श्रेया डमाळे हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान कोपरगाव प्रतिनिधी ( राजेंद्र तासकर ) :- नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात कोपरगाव येथील श्री शारदा इंग्लिश मीडियम शाळेची विद्यार्थिनी श्रेया आदिनाथ डमाळे हिने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही तिने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून आपल्या गुणवत्तेची छाप पाडली होती. श्रेया हिने कोणत्याही शिकवणी वर्गाचे मार्गदर्शन न घेता केवळ स्वयंअध्ययन, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. तिच्या जिद्दीचे, आत्मविश्वासाचे आणि अभ्यासूपणाचे हे यशस्वी फलित मानले जात आहे. श्रेया ही निकमार विद्यापीठ, पुणे येथे परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले डॉ. आदिनाथ डमाळे आणि जिल्हा परिषद शिक्षिका सौ. वैशाली लोहे यांची कन्या आहे. शैक्षणिक वातावरण आणि स्वतःच्या कष्टांच्या बळावर तिने हे यश प्राप्त केले आहे. श्रेयाच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. एल. वाकचौरे, उपमुख्याध्यापिका श्रीमती अमृतकर, वर्गशिक्षक श्री. रणजीत खळे, श्री. महेश मोरे तसेच नगर येथील डॉ. दादासाहेब करंजुले यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्वयंअध्ययन, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या श्रेया डमाळे हिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून तिच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

- येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय येवला: येथील प्रसिद्ध श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात भौम प्रदोषानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी श्री भौमनाथ महादेवाची विशेष महापूजा आणि आकर्षक भस्मारती पार पडली. भौम प्रदोषानिमित्त श्री भौमनाथ महादेवांचा मनमोहक शृंगार करण्यात आला होता. भौमनाथ महादेव हे मंगळ देवाचे स्वामी आणि अत्यंत आवडते रूप मानले जातात. महाआरतीनंतर आयोजित करण्यात आलेल्या भजन संध्येने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय झाला होता. या सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. दरम्यान, पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंदिर व्यवस्थापनातर्फे विशेष आवाहन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात प्रदोषानिमित्त ज्या भाविकांना मंदिरात महाप्रसादाची (पंगत) सेवा द्यायची असेल, त्यांनी लवकरात लवकर मंदिर समितीशी संपर्क साधावा. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..1
- आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,1
- NASHIK : नाशिकमधील अंबड भागातील फडोळ मळा परिसरात सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद. NASHIK : नाशिकमधील अंबड भागातील फडोळ मळा परिसरात सोसायटीच्या पार्किंगमधून वाहने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. घटना सीसीटीव्ही कॅमेरे कैद.1
- शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य1
- पुस्तकांचा तुटवडा निफाड तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तकांच्या १,५२७ संचांची कमतरता; तातडीने पुस्तके द्या, अन्यथा शिक्षण विभागाला टाळे ठोकू : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके पूर्णपणे उपलब्ध झालेली नाहीत. तालुक्यात तब्बल १,५२७ संचांचा तुटवडा असून, पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा तुटवडा तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत; अन्यथा शिक्षण विभागाच्या दालनास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी दिला. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक पुस्तकांची मागणी नोंदवून ती जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर वितरित करण्याची व्यवस्था असते. मात्र, यंदा शाळा सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अनेक विद्यार्थ्यांच्या हातात अद्याप पुस्तके पोहोचलेली नाहीत. निफाड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दुसरी, चौथी, पाचवी, सहावी व सातवीच्या पुस्तकांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. विशेषतः दुसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने जुन्या पाठ्यपुस्तकांचा वापर करणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. काही शाळांमध्ये शिक्षकांनी जुनी पुस्तके जमा करून तात्पुरती व्यवस्था केली असली तरी नवीन पुस्तके उपलब्ध नसल्याने अध्यापनात अडथळे येत आहेत. या प्रश्नाबाबत प्रकाश पाटील यांनी निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप व सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे जाब विचारला. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे चर्चेतून समोर आल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी लासलगाव शिवसेना शहरप्रमुख प्रमोद पाटील, लासलगाव शहर विकास समितीचे राजेंद्र कराड, संदीप उगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वर्गनिहाय तुटवडा इयत्ता २ री — ७ संच इयत्ता ४ थी — २७ संच इयत्ता ५ वी — ७६८ संच इयत्ता ६ वी — ६१४ संच इयत्ता ७ वी — १११ संच एकूण — १,५२७ संच “विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारी मोफत पुस्तके वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पुस्तकांचा तुटवडा तातडीने दूर करून सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण संच उपलब्ध करून द्यावेत.” — प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य1
- दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .1
- येवला येथील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसंदर्भात अध्यक्ष सचिन कळमकर आणि उपाध्यक्ष मोहन शेलार यांची पत्रकारपरिषद येवला येथील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर व उपाध्यक्ष मोहन शेलार यांनी पत्रकार परिषदेत पाणीपट्टी वाढीची घोषणा केली. जिल्हा परिषदेकडून मिळणारे ५०% वीजबिल प्रोत्साहन अनुदान बंद झाल्याने आणि वीज बिल व देखभाल खर्चात प्रचंड वाढ झाल्याने योजनेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून ग्रामपंचायतींसाठी पाणीपट्टीत ३०% तर व्यावसायिक ग्राहकांसाठी २०% वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरानुसार ग्रामपंचायतींना प्रतिलाख लिटरसाठी १६२५ रुपये मोजावे लागतील.1