क्रांतीसूर्य महात्मा फुले पुरस्काराने रवींद्र महाजन यांचा गौरव... द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र गौरव सन्मान 2026 सोहळ्यात सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा समाजभूषण पुरस्कर्ते रवींद्र प्रभाबाई पितांबर महाजन यांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सावता महाराज यांचे 19 वे वंशज तथा हरिभक्त पारायण सावता महाराज वसेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समाजकार्यातील उल्लेखनीय योगदान आणि समाजप्रबोधनाच्या कार्याची दखल घेऊन महाजन यांना हा सन्मान देण्यात आला. या कार्यक्रमास पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रणिती भालके, पंढरपूर येथील पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, मा. अन्सार शेख, अनिता शिंदे, वनरक्षक अधिकारी अशोक ढाकणे, प्रणव परिचारक, संतोष लांडे, शकील मणियार, रूपाली सावंत, बाळासाहेब पाटोळे, मंगला सासवडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रवींद्र महाजन यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.

- धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 61 हजार 474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1
- दिंडोरीत भीषण अपघात: उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह 🗞️ सविस्तर बातमी: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे शिवाजीनगर (इंदोरे भाग) परिसरात शुक्रवारी रात्री (३ एप्रिल २०२६) सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. सुनील दरगोडे यांच्या कुटुंबातील एकूण ९ जण कारने (MH15 JS 1053) स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळली. रात्रीचा अंधार आणि विहिरीभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने चालकाला विहीर दिसली नाही आणि हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ६ लहान शालेय मुले, २ महिला आणि १ चालक अशा सर्व ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवले. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताला “अधिकाऱ्यांची मोठी चूक” ठरवत संताप व्यक्त केला. “रस्त्याच्या मध्यभागी विहीर कशी असू शकते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी अपघाताला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आणि रस्ता सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रशासनाने विहिरीभोवती तातडीने बॅरिकेडिंग केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षेबाबत आणि उघड्या विहिरींसारख्या धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Shaha News Marathi1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- अशोक खरातांना वाचवणारे सत्तेत बसलेत, हर्षवर्धन सपकाळांचा सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा1
- अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलीस यांनी अटक केल्याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून मोहोळ येथील एका तरुणीला आरोपीने बळजबरीने बलात्कार करून तिला गरोदर करून पाहून गेला होता सदरील आरोपीला आज रोजी अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- साक्री तालुक्यातील तामसवाडी परिसरात वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.1