Shuru
Apke Nagar Ki App…
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाने ४२ अंश सेल्सिअस गाठल्याने तीव्र उष्णतेची लाट आली आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून, उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. हवामान विभागाने पुढील काळात तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
सक्षम महाराष्ट्र न्युज
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाने ४२ अंश सेल्सिअस गाठल्याने तीव्र उष्णतेची लाट आली आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून, उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. हवामान विभागाने पुढील काळात तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- वाशिम जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथील काटेपूर्णा नदीपात्रात बुडालेल्या एका ३५ वर्षीय इसमाचा मृतदेह पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने तात्काळ शोधून बाहेर काढला आहे. ज्ञानेश्वर दादाराव सोळंके, रा. सीरसो गायरान, ता. मुर्तीजापूर, जि. अकोला असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते शनिवार, दिनांक २७ जून २०२६ रोजी आसरा माता देवस्थान येथे 'रोठा'साठी आले होते. मंदिरालगत असलेल्या काटेपूर्णा नदीपात्रात ज्ञानेश्वर सोळंके आंघोळीसाठी उतरले होते. त्यांनी नदीपात्रात बांधलेल्या दोरखंडाचा आधार घेत पलीकडील काठावरही गेले होते, मात्र परत येत असताना नदीच्या मध्यभागी पोहोचल्यावर अचानक त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले. काही क्षणातच ते पाण्याखाली दिसेनासे झाल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांनी तात्काळ मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन सर्च ऑपरेशनसाठी पाचारण केले. याच घटनेची माहिती दोनद येथील सचिन कावरे आणि मुर्तीजापूर येथील बंटी पिंपळे यांनीही पथकाला दिली होती. माहिती मिळताच दीपक सदाफळे यांनी त्यांचे सहकारी मयूर सळेदार, शेखर केवट, रोशन सपकाळ, अक्षय भड, साहील देशमुख, सचिन कुकडे, पवन भड आणि हर्षल वानखडे यांना शोध व बचाव साहित्यांसह घटनास्थळी रवाना केले. पथकाने घटनास्थळी पोहोचताच तातडीने नदीपात्राचे ट्रेसिंग सुरू केले आणि अवघ्या काही मिनिटांतच नदीच्या तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिला. यावेळी एपीआय गजानन राठोड, पीएसआय अभिषेक वनघरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे, चालक नागेश दांडी तसेच मृताचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या पथकाच्या जलद आणि धाडसी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.3
- Post by Indian Army2
- धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळ समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या विचारातून प्रेरणा घेऊन, पावडे यांनी आपल्या छोट्याशा घरातून हा शैक्षणिक प्रकल्प साकारला आहे. त्यांच्याकडे मोठी इमारत किंवा इतर मोठ्या सुविधा नसतानाही, त्यांनी हे कार्य हाती घेतले आहे. शिक्षणाची तळमळ, समाजासाठीची निष्ठा आणि मुलांचे भविष्य घडवण्याची जिद्द या उपक्रमाला चालना देत आहे. पावडे यांच्या मते, घर छोटं असलं तरी स्वप्नं मोठी आहेत; कारण याच ठिकाणाहून उद्याचे अधिकारी, शिक्षक आणि समाजाचे आधारस्तंभ घडणार आहेत.1
- महाराष्ट्र राज्य शासनातर्फे घेण्यात येणारी शिक्षक पूर्व परीक्षा (TET) उद्या होणार होती, मात्र पेपर फुटल्याने ती रद्द करण्यात आली आहे. याच TET पेपर फुटी प्रकरणी आज नांदेड शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. नांदेड जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले चौकात ‘बोंबा-बोंब’ आंदोलन करण्यात आले, ज्यामध्ये शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या पेपर फुटीनंतर काँग्रेस पक्ष ॲक्शन मोडवर आला असून, शासनाच्या या निर्णयाविरोधात त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.1
- राज्यात सुरू असलेल्या 'ऑपरेशन कवच' या विशेष मोहिमेअंतर्गत, धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर पोलीस स्टेशनने आमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी एक भव्य जनजागृती बाईक रॅली आयोजित केली. या रॅलीच्या माध्यमातून युवकांसह सर्वसामान्य नागरिकांना नशेपासून दूर राहण्याचे तसेच व्यसनमुक्त, सुदृढ आणि सुरक्षित समाज घडविण्याचे प्रभावी आवाहन करण्यात आले. दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन परिसरातून निघालेली ही बाईक रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरली. रॅलीदरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'नशा सोडा, जीवन जोडा', 'आमली पदार्थांना ठाम नकार', 'व्यसनमुक्त युवक, सशक्त भारत' अशा विविध जनजागृतीपर संदेशांचे फलक हातात घेऊन नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी युवकांना आमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच त्यांना नशेच्या आहारी न जाता शिक्षण, क्रीडा, सामाजिक कार्य व राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. या जनजागृती रॅलीमध्ये ठाणेदार गिरीश ताथोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, महिला व पुरुष पोलीस अधिकारी, अमलदार आणि सर्व पोलीस कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत दत्तापूर पोलिसांच्या जनहिताच्या या मोहिमेचे कौतुक केले. 'ऑपरेशन कवच' अंतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणारा आणि समाजाला व्यसनमुक्तीच्या दिशेने प्रेरित करणारा ठरला. यावेळी समाजातील प्रत्येक नागरिकाने आमली पदार्थांविरोधात सजग राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.1
- वणी येथील शासकीय मैदानात मोहरम उत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, ज्यामुळे शासकीय मैदान भाविकांच्या अलोट गर्दीने गजबजून गेले होते.1
- मुंब्रा येथील शिमला पार्क जंक्शनवर नवा वाहतूक सिग्नल सुरू करण्यात आला आहे. याचा मुख्य उद्देश वाहतूक सुरळीत करणे आणि अपघातांवर नियंत्रण मिळवणे हा आहे. मात्र, आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करतील की, पूर्वीप्रमाणेच सिग्नलकडे दुर्लक्ष करत राहतील? यावर तुमचं काय मत आहे?1
- सामाजिक न्याय दिनानिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने बचत गटांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि जमिनीचे वाटप करण्यात आले.1