भाजपा सरकारने लाज आणली, MPSC च्या औषध निरीक्षक परिक्षेतही घोटाळा, तरुणांच्या स्वप्नावर बुलडोझर फिरवला– हर्षवर्धन सपकाळ मुंबई, दि. २६ ऑगस्ट २०२६. मध्य प्रदेशात भाजप सरकारच्या काळात व्यापम घोटाळा झाला, त्याची पुनरावृत्ती भाजपाशासित प्रत्येक राज्यातील परीक्षेमध्ये होत आहे. नीट पेपरफुटी, टीईटी पेपरफुटी, तलाठी पेपरफुटी, CBSE पेपर फुटी नंतर आता MPSC कडून घेतलेल्या औषध निरीक्षक परिक्षेचा पेपरही फुटल्याचे सिद्ध झाले आहे. पेपरफुटी झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली असतानाही परीक्षा प्रक्रिया रेटून नेण्यात आली. आता MPSC नेच पेपर फुटल्याचे मान्य करत, ही भरती प्रक्रियाच रद्द केली आहे. हा प्रकार हजारो तरुणांच्या स्वप्नावर बुलडोझर फिरवण्याचा असून एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ न शकणाऱ्या भाजपा सरकारने लाज आणली आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पेपरफुटीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, MPSC कडून २२ मार्च २०२६ रोजी औषध निरीक्षक पदासाठी ऑफलाईन परीक्षा घेण्यात आली, या परिक्षेचा पेपर फुटल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती पण MPSC अथवा राज्य सरकार यापैकी कोणीही त्याची दखल घेतली नाही, ही भरती प्रक्रिया पूर्ण करून ४८८ उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता या परिक्षेचा पेपर फुटला होता हे तपासात सिद्ध झाल्याने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरिक्षा घेण्याचा निर्णय MPSC ने जाहीर केला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून विद्यार्थ्यांच्या प्रयत्नावर, मेहनतीवर पाणी फेरणारा आहे. परिक्षेत घोटाळा झाल्याची तक्रार आल्यानंतरही एमपीएससीने भरती प्रक्रिया पूर्ण का केली? MPSC ही स्वायत्त संस्था आहे, पण मागील काही वर्षातील या संस्थेचा कारभार पाहता त्यांच्या कार्यालयाला टाळे का ठोकू नये असा प्रश्न उपस्थित होतो. MPSC ने कारभार सुधारावा यासाठी पुण्यासह अनेक ठिकाणी विद्यार्थ्यानी सातत्याने आंदोलने केली, काँग्रेस पक्षानेही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला पण MPSC चा कारभार काही सुधारलेला नाही. MPSC स्वायत्त संस्था आहे असे म्हणून सरकार हात झटकू शकत नाही. हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या संस्थेला वठणीवर आणा. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रों की गुंज कार्यक्रमातही एका विद्यार्थ्यानीने औषध निरीक्षक परिक्षेचा पेपर फुटल्याची तक्रार केली होती. आती ही भरती प्रक्रियाच रद्द करण्यात आली आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी चालवलेला खेळ थांबवावा अन्यथा ही तरुणाई रस्त्यावर उतरली तर सरकारची ‘पळता भुई थोडी’ होईल.. असा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे. लोकशाहीत आंदोलन करण्यावर मज्जाव.. लोकशाही व्यवस्थेत संविधानाने अन्याय, अत्याचार वा सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु सत्तेत असलेले भाजपा महायुती सरकारला आंदोलकांचा आवाज दडपायचा आहे. सरकारला कोणी जाब विचारू नये असे त्यांना वाटते म्हणूनच त्यांनी आंदोलन करण्यावर जाचक अटी लादून निर्बंध आणले आहेत, त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे. मुंबईत आंदोलन फक्त आझाद मैदानावरच करा, शासकीय कामकाजाच्या दिवशीच आंदोलन करा, आंदोलन एकच दिवस आणि तेही सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळतच करा, असा फतवा काढला आहे. सरकारने घालून दिलेले हे नियम दडपशाहीचा प्रकार असून ते तात्काळ रद्द करावेत, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले..

- मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी | मुंबईकरांची मालमत्ता पुन्हा मुंबईकरांना सुरक्षितपणे सुपूर्द! मुंबई पोलिसांनी तांत्रिक आणि मानवी कौशल्याच्या आधारे केलेल्या तपासातून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला. 📱 ४१० मोबाईल 💍 ७९ ग्रॅम सोन्याचे दागिने 🏍️ ५ मोटारसायकल 💰 ₹७९,८५५ रोख रक्कम एकूण ₹५१,७३,३४१ किमतीचा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना सुरक्षितपणे परत करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीला सलाम! 👮♂️🇮🇳1
- कैंसर से जूझ रहे पिता की 7 साल के बेटे से आखिरी बात, वीडियो ने नम कर दीं हजारों आंखें। दिल को झकझोर देने वाला वीडियो सोशल मीडिया पर वायरल, पिता-पुत्र के इस भावुक पल ने हर किसी को रुलाया एक पिता और उसके मासूम 7 साल के बेटे के बीच का यह भावुक पल सोशल मीडिया पर लोगों की आंखें नम कर रहा है। वायरल वीडियो में कैंसर से जूझ रहे पिता अपने छोटे से बेटे के साथ नजर आ रहे हैं। बीमारी की गंभीरता के बीच पिता और बेटे की बातचीत ने देखने वालों को अंदर तक झकझोर दिया। मासूम बेटे की आंखों में अपने पिता के लिए प्यार और चिंता साफ दिखाई देती है, वहीं पिता भी अपने बच्चे से बेहद भावुक अंदाज में बात करते नजर आ रहे हैं। बताया जा रहा है कि यह पिता अपने जीवन के बेहद कठिन दौर से गुजर रहा है और बेटे के साथ बिताया यह पल परिवार के लिए बेहद भावुक है। वीडियो के साथ सोशल मीडिया पर लिखा गया है कि “मरने से पहले पिता की आखिरी बात सुनकर हर किसी की आंखें नम हो गईं।” हालांकि वायरल पोस्ट में किए गए सभी दावों की स्वतंत्र पुष्टि नहीं हो सकी है। यह दृश्य एक बार फिर याद दिलाता है कि जिंदगी कितनी भी मुश्किल क्यों न हो, एक पिता के दिल में अपने बच्चे के लिए आखिरी सांस तक सिर्फ प्यार और चिंता रहती है। इस भावुक वीडियो को देखकर सोशल मीडिया यूजर्स पिता के जल्द स्वस्थ होने की दुआ कर रहे हैं और बच्चे के लिए भी हिम्मत की प्रार्थना कर रहे हैं। कुछ रिश्ते शब्दों से नहीं, आंखों के आंसुओं से समझ आते हैं… पिता और बेटे का यह रिश्ता भी उन्हीं रिश्तों में से एक है। 🥺💔1
- 🚨 भांडुप में बड़ा हादसा टला! मुंबई के भांडुप में 10वीं मंजिल से गिरी महिला पेड़ की शाखाओं में फंस गई, जिससे उसकी जान बच गई। 🌳🙏 सूचना मिलते ही अग्निशमन दल और पुलिस ने मौके पर पहुंचकर रेस्क्यू ऑपरेशन चलाया और महिला को सुरक्षित नीचे उतारा। 🚨 भांडुप में बड़ा हादसा टला! मुंबई के भांडुप में 10वीं मंजिल से गिरी महिला पेड़ की शाखाओं में फंस गई, जिससे उसकी जान बच गई। 🌳🙏 सूचना मिलते ही अग्निशमन दल और पुलिस ने मौके पर पहुंचकर रेस्क्यू ऑपरेशन चलाया और महिला को सुरक्षित नीचे उतारा।1
- मुंबई मधी मोठी दुर्घटना झाली आहेभुवनेश्वर चा परिसरात 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 मुंबई मधी मोठी दुर्घटना झाली आहे भुवनेश्वर चा परिसरात 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏1
- पुणे पुलिस में तैनात 2 महिला पुलिस कॉन्स्टेबल आपस में एक दूसरे से विवाह करना चाहती है!1
- Wada | OBC आरक्षण बचाव आंदोलन | jayesh shelar | speech | खासदार यांच्या निवासस्थानी days 61
- वर्सोवा-बांद्रा सी लिंकला 1,421 दिवसांची मुदतवाढ; दंड कुठे? - अनिल गलगली मुंबईतील महत्त्वाकांक्षी वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा (VBSLP) प्रकल्पाच्या कामाला मोठा विलंब झाल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. प्रकल्पाची नियुक्ती दिनांक 24 जून 2019 असून, मूळ करारानुसार प्रकल्पाची निर्धारित पूर्णता तारीख 21 जून 2024 होती. मात्र, विविध कारणांमुळे प्रकल्पाला चार टप्प्यांत एकूण तब्बल 1,421 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, प्रकल्पाची अंतिम सुधारित पूर्णता तारीख आता 17 मे 2028 करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गंभीर विलंबासाठी Webuild-Apco JV या कंत्राटदारावर कोणताही दंड आकारण्यात आला नाही. MSRDC ने अनिल गलगली यांच्या माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी पहिली मुदतवाढ 23 जून 2020 रोजी 250 दिवसांची देण्यात आली. कास्टिंग यार्डसाठी आवश्यक जमीन उपलब्ध न झाल्याचे त्यामागील प्रमुख कारण होते. त्यानंतर 14 सप्टेंबर 2020 रोजी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या