बोथली येथे साथ फाउंडेशनतर्फे गेडाम परिवाराला सांत्वनपर भेट व आर्थिक मदत बोथली येथे साथ फाउंडेशनतर्फे गेडाम परिवाराला सांत्वनपर भेट व आर्थिक मदत मौजा. बोथली, ता. सावली एक मदतीची हाक, साथ फाउंडेशनची साथ..! बोथली येथील युवक *स्व. सोनबा गेडाम* यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या आजाराने दुर्दैवी निधन झाले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कर्त्या व्यक्तीच्या अकाली जाण्याने संपूर्ण गेडाम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच, साथ फाउंडेशनने तत्काळ पुढाकार घेत गेडाम कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना सांत्वनपर धीर दिला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा साथ फाउंडेशनचे अध्यक्ष, भाजपा युवा नेते *मा. श्री. रोहितभाऊ बोम्मावार* यांच्या मार्गदर्शनाखाली, फाउंडेशनच्या वतीने कुटुंबाला आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. या प्रसंगी साथ फाउंडेशनचे संचालक श्री. ईश्वरजी बट्टे, श्री. प्रकाशजी वरगंटीवार, श्री. भोगेश्वर मोहुर्ले, श्री.मोरेश्वरजी गेडाम, सखुबाई मोटघरे, श्री. प्रकाशजी शेंडे, श्री. ताराचंदजी खोब्रागडे, श्री. निलेशजी पुटकमवार, श्री. प्रफुलजी निरुड़वार, श्री. प्रतीकजी वाकडे, श्री. दया बट्टे, श्री. दीपक शेंडे, गौरव नक्षीणे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच गेडाम परिवारातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून दुःखात सहभागी झाले. साथ फाउंडेशनच्या या संवेदनशील उपक्रमामुळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, समाजातील अशा कार्यांमुळे मानवतेचा धागा अधिक बळकट होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

- 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.1
- Post by कु सुषमा डबराल1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- बकरी करते मिरचीची दंडीकट ! भिवापूर । उमरेड सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.1
- मुजफ्फरपुर जिले के अहियापुर थाना क्षेत्र स्थित जीरो माइल-दादर रोड पर डिलीवरी कंपनी फ्लिपकार्ट के कार्यालय में रविवार देर रात भी/षण चोरी की वार/दात सामने आई है #viralreels #viralvideos #BreakingNews #BiharPolice #bihar #Muzaffarpur1
- Post by RAJA news1
- नागपूरच्या जिल्हा परिषद समोर रज्जु परिपगार आपल्या कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार महाराष्ट्रातील 48 कर्मचारी सात महिन्यापासून मानधनापासून वंचित नागपुर न्यूज़ मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला पण अधिकारी वर्ग ऐैकत नाही ! असा आरोप सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत लावला -रज्जु परिपगार महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागात, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील योजना ही 2017 पासून सुरू झाली. परंतु 6 सप्टेंबर 2024 मध्ये शासन निर्णय जीआर निघाला की, महिला बाल विकास विभाग योजनेत हस्तांतरण करण्यात आले. 1 एप्रिल 2025 पासून योजना अंमलात आली. 2017 मध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत मनुष्यबळ मंजूर झालेले होते. परंतु दुसऱ्या टप्प्यानुसार 2023 मध्ये मनुष्यबळ राहणार नाही असे सुद्धा नमूद केले होते. राज्य शासनाने गेल्या 7 महिन्यापासून पगारापासून वंचित ठेवले आहे म्हणून आरोग्य विभागाचे उदासीन धोरणामुळे मा.उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, येथे दाद मागितली. माननीय उच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2025 च्या कोर्ट आदेशानुसार समायोजन करावे. आणि 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार महिला व बाल कल्याण विभागातील कर्मचारी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू ऐकून अधिकारी वर्गांना आदेश दिला व सांगितले. परंतु अधिकारी ऐकत नसल्याचा आरोप रज्जु परिपगार यांनी पत्र परिषदेत लावला. जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब आम्हा सर्वांना 7 महिन्याचा पगार देणार नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषण करणार ! असे पत्रकारांना सांगितले. मा. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी आरोग्य सचिव समावेश समायोजन करावेत असे निर्देश दिले होते. त्यानंतर हैद्राबाद हाऊस सचिवालयात आशा पठाण यांना पत्र दिले. केंद्रीय केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, संदीप जोशी या सर्वांना यासंदर्भात माहिती दिली होती. परंतु आम्हाला न्यायासाठी पत्रकार परिषदेत धाव घ्यावी लागली. कारण आम्ही आमच्या कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करू, कसे जगू, यासाठी हक्काचा पगार आम्हाला मिळावा व कार्यादेश देण्यात यावा. त्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनवणी करीत आहे की, आमचा सात महिन्याचा पगार देण्यात यावा व कार्यादेश द्यावा असे सांगितले. आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीटुचे अध्यक्ष राजेंद्र साठे आणि कॉस्ट्राईबचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे, रज्जू परिपगार, पौर्णिमा गजभिये, संगीता वासेवार, निता दांडेकर, निलेश अडुळकर, कैलास खांडेकर आणि प्रिती मेश्राम यांची उपस्थिती होती.1
- नागपुरात पहिला हिंदी साय-फाय चित्रपट 'नर मशीना'चा 'एलियन रिव्हील' व्हिडिओ प्रदर्शित नागपूर: माँ एलएफएक्स स्टुडिओजची निर्मिती1