logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

काँग्रेसला मिळणार नवीन जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, महाराष्ट्रात संघटन सृजन अभियान सुरू. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच विविध सेलचे अध्यक्ष निवडण्यासाठी संघटन सृजन अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक ब्लॉकपर्यंत जावून कार्यकर्त्यांशी चर्चा करून अध्यक्ष कसा असावा, कोण असावा, याबाबत माहिती घेण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात आजपासून राज्यात झाली आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधून हा अहवाल तयार करून 21 एप्रिलपर्यंत वरिष्ठांना सादर करण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पर्यवेक्षक तथा अलीगढ येथील माजी आमदार विवेक बन्सल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.शहागंजमधील गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खा.डॉ. कल्याण काळे, प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते अतुल लोंढे, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे, एड मुजाहिद खान, धनंजय चौधरी, प्रदेश पदाधिकारी तथा माजी आमदार नामदेव पवार, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ, ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया, डॉ. सरताज पठाण, आकेफ रझवी, एड सय्यद अक्रम, इंजिनिअर इफ्तेखार शेख, अनिस पटेल, मोईन इनामदार आदींची उपस्थिती होती. यावेळी बन्सल म्हणाले की, देशभरात संघटन सृजन अभियान सुरू झाले असून, महाराष्ट्रात 27 मार्चपासून हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक यासह विविध विभागाचे जिल्हाध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. यावेळी माजी मंत्री थोरात यांनीही सृजन अभियानाबाबत मनोगत व्यक्त केले.

15 hrs ago
user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
15 hrs ago
4d7474ba-8b53-4269-9c2a-a52c38cb427a

काँग्रेसला मिळणार नवीन जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, महाराष्ट्रात संघटन सृजन अभियान सुरू. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच विविध सेलचे अध्यक्ष निवडण्यासाठी संघटन सृजन अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक ब्लॉकपर्यंत जावून कार्यकर्त्यांशी चर्चा करून अध्यक्ष कसा असावा, कोण असावा, याबाबत माहिती घेण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात आजपासून राज्यात झाली आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधून हा अहवाल तयार करून 21 एप्रिलपर्यंत वरिष्ठांना सादर करण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पर्यवेक्षक तथा अलीगढ येथील माजी आमदार विवेक बन्सल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.शहागंजमधील गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खा.डॉ. कल्याण काळे, प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते अतुल लोंढे, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे, एड मुजाहिद खान, धनंजय चौधरी, प्रदेश पदाधिकारी तथा माजी आमदार नामदेव पवार, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ, ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया, डॉ. सरताज पठाण, आकेफ रझवी, एड सय्यद अक्रम, इंजिनिअर इफ्तेखार शेख, अनिस पटेल, मोईन इनामदार आदींची उपस्थिती होती. यावेळी बन्सल म्हणाले की, देशभरात संघटन सृजन अभियान सुरू झाले असून, महाराष्ट्रात 27 मार्चपासून हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक यासह विविध विभागाचे जिल्हाध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. यावेळी माजी मंत्री थोरात यांनीही सृजन अभियानाबाबत मनोगत व्यक्त केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वैजापूर.महावितरण कार्यालयांचे दुर्लक्ष विज ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम महावितरण कंपनी शिवराई सबस्टेशन येथून दोन दिवसांपासून लाईट गुल एक ही महावितरण कंपनीचे अधिकारी फिरकले नाही गोळवाडी दहेगाव करंजगाव राहेगव्हाण विजग्रहकांना सेवा देण्यासाठी अ कार्यक्षम.
    2
    वैजापूर.महावितरण कार्यालयांचे दुर्लक्ष विज ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम महावितरण कंपनी शिवराई सबस्टेशन येथून दोन दिवसांपासून लाईट गुल एक ही महावितरण कंपनीचे अधिकारी फिरकले नाही गोळवाडी दहेगाव करंजगाव राहेगव्हाण विजग्रहकांना सेवा देण्यासाठी अ कार्यक्षम.
    user_SU NEWS 📡
    SU NEWS 📡
    Social Media Manager वैजापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Exclusive Interview Bk Dr Donika Meditation | Gallinews Bharat
    1
    Exclusive Interview Bk Dr Donika Meditation | Gallinews Bharat
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    3 hrs ago
  • छ. संभाजीनगर प्रतिनिधी: बिबवेवाडी गावठाण येथील शाळेतून गेले 4,30 तास पाणी वाहत आहे...ह्यावर उपाययोजना करणार आहे की नाही, का ह्याच उत्तर पण आम्ही नगरसेवकांना मागायच की नेहरूंना शाळेतून 6 वाजल्यापासून पाणी वाहत आहे... अजूनही उपाययोजना नाही ...
    1
    छ. संभाजीनगर प्रतिनिधी: बिबवेवाडी गावठाण येथील शाळेतून गेले 4,30 तास पाणी वाहत आहे...ह्यावर उपाययोजना करणार आहे की नाही,
का ह्याच उत्तर पण आम्ही नगरसेवकांना मागायच की नेहरूंना 
शाळेतून 
6 वाजल्यापासून पाणी वाहत आहे...
अजूनही उपाययोजना नाही ...
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आज गुरुवार 2 एप्रिल रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरातील रांजणगाव परिसरात काही जणांनी एका तरुणाला क्रिकेटच्या लाकडी बॅटने बेदम मारहाण केली आहे सदरील घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी पोलिसांनी घेतली असून मात्र सदरील व्हिडिओ आज रोजी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    1
    आज गुरुवार 2 एप्रिल रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरातील रांजणगाव परिसरात काही जणांनी एका तरुणाला क्रिकेटच्या लाकडी बॅटने बेदम मारहाण केली आहे सदरील घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी पोलिसांनी घेतली असून मात्र सदरील व्हिडिओ आज रोजी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • राजनगाव येथे चार ते पाच जणांच्या टोळक्याने एक जनास बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे
    1
    राजनगाव येथे चार ते पाच जणांच्या टोळक्याने एक जनास बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • तालुक्यातील धानोरे येथील शिवशक्ती मारुती धाम येथे हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ऋषिकेश येथून आलेले श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी भाविकांच्या वतीने आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. ​कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ७ वाजेपासून होमहवन आणि धार्मिक विधींना सुरुवात झाली. त्यानंतर ह.भ.प. दिलीप महाराज संदगीर (आहेरवाडीकर) यांचे कीर्तन रंगले. कीर्तनानंतर झालेल्या विशेष सोहळ्यात शिवसेना गटनेते गणेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि मच्छू काका पवार यांनी श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा यथोचित सत्कार केला. ​या प्रसंगी गोकुळ पावळे, सागर शिंदे, नितीन कुक्कुर यांच्यासह परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महंत रामेश्वरगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती मारुती धाम भक्त मंडळाने या उत्सवाचे नेटके नियोजन केले होते. दुपारच्या सत्रात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्यामुळे धानोरे परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच येवला शहर तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर मनमाड रोड,रोकडे हनुमान मंदिर बदापूर रोड,वल्लभनगर येथील हनुमान मंदिर,नांदेड सर रेल्वे गेट जवळील हनुमान मंदिर,गंगा दरवाजा येथील हनुमान मंदिर,वडगाव येथील हनुमान मंदिर ,सिद्धेश्वर हनुमान मंदिर मधली गल्लीअशा विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जयंती शहरासह तालुक्यातउत्साहात साजरी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    4
    तालुक्यातील धानोरे येथील शिवशक्ती मारुती धाम येथे हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ऋषिकेश येथून आलेले श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी भाविकांच्या वतीने आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
​कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ७ वाजेपासून होमहवन आणि धार्मिक विधींना सुरुवात झाली. त्यानंतर ह.भ.प. दिलीप महाराज संदगीर (आहेरवाडीकर) यांचे कीर्तन रंगले. कीर्तनानंतर झालेल्या विशेष सोहळ्यात शिवसेना गटनेते गणेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि मच्छू काका पवार यांनी श्री महंत गोपालगिरीजी महाराज यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा यथोचित सत्कार केला.
​या प्रसंगी गोकुळ पावळे, सागर शिंदे, नितीन कुक्कुर यांच्यासह परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महंत रामेश्वरगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती मारुती धाम भक्त मंडळाने या उत्सवाचे नेटके नियोजन केले होते. दुपारच्या सत्रात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्यामुळे धानोरे परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
तसेच येवला शहर तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर मनमाड रोड,रोकडे हनुमान मंदिर बदापूर रोड,वल्लभनगर येथील हनुमान मंदिर,नांदेड सर रेल्वे गेट जवळील हनुमान मंदिर,गंगा दरवाजा येथील हनुमान मंदिर,वडगाव येथील हनुमान मंदिर ,सिद्धेश्वर हनुमान मंदिर मधली गल्लीअशा विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जयंती शहरासह तालुक्यातउत्साहात साजरी करण्यात आली
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • नेकनूर येथे कासार समाजाचा महाकुंभ..! कालिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी..
    1
    नेकनूर येथे कासार समाजाचा महाकुंभ..!
कालिका मातेच्या दर्शनासाठी  भाविकांची गर्दी..
    user_Mahesh Mangrulkar
    Mahesh Mangrulkar
    Shirur (Kasar), Beed•
    3 hrs ago
  • आज गुरुवार 2 एप्रिल रोजी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली की महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेतून 71 लाख लाडक्या बहिणीचे नाव लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे अशी माहिती अंबादास दानवे यांनी आज रोजी पत्रकार परिषदेत सदरील माहिती दिली आहे.
    1
    आज गुरुवार 2 एप्रिल रोजी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली की महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेतून 71 लाख लाडक्या बहिणीचे नाव लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे अशी माहिती अंबादास दानवे यांनी आज रोजी पत्रकार परिषदेत सदरील माहिती दिली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.