निर्बंध व कामातील व्यत्ययाचा हवाला देत आणखी 180 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. पुढे 10 फेब्रुवारी 2022 रोजी EPC कंत्राटदाराच्या Joint Venture (JV) व्यवस्थेतील पुनर्रचना किंवा बदलामुळे 483 दिवसांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली. त्यानंतर 19 जानेवारी 2024 रोजी कामाच्या व्याप्तीत बदल (Change of Scope) तसेच अतिरिक्त कामांमुळे आणखी 508 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. या चारही मुदतवाढींची एकत्रित बेरीज 1,421 दिवस इतकी असून अंतिम सुधारित पूर्णता तारीख 17 मे 2028 निश्चित करण्यात आली आहे. MSRDC च्या 23 जून 2020 रोजीच्या पत्रानुसार, कंत्राटदाराने 24 जून 2019 ते 30 एप्रिल 2020 या कालावधीसाठी सुमारे 311 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. या कालावधीतील विलंबाच्या कारणांमध्ये विविध घटनांसह कोविड-19 महामारीचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर प्रकल्पाच्या कामासाठी सुधारित टप्पे आणि मुदती निश्चित करण्यात आल्या. तसेच 19 जानेवारी 2024 रोजीच्या MSRDC पत्रात कामाच्या व्याप्तीतील बदल आणि सुधारित कामाच्या टप्प्यांनुसार पुढील मुदतवाढीचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रकल्पाला वारंवार मुदतवाढ मिळत असताना कामातील विलंबासाठी Webuild-Apco JV या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे का, हा गंभीर प्रश्न असल्याचे अनिल गलगली यांनी म्हटले आहे. सार्वजनिक पैशातून उभारल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाला विलंब होत असल्याने त्याचा आर्थिक भार अखेरीस शासनाच्या तिजोरीवर आणि पर्यायाने जनतेवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे Webuild-Apco JV या कंत्राटदाराला केवळ मुदतवाढ देऊन मोकळे न सोडता करारातील दंडाच्या तरतुदींची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. “वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा प्रकल्पाला तब्बल 1,421 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रकल्पाची मूळ पूर्णता मुदत 21 जून 2024 असताना अंतिम मुदत 17 मे 2028 पर्यंत नेण्यात आली आहे. प्रकल्पाच्या विलंबामुळे जनतेचा पैसा आणि वेळ दोन्ही खर्ची पडत आहेत. त्यामुळे केवळ कारणे सांगून प्रकरण संपविण्याऐवजी कामातील विलंबासाठी जबाबदार Webuild-Apco JV या कंत्राटदारावर करारातील तरतुदीनुसार तातडीने नुकसानभरपाईचा दंड आकारण्यात यावा आणि तो वसूल करण्यात यावा,” अशी मागणी अनिल गलगली यांनी केली. गलगली यांनी पुढे म्हटले की, “मुदतवाढ म्हणजे Webuild-Apco JV या कंत्राटदाराला कामात विलंब करण्याची मुभा नव्हे. विलंबाची काही कारणे ग्राह्य धरली असली, तरी करारातील जबाबदाऱ्या आणि दंडाच्या तरतुदींची अंमलबजावणी झालीच पाहिजे. 24 जून 2019 रोजी नियुक्ती दिनांक असलेल्या या प्रकल्पाची अंतिम मुदत 17 मे 2028 पर्यंत नेण्यात येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रत्येक मुदतवाढीमागील कारण, विलंबासाठी जबाबदार पक्ष, झालेला अतिरिक्त आर्थिक भार तसेच Liquidated Damages लागू होतात किंवा नाहीत, याची स्पष्ट माहिती MSRDC ने जनतेसमोर ठेवावी.” वर्सोवा-बांद्रा सागरी दुवा हा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, कामातील विलंबामुळे प्रकल्पाचा कालावधी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विलंबाची कारणे आणि जबाबदारी निश्चित करून, Webuild-Apco JV या कंत्राटदाराच्या जबाबदारीतील विलंबासाठी करारानुसार दंड आकारावा व त्याची वसुली करावी. तसेच प्रकल्पाच्या वाढलेल्या कालावधीमुळे शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.1
- सापडलेली सोन्याची चैन केली परत! संजय जाधव यांच्या प्रामाणिकपणाला सलाम | Mumbai Airport छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल-2 येथे काम करताना संजय जाधव यांना सोन्याची चैन सापडली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ती चैन विमानतळ प्रशासनाकडे सुपूर्द केली. त्यांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि तत्परतेचा गौरव करत भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मियाल व्यवस्थापनाचे CEO श्री. विष्णू झा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रामाणिकपणाला सलाम! 🇮🇳1