नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध - अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे जिल्ह्यातील नागरिकांना विनाविलंब, विनासायास तसेच ऑनलाईन पद्धतीने विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असून, अधिसूचित सेवा शहरांपासून गावखेड्यांपर्यंत वेळेत नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार जीवककुमार कांबळे, पोलीस अधिकारी जमीर अब्दुल गनी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाने दि. 1 एप्रिल 2015 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी 28 एप्रिल हा दिवस महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी श्री. कांबळे म्हणाले की, शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंमलात आणून नागरिकांना नियत कालमर्यादेत लोकसेवा मिळण्याचा हक्क प्रदान केला आहे. या अधिनियमाच्या कलम 4 नुसार शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. हा अधिनियम प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्तव्यभावनेतून जनतेची सेवा करण्यास प्रेरित करणारा असून, शासनाने आयोगाच्या शिफारशीनुसार नागरिकांना अधिसूचित सेवा निश्चित कालमर्यादेत देण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांचा सेवाभाव हीच कर्मयोगाची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य शासनाने नागरिकांना विविध सेवा घरबसल्या उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सेवा दिल्या जात आहेत. या सेवा अधिक प्रभावीपणे व घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी उत्तम नियोजन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी प्रास्ताविकातून सेवा हक्क दिन साजरा करण्यामागील भूमिका व त्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत माहिती दिली. तसेच सर्व विभागांनी अधिकाधिक अधिसूचित सेवा सकारात्मक पद्धतीने विहित मुदतीमध्ये जनतेपर्यंत पोहोचवून हिंगोली जिल्ह्याचे नाव लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बाबतीत उज्वल करावेत, असे आवाहन याप्रसंगी केले. कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार जीवककुमार कांबळे, सखाराम मांडवगडे, पोलीस अधिकारी जमीर अब्दुल गनी नाईक, सरकारी कामगार अधिकारी सिद्धेश्वर फड यांचा अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सेवादूत पोर्टलच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान लोकसेवा हक्क दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान करण्यात आला. त्याचे दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रक्षेपणही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना लोकसेवेची शपथ देण्यात आली. महाआयटीचे प्रकल्प समन्वयक गंगाधर लोंढे यांनी आभार मानले.

- परभणी : अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भातील बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा. जोपर्यंत अद्यावत जनगणना होत नाही तोपर्यंत याबाबत कुठलाही निर्णय न घेण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वर्गीकरणासाठी कोणते सामाजिक, आर्थिक निकष, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय किंवाकोणत्या अभ्यासगटाच्या शिफारसी विचारात घेतल्या आहेत याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डी. एन. दाभाडे, रामकिशन कांबळे, नदीम इनामदार, जयप्रकाश इंगोले, एन. जी. खंदारे, रवी सोनकांबळे, सुहास पंडीत, सिध्दार्थ भराडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.1
- कछरा का दिकत1
- Post by Today One Live1
- प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक पवित्रा घेतला. मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत त्यांनी संताप व्यक्त केला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी आणि तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद ठेवावे, अशीही मागणी पुढे करण्यात आली. या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.1
- अप्पर तहसील कार्यालय मागणीसाठी शेवली कडकडीत बंद आठवडी बाजारही बंद ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा1
- Post by Sk Chand1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.1