दिनांक २७ जून २०२६ रोजी मंठा तालुक्यातील नायगाव येथे रयत शेतकरी गटाच्या सर्व चौदा सदस्यांनी 'एक पेड माँ के नाम' या अभिनव उपक्रमांतर्गत आपल्या आईच्या सन्मानार्थ प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण २८ आंब्याच्या रोपांची लागवड केली. यावेळी त्यांनी या रोपांना संरक्षणासाठी कुंपणही उभारले आणि वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. या उपक्रमाचे निमंत्रक अविनाश राठोड यांनी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, मानवाचे दीर्घायुष्य, पृथ्वीचे पर्यावरणीय संतुलन आणि भावी पिढ्यांचे सुरक्षित भविष्य यासाठी वृक्षलागवड व त्यांचे संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी नायगाव, दहिफळ खंदारे आणि गारटेकी येथील रयत शेतकरी गटातील सदस्यांना आपापल्या गावातही 'एक पेड माँ के नाम' अभियान राबवून लावलेल्या वृक्षांचे संरक्षण व संगोपन करण्याचे आवाहन केले. वृक्षांपासून ऑक्सिजन, औषधी, फळे, सावली, पाणी संवर्धन, सेंद्रिय खत तसेच जमिनीची धूप रोखण्यास मदत मिळते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास गजानन फुफाटे, समाधान देशमुख, पवन खंदारे, चेतन जाधव, वैभव देशमुख, गौतम दाहिजे, विजय जाधव, प्रकाश दाहिजे, गोविंद सानप, विकी चव्हाण, कृष्णा कोकाटे, शंकर कोकाटे, भरत राठोड यांच्यासह रयत शेतकरी गटाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

- दिनांक २७ जून २०२६ रोजी मंठा तालुक्यातील नायगाव येथे रयत शेतकरी गटाच्या सर्व चौदा सदस्यांनी 'एक पेड माँ के नाम' या अभिनव उपक्रमांतर्गत आपल्या आईच्या सन्मानार्थ प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण २८ आंब्याच्या रोपांची लागवड केली. यावेळी त्यांनी या रोपांना संरक्षणासाठी कुंपणही उभारले आणि वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. या उपक्रमाचे निमंत्रक अविनाश राठोड यांनी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, मानवाचे दीर्घायुष्य, पृथ्वीचे पर्यावरणीय संतुलन आणि भावी पिढ्यांचे सुरक्षित भविष्य यासाठी वृक्षलागवड व त्यांचे संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी नायगाव, दहिफळ खंदारे आणि गारटेकी येथील रयत शेतकरी गटातील सदस्यांना आपापल्या गावातही 'एक पेड माँ के नाम' अभियान राबवून लावलेल्या वृक्षांचे संरक्षण व संगोपन करण्याचे आवाहन केले. वृक्षांपासून ऑक्सिजन, औषधी, फळे, सावली, पाणी संवर्धन, सेंद्रिय खत तसेच जमिनीची धूप रोखण्यास मदत मिळते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास गजानन फुफाटे, समाधान देशमुख, पवन खंदारे, चेतन जाधव, वैभव देशमुख, गौतम दाहिजे, विजय जाधव, प्रकाश दाहिजे, गोविंद सानप, विकी चव्हाण, कृष्णा कोकाटे, शंकर कोकाटे, भरत राठोड यांच्यासह रयत शेतकरी गटाचे सर्व सदस्य उपस्थित होते.1
- जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवत गुरुवारी, २५ जून रोजी विविध ठिकाणी धडक कारवाई केली. यात जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला, अवैध देशी दारू जप्त करण्यात आली आणि विनापरवाना धारदार तलवार बाळगणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तळणी बसस्थानकाजवळ देवगाव रोडलगत पैशांवर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी ५.५० वाजता छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ४ हजार ९२० रुपये रोख रक्कम, सुमारे १ लाख १० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी आणि ५२ पत्त्यांचा कॅट असा एकूण १ लाख १४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्याच दिवशी सायंकाळी ७.५० वाजता संभाजीनगर परिसरात विनापरवाना धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एका इसमावर कारवाई करत सुमारे ८०० रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली; आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच, तळणी बसस्थानक परिसरात एका संशयित व्यक्तीची तपासणी केली असता, त्याच्याकडून १८० एमएलच्या 'भिंगरी संत्रा' देशी दारूच्या १४ बाटल्या, म्हणजेच अंदाजे १ हजार ४०० रुपये किमतीचा साठा विनापरवाना बाळगताना आढळून आला, याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जालना पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. तिन्ही प्रकरणांचा पुढील तपास संबंधित तपास अधिकारी करत आहेत. दरम्यान, परिसरात जुगार, अवैध दारू विक्री, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे किंवा इतर कोणतेही अवैध प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ मंठा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले असून, अशा अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.1
- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर फुटल्याच्या घटनेमुळे रद्द केली आहे. पेपर फुटीचा हा प्रकार अत्यंत लज्जास्पद असून, यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.1
- महानगर पालिकेच्या महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते शाळेसाठी संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमावेळी वृक्षारोपण उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. उद्योजक घनश्याम शेठ गोयल यांनी या कामासाठी तातडीने पुढाकार घेत, सीएसआर निधीतून हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.1
- तुकाराम मुंढे यांनी हॉटेलच्या किचनमध्ये लागू होणाऱ्या नियमांविषयी एक मोठे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानुसार, आता हॉटेलच्या स्वयंपाकघरात काही नियम बंधनकारक असतील.1
- समाजकल्याण विभागाने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरी केली.1
- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील बस स्थानकात दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली, ज्यात बसमध्ये आधी जागा मिळवण्याच्या घाईत एका प्रवाशाचा धावत्या बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवासी फलाटावर येत असलेल्या बसमध्ये जागा मिळवण्यासाठी बससोबत धावत होता. मात्र, अचानक त्याचा तोल गेल्याने तो थेट बसच्या मागील चाकाखाली आला. या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आणि प्रशासनाने त्याला तातडीने स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) ग्रामीण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. जागा पकडण्याची घाईच त्याच्या जीवावर बेतली.1