logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उमरखेड विकासकामांत ‘दहशती’चा अडथळा; ठेकेदार, अधिकाऱ्यांना धमकावल्याने खळबळ पैशांची मागणी आणि प्रशासकीय हस्तक्षेपाचे गंभीर आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल उमरखेड : शहरातील विकासकामांत वाढता बेकायदेशीर हस्तक्षेप, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या धमक्या, तसेच आर्थिक मागणीच्या गंभीर आरोपांमुळे उमरखेडमधील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यवतमाळ आणि उमरखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पुराव्यासह तक्रार दाखल करण्यात आली असून, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजाचे ‘ओलीस’ नाट्य? प्राप्त तक्रारीनुसार, शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील जनशक्ती पॅनलशी संबंधित एका नगरसेविकेचे पती (जे स्वतः ठेकेदार आहेत) आणि प्रभाग क्रमांक २ मधील काह विशिष्ट व्यक्तींकडून नगर परिषद प्रशासनाच्या कामकाजात सातत्याने अडथळे निर्माण केले जात आहेत. लोकप्रतिनिधींच्या नावाचा आणि राजकीय वलयाचा गैरवापर करून विकासकामे रोखली जात असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. धमकावण्याची नवी ‘पद्धत’ विकासकामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे. “तुमच्यावर कारवाई करतो,” “गुणवत्ता विभागाकडून चौकशी लावून तुमचे बिल रोखतो,” अशा शब्दांत धमकावून शासकीय कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. कामाचा दर्जा तपासण्याच्या नावाखाली केवळ अडथळे निर्माण करून ‘अर्थपूर्ण’ तडजोडीसाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा आता शहरात उघडपणे होऊ लागली आहे. तक्रारीतील महत्त्वाचे मुद्दे आणि मागण्या: बोगस कामांची चौकशी: संबंधित नगरसेविकेच्या पतीने यापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत केलेली कामे निकृष्ट आणि बोगस असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व कामांची ‘गुणवत्ता नियंत्रण विभागा’मार्फत (Quality Control) उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. फौजदारी कारवाई: भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी. काळ्या यादीत समावेश: शासकीय निधीचा अपहार करणाऱ्या आणि नियमबाह्य हस्तक्षेप करणाऱ्या ठेकेदारांना कायमस्वरूपी ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्याची मागणी. निधी वसुली: निकृष्ट कामांमुळे झालेल्या नुकसानीची रक्कम संबंधितांकडून व्याजासह वसूल करावी. > “प्रशासकीय कामात ढवळाढवळ करून विकासकामांना खीळ घालण्याचा प्रकार लोकशाहीला मारक आहे. जर प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर उमरखेडच्या सुजाण नागरिकांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.” > तक्रारदार समन्वय समिती, उमरखेड. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण सत्ताधारी आणि विरोधी गटांमधील संघर्षात आता ‘ठेकेदारी’ आणि ‘कमिशन’ या विषयांनी प्रवेश केल्यामुळे उमरखेड नगर परिषदेची प्रतिमा मलीन होत आहे. एका बाजूला शहराच्या विकासाचा दावा केला जात असताना, दुसऱ्या बाजूला अंतर्गत धमकावण्याच्या सत्रांमुळे प्रामाणिक अधिकारी काम करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी या गंभीर प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

1 hr ago
user_Shaikh irfan Shaikh isa
Shaikh irfan Shaikh isa
उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
1 hr ago
84a02e03-c170-48aa-94e9-5761f3a42c07

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना २०२६ च्या जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यामुळे भविष्यातील पिढ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
    1
    यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना २०२६ च्या जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यामुळे भविष्यातील पिढ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
    user_शाहदत खान अहमद नुर खान
    शाहदत खान अहमद नुर खान
    Newspaper publisher उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मांवरील एका विधानामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यामागील हेतू आणि परिणामांवर चर्चा सुरू आहे.
    1
    मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मांवरील एका विधानामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यामागील हेतू आणि परिणामांवर चर्चा सुरू आहे.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हि हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हिंगोली (प्रतिनिधी): शहरातील बाजारपेठेतील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत पसरणारे कचऱ्याचे साम्राज्य रोखण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रेखाताई श्रीराम बांगर यांच्या संकल्पनेतून शहरातील तब्बल ७०० ते ८०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे (कचरा कुंडी) प्रत्यक्ष दुकानावर जाऊन वाटप करण्यात आले. प्रत्यक्ष दुकानावर जाऊन संवाद गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत अस्वच्छता वाढत असल्याचे नगराध्यक्षांच्या निदर्शनास आले होते. केवळ दंड आकारण्यापेक्षा व्यापाऱ्यांना स्वच्छतेच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांनी स्वतः व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना ओला व सुका कचरा डस्टबिनमध्येच टाकण्याचे आवाहन केले. आमदार संतोष बांगर कडून कौतुक या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी नगराध्यक्षांच्या या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "हिंगोली शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही केवळ पालिकेचीच नाही, तर प्रत्येक नागरिकाची आणि व्यापाऱ्याची जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करून कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबिनचा वापर करावा." प्रशासकीय व राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या मोहिमेत मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष मामूद भगवान यांच्यासह पालिकेचे सर्व प्रमुख पदाधिकारी खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. यांची लाभली उपस्थिती: कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष बांगर, राम कदम, कपिल खंडेलवाल, चंदू लव्हाळे, साद अहमद, सज्जाद बिल्डर, गणेश बांगर, रवींद्र वाडे, निधी गोरे, सुरभी चौधरी, राम किसन बांगर, सुमित कांबळे, खली बांगर, श्याम कदम, विशाल गोठरे यांनी परिश्रम घेतले. तसेच स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के, अक्षय देशमुख आणि कैलास थिटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठी फौज यावेळी तैनात होती. प्रतिक्रिया: "बाजारपेठ ही शहराचे हृदय असते. ते स्वच्छ राहिल्यास शहराचे आरोग्य चांगले राहील. व्यापाऱ्यांनी दिलेले डस्टबिन वापरावेत आणि आपल्या शहराला 'नंबर वन' करण्यासाठी सहकार्य करावे." — सौ. रेखाताई श्रीराम बांगर, नगराध्यक्षा, हिंगोली. #hingoli
    1
    हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप
आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन
हि

हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप
आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन
हिंगोली (प्रतिनिधी):
शहरातील बाजारपेठेतील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत पसरणारे कचऱ्याचे साम्राज्य रोखण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रेखाताई श्रीराम बांगर यांच्या संकल्पनेतून शहरातील तब्बल ७०० ते ८०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे (कचरा कुंडी) प्रत्यक्ष दुकानावर जाऊन वाटप करण्यात आले.
प्रत्यक्ष दुकानावर जाऊन संवाद
गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत अस्वच्छता वाढत असल्याचे नगराध्यक्षांच्या निदर्शनास आले होते. केवळ दंड आकारण्यापेक्षा व्यापाऱ्यांना स्वच्छतेच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांनी स्वतः व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना ओला व सुका कचरा डस्टबिनमध्येच टाकण्याचे आवाहन केले.
आमदार संतोष बांगर कडून कौतुक
या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी नगराध्यक्षांच्या या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "हिंगोली शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही केवळ पालिकेचीच नाही, तर प्रत्येक नागरिकाची आणि व्यापाऱ्याची जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करून कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबिनचा वापर करावा."
प्रशासकीय व राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या मोहिमेत मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष मामूद भगवान यांच्यासह पालिकेचे सर्व प्रमुख पदाधिकारी खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते.
यांची लाभली उपस्थिती:
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष बांगर, राम कदम, कपिल खंडेलवाल, चंदू लव्हाळे, साद अहमद, सज्जाद बिल्डर, गणेश बांगर, रवींद्र वाडे, निधी गोरे, सुरभी चौधरी, राम किसन बांगर, सुमित कांबळे, खली बांगर, श्याम कदम, विशाल गोठरे यांनी परिश्रम घेतले. तसेच स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के, अक्षय देशमुख आणि कैलास थिटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठी फौज यावेळी तैनात होती.
प्रतिक्रिया:
"बाजारपेठ ही शहराचे हृदय असते. ते स्वच्छ राहिल्यास शहराचे आरोग्य चांगले राहील. व्यापाऱ्यांनी दिलेले डस्टबिन वापरावेत आणि आपल्या शहराला 'नंबर वन' करण्यासाठी सहकार्य करावे."
— सौ. रेखाताई श्रीराम बांगर, नगराध्यक्षा, हिंगोली.
#hingoli
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप
    1
    “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप
“सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    4 hrs ago
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे परभणी जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांनी महाराष्ट्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, पुरोगामी राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. राज्य सरकारच्या धोरणांविरोधात बोलण्याची संधी मिळत नसल्याचा दावा गव्हाणे यांनी केला.
    1
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे परभणी जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांनी महाराष्ट्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, पुरोगामी राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. राज्य सरकारच्या धोरणांविरोधात बोलण्याची संधी मिळत नसल्याचा दावा गव्हाणे यांनी केला.
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सोनपेठ येथे बाल संस्कार शिबिराला सुरुवात गुरु नंदकिशोर येथे बाल संस्कार शिबिर
    1
    सोनपेठ येथे बाल संस्कार शिबिराला सुरुवात गुरु नंदकिशोर येथे बाल संस्कार शिबिर
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • “गावातील नाल्यात बसून उपोषणाचा इशारा; आवलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा संताप अनावर!” मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातू ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
    1
    “गावातील नाल्यात बसून उपोषणाचा इशारा; आवलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा संताप अनावर!”

मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे.

विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

“जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे.
विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
“जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातू
ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शक्ती पीठ महामार्गाच्या अध्यादेशाची होळी करत तीव्र विरोध दर्शवला. शेतकऱ्यांनी हा महामार्ग तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
    1
    महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शक्ती पीठ महामार्गाच्या अध्यादेशाची होळी करत तीव्र विरोध दर्शवला. शेतकऱ्यांनी हा महामार्ग तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.