दोन मुलांना गमावलं… तरीही हार मानली नाही! स्वाभिमानाने जगण्यासाठी ५० वर्षांपासून सुरू आहे पार्वती आजींची धडपड आयुष्यातील दुःखाचा डोंगर पेलत, दोन मुलांना गमावण्याचे असह्य दुःख मनात घेऊनही परिस्थितीसमोर न झुकता स्वाभिमानाने जगण्याची जिद्द कायम ठेवणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथील पार्वती श्रीमंत कांते आजी यांची संघर्षकथा मन हेलावून टाकणारी आहे. अक्कलकोट येथील जुना अडत बाजारात, एका दुकानासमोर कडक उन्हात बसून कांद्याची विक्री करताना पार्वती आजी दिसल्या. एका ग्राहकाने कांदा खरेदी केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट केले. त्याची ६० रुपये रोख रक्कम आजींना देण्यासाठी जवळ गेल्यावर त्यांच्या जीवनातील संघर्षाची ही हृदयस्पर्शी कहाणी समोर आली. मौजे शिरवळ येथील रहिवासी असलेल्या पार्वती आजींनी सांगितले की, त्या तब्बल मागील ५० वर्षांपासून छोटा-मोठा व्यापार करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यांना दोन मुले होती; मात्र काळाने दोघांनाही हिरावून घेतले. आज त्यांच्या जवळ आधारासाठी कोणीही नसतानाही त्यांनी जगण्याची उमेद सोडलेली नाही. दररोज सकाळी त्या शिरवळहून अक्कलकोटला येतात. येथील व्यापारी आकीब बागवान यांच्याकडून कांद्याचे एक पाकीट घेऊन दिवसभर त्याची विक्री करतात. विक्रीनंतर मुद्दलाची रक्कम व्यापाऱ्याला परत करून, उरलेल्या २०० ते ३०० रुपयांमध्ये त्या आपला उदरनिर्वाह करतात. कडक ऊन असो, वाढते वय असो किंवा आयुष्याने दिलेले दुःख… पार्वती आजींची जगण्याची लढाई मात्र आजही सुरूच आहे! एकीकडे एवढ्या वयातही ही आजी कोणासमोर हात न पसरता कष्टाने आणि स्वाभिमानाने जगत आहे, तर दुसरीकडे अनेक तरुण छोट्या-मोठ्या कामाला कमीपणा समजतात. पार्वती आजींची जिद्द आपल्याला एकच संदेश देते कोणतेही काम लहान नसते आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानायची नसते! पार्वती श्रीमंत कांते आजींच्या संघर्षाला सलाम! त्यांची जगण्याची ही धडपड अनेकांसाठी निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे

- अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करणेबाबत निवेदन देण्यात आले. मा. राजसाहेबांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीबापू धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ऍड किशोर शिंदे, ऍड सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हामध्ये भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पेरणी केलेली विविध पिके पाऊस न आल्यामुळे करपली आहेत.आणि प्रत्येक गावं, वाडी -वस्तीवर, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही, लोकांना रोजगार नाही. शेतकरी यांच्या मुलांना शाळा, कॉलेजमध्ये, पेपर व शिकवणीचे फी देणेसाठी पैसे नाहीत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलून ज्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी पिकांचे पंचनामे करणेसाठी व जनावरांना चारा छावणी तात्काळ मंजूर करावे म्हणून तहसीलदार साहेब व जिल्हाअधिकारी साहेबांना आदेश देऊन तात्काळ मदत जाहीर करावे.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतकरीकडे काही एक दमडी नाही.आता श्री गणपतीचे आगमन झाले आहे. आणि दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी मिळून जनतेला आधार दिला पाहिजे.निवेदन देताना मनसे ता. अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, गट अध्यक्ष किणी काशिनाथ मरतुरे, ता. उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, मनसे किणी ढब्बू जाधव, दुधनी शाखा अध्यक्ष मनोज राठोड, बोरीउमरगे शाखा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कोन्हाळी शाखा उपाध्यक्ष दत्ता घंटे व शेतकरी राचय्या बसय्या स्वामी, परमेश्वरp साखरे, उमेश देडे, नीलकंठ धनशेट्टी, अंदप्पा माळगे, तिप्पणा नागरसे, विकास जाधव, राजू अंगडीकर, कुमार जाधव असे अनेक मनसैनिक व शेतकरी लोक निवेदन देताना तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते.या राज्यातील सरकार 8 दिवसाच्या आत जर दुष्काळ तात्काळ जाहीर नाही केल्यास सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन प्रत्येक तालुके व प्रत्येक जिह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.1
- मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर येते NALSA अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षा युनिट योजना 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला मोहोळ जिल्हा सोलापूर येथे नालसा अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या शिक्षण युनिट 2026 अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.1
- महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.1
- १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.4
- श्री सोमेश्वर संस्थेचा अमृतमहोत्सव आणि भव्य व्याख्यानमाला जाहीर1
- मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.1
- ग्रामपंचायत तुळशी तालुका माढा येथील ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू ग्रामपंचायत तुळशी तालुका माढा येथील ग्रामस्थांनी उजनी धरणातून कॅनल द्वारे तुळशी गावाला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे1
- लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ1