लोहगावमध्ये भीषण आग : शॉर्टसर्किटमुळे पाच दुकाने जळून खाक परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.
लोहगावमध्ये भीषण आग : शॉर्टसर्किटमुळे पाच दुकाने जळून खाक परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.
- प्रशासनाचे दुर्लक्ष चव्हाट्यावर; तक्रारदारांचे तहसीलसमोर अर्धनग्न आंदोलन मंठा (प्रतिनिधी) – पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाबाबत दिलेल्या तक्रारीकडे तहसील प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तक्रारदारांनी अखेर आक्रमक भूमिका घेतली. दि. २८ एप्रिल रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत संताप व्यक्त करण्यात आला. तक्रारदारांचे म्हणणे आहे की, जेसीबी व पोकलॅन्डसारख्या यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू असून, नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे. याबाबत यापूर्वी निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, दोषी अधिकारी व संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, ड्रोनद्वारे सर्व रेती घाटांचे मोजमाप करून निष्पक्ष चौकशी करावी, तोपर्यंत उत्खनन पूर्णपणे बंद करावे, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ गरम वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने मात्र आंदोलनाची दखल घेऊन प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल का अशी अशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, “तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.1
- Post by Today One Live1
- मंठा तालुक्यातील हेलस येथे एका ७० वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अचित विश्वनाथराव खराबे (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपवले. घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये "माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही" असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे हेलस परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.1
- बळीराजाचा आक्रोश! रस्त्यावर फेकला भाजीपाला; कांदा-भाजीपाल्याला फुकट भाव राज्यात सध्या कांदा व भाजीपाल्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रचंड कष्ट करूनही उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. दरम्यान, एका संतप्त शेतकऱ्याने आपला भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींची तीव्रता अधोरेखित झाली आहे. शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जात असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही अशा प्रश्न उभा राहत आहे.1
- नांदेड (प्रतिनिधी) : बिदर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात टिप्पर आणि ऑटो यांच्यात जोरदार धडक होऊन अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टिप्पर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ऑटोमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमी प्रवासी हे मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरातील बेहारीपूर गावातील असल्याची माहिती पुढे आली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. 👉 अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.1
- माजी जि.प. सदस्य श्री संग्राम हयगले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश कासराळी ता. बिलोली जि. नांदेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संग्राम हयगले यांनी दि. 27 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा ठाणे येथील स्व. मातोश्री गंगुबाई शिंदे सभागृहात पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित श्री. संग्राम हयगले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करून शिवसेनेशी निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे महाव्यवस्थापक मा. बालाजी पाटील खतगावकर साहेब, संपर्क प्रमुख श्री मडावी, जिल्हा प्रमुख श्री उमेश मुंढे तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी मधुजी गिरगावकर उपस्थित होते. याशिवाय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री अशोक गोपछडे, लगूळ येथील माजी सरपंच बाबुराव गोसलोड, विजयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी राजकुमार गुरगुरलवार, श्री विनोद निलावार आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे बिलोली तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात याचा राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.1
- अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; ६ जनाविरुद्ध गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर शहरातील रशीदपुरा भागात अवैध गर्भपात करणाऱ्या टोळीचा सिटी चौक पोलिस व आरोग्य विभागाने संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. मंगळवारी (दि. २८) पहाटे २ वाजेच्या सुमारास ‘खमर विला’ (प्लॉट नं. १६) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर धाड टाकण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल रोजी सायंकाळी एका गर्भवती महिलेला गर्भपातासाठी या ठिकाणी आणण्यात आले होते. तिला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या; मात्र त्यानंतर पहाटे तिची प्रकृती अचानक बिघडली. तातडीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे पहाटे ३:३० वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना दिल्यानंतर तात्काळ संयुक्त धाड टाकण्यात आली. या कारवाईदरम्यान अवैध गर्भपातासाठी वापरण्यात येणारे साहित्य, सोनोग्राफी प्रोब तसेच औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकूण सहा आरोपींविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, शहरात महिनाभरात तिसऱ्यांदा अशा रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास सिटी चौक पोलीस करत आहेत.1
- आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन करत सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जनगणनेचे महत्त्व, प्रशासनाची तयारी आणि नागरिकांची भूमिका यावर प्रकाश टाकला. जिल्हाधिकारी म्हणाले की, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना, निधी वाटप, तसेच सामाजिक व आर्थिक धोरणांची आखणी ही जनगणनेच्या अचूक आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे आणि अचूक माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाच्या तयारीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, जनगणनेसाठी जिल्ह्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. तसेच, नागरिकांनी कोणतीही भीती किंवा गैरसमज न ठेवता जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, याची हमीही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जनगणना ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून त्यातूनच जिल्ह्याचा आणि देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यामुळे “माझी जनगणना, माझी जबाबदारी” या भावनेतून सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असून, ग्रामीण व शहरी भागात जनगणनेविषयी जागरूकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.1
- हातात पिस्तूल घेतलेला पिस्तुल्या महाराज कोट्यावधी रुपये घेऊन फरार. वारकऱ्यांच्या गंभीर आरोपांनी खळबळ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026. लातूर शहरात खंडापूर गावात हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास भाविक भक्तांनी केलेल्या दानाची रक्कम कोट्यावधी रुपयाने जमा झाली असताना ही रक्कम किशोर शिवनीकर या महाराजांच्या ताब्यात होती ही रक्कम घेऊन फरार झाल्याची बातमी न्यूज 18 मराठी चॅनलने प्रसारित केली आहे.1