logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भद्रावती पशु रुग्णालयाशी संबंधित साहित्य व पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून द्या : नगरसेवक अनिल पडोळे यांची मागणी भद्रावती :महाराष्ट्र राज्य पशु संवर्धन व दुग्ध विभागाने तालुक्यातील पाळीव जनावरांना उत्तम वैद्यकीय उपचार व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता भद्रावती शहरापासून काहीश्या लांब ठिकाणी ४०५.३७ लक्ष रुपये खर्चून अद्यावत इमारत उभारण्यात आली. क्षेत्राच्या खासदार यांचे हस्ते मार्च २०२४ रोजी लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मात्र अवघ्या काही दिवसातच ही इमारत चक्क शोभेची बाहुली झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बाह्य भागात सर्वत्र झाडे झुडपे वाढलेली आहे अंतर्गत सर्वच कक्ष असुविधा व साहित्यविना नाममात्र असल्याचे प्रखरतेने जाणवते. शस्त्रक्रिया विभाग आहे मात्र साहित्य नाही, ॲम्ब्युलन्स आहे मात्र नियमित वाहक नाही, ऑक्सिजन पुरवठा सुविधा तोकडी आहे . तद्वतच तालुका स्तरीय चिकित्सालय असूनही तज्ञ पशू चिकित्सक, सहाय्यक, शिपाई यांचा अभाव आहे. नाईलाजाने उपचारासाठी येणाऱ्या पाळीव जनावरांवर थातूरमातूर उपचार होत असल्याने काही पाळीव जनावरे दगावल्याची उदाहरणे समोर आली आहेत. भव्य दिव्य इमारत पाहता हे चिकित्सालय अद्यावत असेल असे सकृतदर्शनी वाटते मात्र प्रत्यक्ष निरीक्षण केल्यास शिपाई पदाच्या सेवकाची नेमणूक नसल्याने सहाय्यक पशु चिकित्सक हि जबाबदारी पार पाडत असल्याची शोकांतिका आहे. या पार्श्वभूमीवर आज दि.१२ रोजी काँग्रेसचे नगरसेवक अनिल पडोळे यांनी सहाय्यक आयुक्त लघु पशु चिकित्सालय मेश्राम यांचे मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन सादर केले असून निवेदनातून तालुका पातळीवरील चिकित्सालयात अद्यावत इमारतीला शोभेल असे आवश्यक असे पुरेसे कर्मचारी, साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे अशी आग्रही मागणी केली आहे.

1 hr ago
user_Prakash deogade
Prakash deogade
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
1 hr ago
4fb0e887-0fcf-496f-ae89-31b504cba789

भद्रावती पशु रुग्णालयाशी संबंधित साहित्य व पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून द्या : नगरसेवक अनिल पडोळे यांची मागणी भद्रावती :महाराष्ट्र राज्य पशु संवर्धन व दुग्ध विभागाने तालुक्यातील पाळीव जनावरांना उत्तम वैद्यकीय उपचार व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता भद्रावती शहरापासून काहीश्या लांब ठिकाणी ४०५.३७ लक्ष रुपये खर्चून अद्यावत इमारत उभारण्यात आली. क्षेत्राच्या खासदार यांचे हस्ते मार्च २०२४ रोजी लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मात्र अवघ्या काही दिवसातच ही इमारत चक्क शोभेची बाहुली झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बाह्य भागात सर्वत्र झाडे झुडपे वाढलेली आहे अंतर्गत सर्वच कक्ष असुविधा व साहित्यविना नाममात्र असल्याचे प्रखरतेने जाणवते. शस्त्रक्रिया विभाग आहे मात्र साहित्य नाही, ॲम्ब्युलन्स आहे मात्र नियमित वाहक नाही, ऑक्सिजन पुरवठा सुविधा तोकडी आहे . तद्वतच

69cb774b-b503-4074-9cb1-0463a364dd8f

तालुका स्तरीय चिकित्सालय असूनही तज्ञ पशू चिकित्सक, सहाय्यक, शिपाई यांचा अभाव आहे. नाईलाजाने उपचारासाठी येणाऱ्या पाळीव जनावरांवर थातूरमातूर उपचार होत असल्याने काही पाळीव जनावरे दगावल्याची उदाहरणे समोर आली आहेत. भव्य दिव्य इमारत पाहता हे चिकित्सालय अद्यावत असेल असे सकृतदर्शनी वाटते मात्र प्रत्यक्ष निरीक्षण केल्यास शिपाई पदाच्या सेवकाची नेमणूक नसल्याने सहाय्यक पशु चिकित्सक हि जबाबदारी पार पाडत असल्याची शोकांतिका आहे. या पार्श्वभूमीवर आज दि.