामगारांनी स्थानिक स्तरावर संबंधित संस्थेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- माननीय पोलीस अधीक्षक आंटी करप्शन ब्युरो संभाजीनगर येथे सुद्धा तक्रार दाखल आहे परंतु ही सुद्धा तक्रार दाबल्या गेलेली आहे त्यामुळे आपल्या मुंबई कार्यालाला याप्रकरणी माहिती देण्यात आली असून पाचोड पोलीस स्टेशनचे चार अधिकारी त्वरित सस्पेंड करा व सीबीआय चौकशी करा असे या ठिकाणी बरेच प्रकरण दाबलेले आहेत या पाठीमागे जो प्रकरण दाबतो त्याचे नाव समोर आणा त्याची मी कुंडली ओपन करतो सध्या रनिंग प्रकरण दाबणाऱ्या अधिकारी किशोर शिंदे जमादार वडजी बीट विमा मांडा चौकी नंबर दोन रामबा राहते पोलीस उपनिरीक्षक सध्या पाचोड पोलीस स्टेशन आणि महत्वाचे म्हटले तर सिनिअर ऑफिसर ने या अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या कुणाच्या आणि यांनी प्रकरण निकाली काढले कसे हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे सिन्नर ऑफिसर एपीआय सचिन पंडित यांच्या स्वाक्षरी शिवाय दिलेल्या पत्रावर कारवाई करण्याऐवजी खोटे अहवाल यांनी सर्वांनी मिळून वरिष्ठांना पाठवले पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब आव्हाड यांना याप्रकरणी इतर अधिकाऱ्यांनी सहमत दर्शवून गंभीर गुन्ह्यांमध्ये वाचवण्यास मदत केली त्यामुळे खालील कलम अंतर्गत यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा #पोलीसानी प्रकरण दाबण्याचा किंवा तपासात करण्यात हलगर्जीपणा (Police Inaction/Suppression) केल्यास, संबंधित #अधिकाऱ्यांवर फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) कलम १६६, IPC कलम १६७, १७७ किंवा २१७-२२१ नुसार कारवाई होऊ शकते. तसेच, भ्रष्टाचाराचा संशय असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत अधिकाऱ्यावर कार्य होऊ शकते -------------------------------------------------------------------- पोलीस स्टेशनचे ए पी आय सचिन पंडित साहेब तुमची माझी वैयक्तिक दुश्मनी नाही परंतु आपल्या पोलीस स्टेशनला माझे पेंटिंग अर्ज पोलीस उपनिरीक्षक रामबाहते वडजी गावची जमादार किशोर शिंदे यांनी गेली 2021 पासून माझे गंभीर प्रकरण दाबले आहे संपादक सुभाष मस्के पैठण न्युज ऑनलाईन संपादक पत्रकार असोसिएशन प्रेस मीडिया मेंबर संपर्क 88301067731
- आयशर टेम्पो झाडाला धडकला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू.. जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील आयशर टेम्पो वडाच्या झाडाला धडकल्याने झाड मुळासकट उखडून पडले, एवढी धडक तीव्र होती. जालना-जिंतूर मार्गावरून शिर्डीकडे चारा घेऊन जाणारा (एमएच २२ ए ३३७२) क्रमांकाचा आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने कन्हैयानगर येथील सेंट मेरी शाळेसमोर अपघातग्रस्त झाला. हा अपघात पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत अविनाश लोंढे (रा. डुकरी पिंपरी, ता. जालना) व सुरेश पालवे (रा. जिंतूर, जि. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.1
- Exclusive Interview Bk Dr Donika Meditation | Gallinews Bharat1
- Post by कर्जत लाईव्ह1