जनगणना ही लोकशाहीची कणा; प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे” – नांदेड जिल्हाधिकारींचे आवाहन आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन करत सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जनगणनेचे महत्त्व, प्रशासनाची तयारी आणि नागरिकांची भूमिका यावर प्रकाश टाकला. जिल्हाधिकारी म्हणाले की, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना, निधी वाटप, तसेच सामाजिक व आर्थिक धोरणांची आखणी ही जनगणनेच्या अचूक आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे आणि अचूक माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाच्या तयारीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, जनगणनेसाठी जिल्ह्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. तसेच, नागरिकांनी कोणतीही भीती किंवा गैरसमज न ठेवता जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, याची हमीही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जनगणना ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून त्यातूनच जिल्ह्याचा आणि देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यामुळे “माझी जनगणना, माझी जबाबदारी” या भावनेतून सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असून, ग्रामीण व शहरी भागात जनगणनेविषयी जागरूकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
जनगणना ही लोकशाहीची कणा; प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे” – नांदेड जिल्हाधिकारींचे आवाहन आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन करत सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जनगणनेचे महत्त्व, प्रशासनाची तयारी आणि नागरिकांची भूमिका यावर प्रकाश टाकला. जिल्हाधिकारी म्हणाले की, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना, निधी वाटप, तसेच सामाजिक व आर्थिक धोरणांची आखणी ही जनगणनेच्या अचूक आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे आणि अचूक माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाच्या तयारीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, जनगणनेसाठी जिल्ह्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. तसेच, नागरिकांनी कोणतीही भीती किंवा गैरसमज न ठेवता जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, याची हमीही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जनगणना ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून त्यातूनच जिल्ह्याचा आणि देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यामुळे “माझी जनगणना, माझी जबाबदारी” या भावनेतून सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असून, ग्रामीण व शहरी भागात जनगणनेविषयी जागरूकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
- नांदेड (प्रतिनिधी) : बिदर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात टिप्पर आणि ऑटो यांच्यात जोरदार धडक होऊन अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टिप्पर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ऑटोमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमी प्रवासी हे मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरातील बेहारीपूर गावातील असल्याची माहिती पुढे आली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. 👉 अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.1
- माजी जि.प. सदस्य श्री संग्राम हयगले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश कासराळी ता. बिलोली जि. नांदेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संग्राम हयगले यांनी दि. 27 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा ठाणे येथील स्व. मातोश्री गंगुबाई शिंदे सभागृहात पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित श्री. संग्राम हयगले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करून शिवसेनेशी निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे महाव्यवस्थापक मा. बालाजी पाटील खतगावकर साहेब, संपर्क प्रमुख श्री मडावी, जिल्हा प्रमुख श्री उमेश मुंढे तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी मधुजी गिरगावकर उपस्थित होते. याशिवाय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री अशोक गोपछडे, लगूळ येथील माजी सरपंच बाबुराव गोसलोड, विजयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी राजकुमार गुरगुरलवार, श्री विनोद निलावार आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे बिलोली तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात याचा राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई4