१२ रोजी काँग्रेसचे नगरसेवक अनिल पडोळे यांनी सहाय्यक आयुक्त लघु पशु चिकित्सालय मेश्राम यांचे मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन सादर केले असून निवेदनातून तालुका पातळीवरील चिकित्सालयात अद्यावत इमारतीला शोभेल असे आवश्यक असे पुरेसे कर्मचारी, साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे अशी आग्रही मागणी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वेंडली येथून जातिनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जनजागृती अभियानाला सुरवात चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आज दिनांक 11 मे ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यासाठी ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या वेंडली ता. जिल्हा चंद्रपूर येथून ओबीसींची जनगणना करावी यासाठी जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली, केंद्र सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसोबतच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात यासंदर्भात २२ जानेवारीला राजपत्र जारी केले, १ मे पासून स्व घर गणना सुरुवात झाली आहे. आणि प्रगणक द्वारे मकान सूचीकरण 12 मे पासून सुरवात होत आहे, जनगणनेसंबंधी ३३ प्रश्नावली सूची जाहीर करण्यात आली आहे. बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा स्पष्ट उल्लेख करतानाच इतरांसाठी अन्य शब्दाचा वापर करण्यात आला. मात्र ओबीसींचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आल्याने जातनिहाय जनगणनेवरून प्रश्न निर्माण झाला आहे. देशाच्या विकासात कुणाचे किती योगदान आहे हे जाणून घेण्यासाठी कुणाची संख्या किती आहे ते समोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. ऑक्टोबर २०२६पासून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तर उर्वरित भागात फेब्रुवारी -मार्च २०२७पासून प्रत्यक्ष जनगणना सुरू करण्यात येणार असल्याचे १६ जून २०२५ला स्पष्ट करण्यात आले होते. नंतर रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांनी जनगणनेसंबंधी अधिसूचना २२ जानेवारीला जनगणना करण्यासाठी ३३ प्रश्नांची सूची तयार करून राजपत्रात समाविष्ट करण्यात आल्या. या सूचींमध्ये घर क्रमांक, जनगणना घर क्रमांक, सामग्री, घराची स्थिती, कुटुंब क्रमांक, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, त्याचे लिंग, विवाहित दाम्पत्यांची संख्या, घरातील खोल्यांची संख्या, पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत, पेयजलाची उपलब्धता, वीज, शौचालय, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, लॅपटॉप किंवा कम्प्युटर, मोबाइल, कार, मुख्य धान्य अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि जमातीचा उल्लेख करण्यात आला. इतरांसाठी अन्य शब्दाचा प्रयोग करताना ओबीसींचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आला आहे. राजपत्रातील बाराव्या सूचीत अनुसूचित जाती आणि जमातीच्या कुटुंबातील प्रमुखाचा उल्लेख करताना ओबीसीसाठी अन्य शब्द वापरण्यात आला आहे. ओबीसी समाजाचा स्पष्ट उल्लेख कुठेही करण्यात आला नाही म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गावागावात जनजागृती अभियान सुरू केले आहे, या अभियानाची सुरुवात करताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे,संतोष झाडे,गोवर्धन पिंपळशेंडे, शंकर नागपुरे, रविंद्र पिंपळशेंडे ,ज्ञानेश्वर पिंपळशेंडे, दिपक पिंपळशेंडे, प्रकाश चालूरकर निलेश चालूरकर, अविनाश टोंगे, उमेश श्रीरसागर आशिष देवालकर हर्षल टोंगे, चंद्रशेखर देवालकर , शुभम दुरुतकर हिमेश देवालकर हिमांशु टोंगे ,उदय टोंगे, जीवन तुराणकर ,वर्षा मोहितकर सुरेखा पिंपळशेंडे, करिष्मा टोंगे , गिरिजाबाई देवालकर, लक्ष्मीबाई पिंपळशेंडे, सरस्वती पिंपळशेंडे शकुंतलाबाई पिंपळशेंडे, लताबाई टोंगे ,श्वेता टोंगे व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. केंद्र सरकारने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी जनगणना आयुक्तांनी भारत सरकारचे राजपत्र नाही काढल्यास येणाऱ्या हिवाळी अधिवेशन दरम्यान रामलीला मैदान नवी दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन करणार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी म्हटले आहे.
