'गौरव गाथा शिवरायांची' कार्यक्रमातून मांडला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ! लातूर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने दयानंद सभागृह येथे सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘गौरव गाथा शिवरायांची’ या कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग रंगमंचावर साकारण्यात आले. त्यापूर्वी सादर झालेल्या ‘आम्ही जिजाऊच्या लेकी’ या कार्यक्रमात शाहिरी पोवाडे आणि स्फूर्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, सायली ठाकूर, तहसीलदार संतोष बनकर, जिल्हा परिषद सदस्य प्रतिक्षाताई गुट्टे, उत्तमराव माने, अश्विन नगराळे, प्रफुल्ल गुंडरे, साईताई गोरे, तुळसाबाई लोंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी ‘आम्ही जिजाऊच्या लेकी’ हा कार्यक्रम सादर झाला. यात सहभागी कलाकारांनी राजमाता जिजाऊ, महाराणी सईबाई, महाराणी ताराबाई ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासावर आधारित गीतांचे सादरीकरण केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणातील राजमाता जिजाऊंनी दिलेले संस्कार, स्वाभिमान आणि शौर्याची शिकवण याबाबत माहिती दिली. ‘गौरव गाथा शिवरायांची’ या मुख्य कार्यक्रमात कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून स्वराज्य स्थापनेपर्यंतच्या आणि इतर महत्त्वपूर्ण प्रसंगांचे रंगमंचीय सादरीकरण केले. प्रसंगानुरूप सादर केलेली स्फूर्तीगीते लक्षवेधी ठरली. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची गौरवगाथा, पराक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
'गौरव गाथा शिवरायांची' कार्यक्रमातून मांडला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ! लातूर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि लातूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने दयानंद सभागृह येथे सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘गौरव गाथा शिवरायांची’ या कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या
जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग रंगमंचावर साकारण्यात आले. त्यापूर्वी सादर झालेल्या ‘आम्ही जिजाऊच्या लेकी’ या कार्यक्रमात शाहिरी पोवाडे आणि स्फूर्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, सायली ठाकूर, तहसीलदार संतोष बनकर, जिल्हा परिषद सदस्य प्रतिक्षाताई गुट्टे, उत्तमराव माने, अश्विन नगराळे,
प्रफुल्ल गुंडरे, साईताई गोरे, तुळसाबाई लोंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी ‘आम्ही जिजाऊच्या लेकी’ हा कार्यक्रम सादर झाला. यात सहभागी कलाकारांनी राजमाता जिजाऊ, महाराणी सईबाई, महाराणी ताराबाई ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासावर आधारित गीतांचे सादरीकरण केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणातील राजमाता जिजाऊंनी दिलेले संस्कार, स्वाभिमान आणि
शौर्याची शिकवण याबाबत माहिती दिली. ‘गौरव गाथा शिवरायांची’ या मुख्य कार्यक्रमात कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून स्वराज्य स्थापनेपर्यंतच्या आणि इतर महत्त्वपूर्ण प्रसंगांचे रंगमंचीय सादरीकरण केले. प्रसंगानुरूप सादर केलेली स्फूर्तीगीते लक्षवेधी ठरली. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची गौरवगाथा, पराक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
- राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न लातूर (एल पी उगीले) लातूर येथील महानगरपालिका शाळा क्र. ११, राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. कार्यक्रमास महापौर जयश्री सोनकांबळे, नगरसेवक तबरेज तांबोळी, नगरसेविका ज्योती अवासकर, पत्रकार बशीर शेख, शिक्षण अधिकारी, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका व विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महापौर जयश्री सोनकांबळे यांनी आपल्या भाषणात शिक्षणासोबत संस्कार आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.1
- दयानंद सभागृह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित कार्यक्रम शिवजन्म उत्सव ..1
- Post by EKMAT DIGITAL1
- लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित उत्तम सोनकांबळे, वय वर्षे २७, रा. शेळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. ते लातूर शहरातील संभाजी नगर, खाडगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आई-वडिलांपासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. युवकाने आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.1
- लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली1
- मुखेड तालुक्यातील जाहूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जाहूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य कुस्त्यांच्या हंगाव्याचे आयोजन करण्यात आले होते दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते ११,००० रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंजीतजी घाटे गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर गोणगोपले देविदास पाटील बोडके मारोती पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रु पाटील बोडके यांची उपस्थिती होती7
- 🔥 सिरपल्ली येथे शेतकऱ्याच्या घराला आग; सहा शेळीपिल्लांचा मृत्यू हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे दुपारी सुमारे १.३० वाजता शेतकरी किसन आबाजी जाधव यांच्या घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या भीषण घटनेत सहा शेळीपिल्लांचा होरपळून मृत्यू झाला असून घरातील साहित्य व टिनपत्रा जळून खाक झाले. आधीच खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीने त्रस्त असलेल्या शेतकरी कुटुंबावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 🙏 #सिरपल्ली #हिमायतनगर #शेतकरीसंकट #आगघटना #ग्रामीणवार्ता #शासनमदत #FarmerDistress #मदतीचीगरज #NNLDigitalMedia1
- खून प्रकरणातील चारही आरोपीची धिंड काढून आरोपींना घटनास्थळाकडे नेण्यात आले. लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्यात हातरून टाकणारी विद्यार्थ्यांतील हाणामारी आणि किरकोळ कारणावरून झालेल्या खून खटल्यातील चारही विद्यार्थी असलेल्या आरोपींना पोलिसांनी लवकरच अटक करून त्यांची धिंड काढून घटनास्थळावर घेऊन गेले. या परिसरात या परिसरात दादागिरी करण्याच्या उद्देशाने किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हाणामारी केली असेल तर ती त्यांची दहशत मोडीत काढली जावी. तसेच अशा पद्धतीने जर कोणी कायदा हातात घेतला तर पोलीस प्रशासन त्याची खैर करत नाही हा मेसेज समाजामध्ये जावा या उद्देशाने त्या आरोपींची धिंड काढली गेली आहे. असे आता लोक बोलू लागले आहेत.1