- माजी आ. सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी शिवसेना मजबुतीकरणसाठी पाया रोवला उदगीर (विशेष प्रतिनिधी) सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी मुख्यमंत्री बनतो, हे शिवसेनेचे नेते ना. एकनाथराव शिंदे यांनी दाखवून दिले. मात्र ते मुख्यमंत्री असताना देखील लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला बाळसे धरता आले नव्हते. नगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आणि शिवसेना बांधणीचे काम सुरू झाले. खऱ्या अर्थाने पक्ष संघटन बांधणे हे काही फार सोपे नाही, मात्र अवघ्या पंधरा दिवसात सुधाकरराव भालेराव यांच्या संघटन कुशल नेतृत्वामुळे उदगीर नगरपालिकेमध्ये स्वतंत्र पॅनल शिवसेनेने टाकले, आणि 40 च्या 40 जागा लढवल्या, जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे ती ही जागा मोठ्या ताकतीने शिवसेनेने लढवली. ज्या ठिकाणी बोटावर मोजन्या इतके कार्यकर्ते होते, त्याच उदगीर शहरांमध्ये गल्लीबोळातून हजारोंच्या संख्येने रॅली निघाली, घराघरातून शिवसेना आणि ना. एकनाथराव शिंदे यांचे नाव घुमू लागले. ही किमया घडउन आणली केवळ माजी आमदार सुधाकर भालेराव आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या आणि पक्ष बांधणी संघटन कुशलतेमुळेच असे म्हटले तर नवल वाटू नये. त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील मोठ्या ताकतीने शिवसेनेने जागा लढवल्या, उदगीर विधानसभा मतदार संघामध्ये महायुती असली तरीही शिवसेनेला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती केली होती. तरीही शिवसेनेने अत्यंत तगडी लढत देत अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काही जागा तर शुल्लक मतांनी गेल्या. निवडणुका म्हटले की, हार जीत हे येणारच, परंतु अल्पावधीत माजी आमदार सुधाकर भालेराव आणि चंद्रकांत टेंगेटोल यांनी उदगीर परिसरात जादूची कांडी फिरावी, त्या पद्धतीने शिवसेनेची बांधणी केली आहे. असे म्हटले तर नवल वाटू नये. कार्यकर्त्याची मोठी फळी त्यांनी उभारून दाखवली, त्यामुळेच अनेक नेत्यांना शिवसेना हा पक्ष आवडू लागला. परिणामतः अहमदपूरचे माजी मंत्री विनायकराव पाटील, औसा येथील सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, लातूर येथील भाजपचे नेते गोमसाळे या मान्यवरांनी आपापल्या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते आणि माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री असताना देखील शिवसेनेची बांधणी एवढ्या मोठ्या ताकतीने झाली नव्हती, तेवढ्या ताकतीने सध्या लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष बांधणी सुरू आहे. कार्यकर्त्याचे संघटना अत्यंत गतिमान पद्धतीने सुरू असल्यामुळेच माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्यावर लातूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली आहे. जिल्ह्याचे संघटक म्हणून ते काम पाहत आहेत. संघटन बांधणीसाठी गाव पातळीवर त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक अशी मोहीम राबवत असताना, प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील नागरिकाच्या मनामध्ये शिवसेना घर करून बसू लागली आहे. हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी फार प्रबळ दावेदारी ठरू शकणार आहे. अहमदपूर मध्ये विनायकराव पाटील यांनी मित्र मंडळाच्या बळावर निवडणूक लढवून जिंकून दाखवली होती. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना देखील त्यांनी त्यावेळी निवडणूक जिंकली होती. आता तर शिवसेनेचे पाठबळ मिळाले आणि पक्ष बांधणी याच ताकतीने सुरू राहिली तर निश्चितपणे त्यांनाही भविष्य आहे. अशी चर्चा कार्यकर्ते करू लागले आहेत. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद वाढावी या दृष्टीने आपले प्रयत्न चालू राहतील अशी ग्वाही लातूर जिल्ह्याचे संघटक म्हणून कार्य करत असलेले माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. आपल्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक पद्धतीने शिवसेनेला बळ देण्याचे काम आपण करून दाखवू असा विश्वास जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी बोलून दाखवला आहे.4
- कछरा का दिकत1
- Post by Today One Live1
- परभणी : अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भातील बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा. जोपर्यंत अद्यावत जनगणना होत नाही तोपर्यंत याबाबत कुठलाही निर्णय न घेण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वर्गीकरणासाठी कोणते सामाजिक, आर्थिक निकष, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय किंवाकोणत्या अभ्यासगटाच्या शिफारसी विचारात घेतल्या आहेत याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डी. एन. दाभाडे, रामकिशन कांबळे, नदीम इनामदार, जयप्रकाश इंगोले, एन. जी. खंदारे, रवी सोनकांबळे, सुहास पंडीत, सिध्दार्थ भराडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.1
- आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन करत सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जनगणनेचे महत्त्व, प्रशासनाची तयारी आणि नागरिकांची भूमिका यावर प्रकाश टाकला. जिल्हाधिकारी म्हणाले की, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना, निधी वाटप, तसेच सामाजिक व आर्थिक धोरणांची आखणी ही जनगणनेच्या अचूक आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे आणि अचूक माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाच्या तयारीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, जनगणनेसाठी जिल्ह्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. तसेच, नागरिकांनी कोणतीही भीती किंवा गैरसमज न ठेवता जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, याची हमीही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जनगणना ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून त्यातूनच जिल्ह्याचा आणि देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यामुळे “माझी जनगणना, माझी जबाबदारी” या भावनेतून सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असून, ग्रामीण व शहरी भागात जनगणनेविषयी जागरूकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.1