    1
    वेंडली येथून जातिनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जनजागृती अभियानाला सुरवात
चंद्रपूर :   राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आज दिनांक 11 मे  ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यासाठी ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे  यांच्या वेंडली ता. जिल्हा चंद्रपूर येथून ओबीसींची जनगणना करावी यासाठी जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली,  केंद्र सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसोबतच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात यासंदर्भात २२ जानेवारीला राजपत्र जारी केले, १ मे पासून स्व घर गणना सुरुवात झाली आहे. आणि प्रगणक द्वारे मकान सूचीकरण 12 मे पासून सुरवात होत आहे, जनगणनेसंबंधी ३३ प्रश्नावली सूची जाहीर करण्यात आली आहे. बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा स्पष्ट उल्लेख करतानाच इतरांसाठी अन्य शब्दाचा वापर करण्यात आला. मात्र ओबीसींचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आल्याने जातनिहाय जनगणनेवरून प्रश्न निर्माण झाला आहे.  
देशाच्या विकासात कुणाचे किती योगदान आहे हे जाणून घेण्यासाठी कुणाची संख्या किती आहे ते समोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. ऑक्टोबर २०२६पासून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तर उर्वरित भागात  फेब्रुवारी -मार्च २०२७पासून प्रत्यक्ष जनगणना सुरू करण्यात येणार असल्याचे १६ जून २०२५ला स्पष्ट करण्यात आले होते. नंतर रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांनी जनगणनेसंबंधी अधिसूचना २२ जानेवारीला जनगणना करण्यासाठी ३३ प्रश्नांची सूची तयार करून राजपत्रात समाविष्ट करण्यात आल्या. या सूचींमध्ये घर क्रमांक, जनगणना घर क्रमांक, सामग्री, घराची स्थिती, कुटुंब क्रमांक, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, त्याचे लिंग, विवाहित दाम्पत्यांची संख्या, घरातील खोल्यांची संख्या, पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत, पेयजलाची उपलब्धता, वीज, शौचालय, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, लॅपटॉप किंवा कम्प्युटर, मोबाइल, कार, मुख्य धान्य अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि जमातीचा उल्लेख करण्यात आला. इतरांसाठी अन्य शब्दाचा प्रयोग करताना ओबीसींचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आला आहे. 
