किनवट तालुक्यात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व आरोग्य शिबिर। किनवट : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने किनवट तालुक्यात जागतिक महिला दिन उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. आदिवासी व डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यात महिलांना एकत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर सिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याध्यक्ष विष्णू कंकाळ यांच्या संकल्पनेतून आणि राज्य उपाध्यक्ष मारोती शिकारे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन किनवट तालुका अध्यक्षा परवीन शेख यांनी केले. या आरोग्य शिबिराचा अनेक महिलांनी लाभ घेतला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच संघटनेत नव्याने प्रवेश घेतलेल्या महिला पदाधिकाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर सिंह ठाकुर, राज्य उपाध्यक्ष मारोती शिकारे आणि पुरोगामी शिक्षक सेवा समितीचे राज्याध्यक्ष प्रभू सावंत उपस्थित होते. त्यांनी महिलांच्या सन्मानासोबत आरोग्याबाबत जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, स्थानिक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम किनवट तालुक्यात महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा ठरला.

- प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- Post by Nanded_71
- हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या, धोकादायक वीज पोल, डीपी हलविणे, वाढती वीजबिले तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३३ केव्ही उपकेंद्रासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.1
- Post by Info news1
- Post by Mohammad Rafikh1
- Post by Press Mukhed Bablu Mulla2
- अमरण उपोषणाचा दुसरा दिवस भानेगाव येथील विविध प्रश्नांवर न्याय मिळावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सुरू केलेल्या अमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. भानेगाव येथील जल जीवन मिशन (JJM) व पाणीपुरवठा कामातील अनियमितता, बनावट कागदपत्रे व सह्या, सन 2021–23 मधील ग्रामपंचायत विकास कामांची चौकशी, जि.प. प्राथमिक शाळेतील कामांची चौकशी, तसेच माजी मुख्याध्यापक चौकशीत दोषी आढळूनही कारवाई न झाल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पूरामुळे बंद होणारा गावाचा जीवनावश्यक रस्ता पुनर्वसन जागेतून तात्काळ खुला करावा व बेलगव्हाण–भानेगाव पांदन रस्ता तात्काळ सुरू करावा, या मागण्यांसाठी उपोषण सुरू असल्याचे सांगण्यात आले.1
- Post by Nanded_71