राजपत्रातील बाराव्या सूचीत अनुसूचित जाती आणि जमातीच्या  कुटुंबातील प्रमुखाचा उल्लेख करताना ओबीसीसाठी अन्य शब्द वापरण्यात आला आहे. ओबीसी समाजाचा स्पष्ट उल्लेख कुठेही करण्यात आला नाही म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गावागावात जनजागृती अभियान सुरू केले आहे, या अभियानाची सुरुवात करताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे,संतोष झाडे,गोवर्धन पिंपळशेंडे, शंकर नागपुरे, रविंद्र पिंपळशेंडे ,ज्ञानेश्वर पिंपळशेंडे, दिपक पिंपळशेंडे, प्रकाश चालूरकर 
निलेश चालूरकर, अविनाश टोंगे, उमेश श्रीरसागर आशिष देवालकर
हर्षल टोंगे, चंद्रशेखर देवालकर ,
शुभम दुरुतकर हिमेश देवालकर 
हिमांशु टोंगे ,उदय टोंगे,
जीवन तुराणकर ,वर्षा मोहितकर 
सुरेखा पिंपळशेंडे, करिष्मा टोंगे ,
गिरिजाबाई देवालकर, लक्ष्मीबाई पिंपळशेंडे, सरस्वती पिंपळशेंडे 
शकुंतलाबाई पिंपळशेंडे, लताबाई टोंगे ,श्वेता टोंगे व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
केंद्र सरकारने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी   जनगणना आयुक्तांनी भारत सरकारचे राजपत्र नाही काढल्यास येणाऱ्या हिवाळी अधिवेशन दरम्यान रामलीला मैदान नवी दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन करणार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी म्हटले आहे.
    user_Prakash deogade
    Prakash deogade
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • दुर्गापुर पोलिसांनी हातभट्टी केली उध्वस्त, 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त चंद्रपुरातील दुर्गापूर पोलिसांना मौजा वरवट शेत शिवारातील जंगली नाल्यालागत हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड मारत 1 लाख 15 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत हातभट्टी उध्वस्त केली.
    1
    दुर्गापुर पोलिसांनी हातभट्टी केली उध्वस्त, 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपुरातील दुर्गापूर पोलिसांना मौजा वरवट शेत शिवारातील जंगली नाल्यालागत हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड मारत 1 लाख 15 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत हातभट्टी उध्वस्त केली.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए। मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।
    1
    मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।
मोदी जी ने कल देश को उपदेश नहीं, अपनी नाकामी के सबूत दिए।
    user_Jivandas Gedam
    Jivandas Gedam
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur
    1
    औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी

#NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur
औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी
#NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे एका महिलेने मोबाईल टॉवरवर चढून परिसरात खळबळ निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक ती कार्यवाही केली.
    1
    वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे एका महिलेने मोबाईल टॉवरवर चढून परिसरात खळबळ निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक ती कार्यवाही केली.
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • हजारो लोक वैज्ञानिक जीवनशैलीच्या माध्यमातून टाइप 2 मधुमेह औषधांशिवाय नियंत्रित करत आहेत. यामुळे रक्तातील साखर कमी होते, औषधे टाळता येतात आणि अधिक ऊर्जा मिळते. तुम्हीही या प्रवासात सामील होऊन आरोग्यावर नियंत्रण मिळवू शकता.
    1
    हजारो लोक वैज्ञानिक जीवनशैलीच्या माध्यमातून टाइप 2 मधुमेह औषधांशिवाय नियंत्रित करत आहेत. यामुळे रक्तातील साखर कमी होते, औषधे टाळता येतात आणि अधिक ऊर्जा मिळते. तुम्हीही या प्रवासात सामील होऊन आरोग्यावर नियंत्रण मिळवू शकता.
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    8 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
    1
    नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
    user_रिपोर्टर/मुकेश निनामा
    रिपोर्टर/मुकेश निनामा
    News Anchor Umred, Nagpur•
    12 hrs ago
  • महाराष्ट्रातील वरोरा तालुक्यातील बेलगावमध्ये पाण्याची तीव्र समस्या असल्याने एका महिलेने थेट तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून आंदोलन पुकारले. लेखी आश्वासन मिळेपर्यंत खाली उतरणार नाही, अशी मागणी करत तिने प्रशासनाची तारांबळ उडवून दिली आहे.
    1
    महाराष्ट्रातील वरोरा तालुक्यातील बेलगावमध्ये पाण्याची तीव्र समस्या असल्याने एका महिलेने थेट तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून आंदोलन पुकारले. लेखी आश्वासन मिळेपर्यंत खाली उतरणार नाही, अशी मागणी करत तिने प्रशासनाची तारांबळ उडवून दिली आहे.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.