Shuru
Apke Nagar Ki App…
कुडाळमधील 'आपला बाजार' हा मॉल अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच सील करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या मॉलवर मोठी धाड टाकली, ज्यामुळे 'आपला बाजार' तुकाराम मुंढे यांच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे.
Gaurishankar Dhikar
कुडाळमधील 'आपला बाजार' हा मॉल अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच सील करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या मॉलवर मोठी धाड टाकली, ज्यामुळे 'आपला बाजार' तुकाराम मुंढे यांच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे.
More news from Buldhana and nearby areas
- आज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर, 'हेचि व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास...' या संतवचनांचा जयघोष करत, टाळ-मृदंगांच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या डोलणाऱ्या सागरात, 'जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल'च्या अखंड गजरात संतनगरी शेगावातून श्री संत गजानन महाराजांची पवित्र पालखी पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावाने मार्गस्थ झाली. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, वारकऱ्यांच्या उत्साहाने शेगाव नगरीत आध्यात्मिक ऊर्जा संचारली आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेला हा पालखी सोहळा यंदा ५७ वे वर्ष साजरा करत आहे. यामध्ये तब्बल ७०० हून अधिक वारकरी, टाळकरी, पताकाधारी आणि अश्वदल सहभागी झाले आहेत. 'गण गण गणात बोते', 'जय गजानन श्री गजानन' आणि 'जय हरी विठ्ठल'च्या अखंड नामघोषात भक्तांची पावले पंढरीच्या दिशेने पडू लागली आहेत. श्रींची पालखी पुढील ३३ दिवसांत ५७० किलोमीटरचे अंतर पायी पार करत २३ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूरमध्ये २३ ते २८ जुलै या कालावधीत श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा मुक्काम राहणार असून, हजारो भाविकांना श्रींच्या दर्शनाचा लाभ मिळेल. पंढरपूरातील मुक्कामानंतर २९ जुलैपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. पंढरपूर ते शेगाव हा ५५० किलोमीटरचा मार्ग पायी पार करत, येण्या-जाण्याचा एकूण १३०० किलोमीटरचा पायी प्रवास वारकरी पूर्ण करणार आहेत. आधुनिक युगातही एवढ्या मोठ्या प्रमाणात भक्तांनी पायी वारी करणे ही संत परंपरेची आणि श्रद्धेची अद्वितीय ताकद असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे. शेगावातून प्रस्थान केल्यानंतर आज दुपारी पालखी श्री क्षेत्र नागझरी येथील श्री संत गोमाजी महाराज संस्थानात पोहोचणार आहे. तेथे महाप्रसादानंतर सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे पालखीचा पहिला रात्रीचा मुक्काम असेल. यानंतर २२ जून रोजी दुपारी गायगाव तर रात्री भौरद येथे मुक्काम होणार आहे. पुढे २३ व २४ जून रोजी अकोला येथे दोन दिवसांचा मुक्काम राहणार असून, निश्चित मार्गाने पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करणार आहे. संतांच्या शिकवणुकीवर चालणारी ही वारी केवळ धार्मिक सोहळा नसून, सामाजिक एकात्मता, समता, सेवा आणि अध्यात्माचे विद्यापीठ मानली जाते. जाती-पाती, श्रीमंत-गरीब यांचे भेद विसरून हजारो वारकरी एकाच नामस्मरणात दंग होतात. त्यामुळेच संतनगरीतून निघालेली ही पालखी आजही लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू ठरत आहे. 'चंद्रभागे स्नान, तुका मागे हेचि दान' या संतवचनांचा ध्यास घेऊन श्रींची पालखी आता विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेने भक्तिभावाने मार्गक्रमण करत आहे. गण गण गणात बोते.1
- आज श्री संत गजानन महाराजांची पवित्र पालखी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाली आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि "गण गण गणात बोते" च्या अखंड निनादात गजानन माऊलींची पालखी पंढरीच्या वाटेने मार्गस्थ झाली. या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने गजानन महाराजांना निरोप दिला. "गण गण गणात बोते", "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "पांडुरंग हरी" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी पालखीला वाटी लावून माऊलींचे दर्शन घेतले आणि पंढरीच्या वारीसाठी शुभेच्छा दिल्या. हा पालखी सोहळा श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचे जिवंत प्रतीक असून, तो समाजातील ऐक्य, समर्पण आणि अध्यात्मिक भावनेचे दर्शन घडवतो. हजारो वारकरी आणि भक्त विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाची आस मनात बाळगून या पवित्र वारीत सहभागी झाले आहेत. "गण गण गणात बोते, पंढरीनाथ महाराज की जय!" आणि "ज्ञानोबा-तुकाराम, गजानन माऊलींचा विजय असो!" अशा जयघोषांनी वातावरण भारले होते. सर्व वारकरी भक्तांना पंढरीच्या वारीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून, विठ्ठल-रखुमाई आणि गजानन माऊलींची कृपा सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना करण्यात आली.4
- अकोला जिल्ह्यातील अंदुरा जवळील पानखास पुलाजवळ रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे गेलेले हे तरुण अकोटच्या दिशेने परत येत असताना हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, रस्त्यावरील मोठ्या भेगांमुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला, ज्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपघातातील मृत तरुणांची नावे श्रीकांत पुरुषोत्तम बायस्कार (वय २५) आणि कुणाल राजू भोरे (वय २४, दोन्ही रा. गजानन महाराज नगर, अकोट) अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत आणि कुणाल हे दोघे एम.एच. ३० बी.ई. ७९७० क्रमांकाच्या दुचाकीने अकोट येथे परत येत असताना अंदुरा गावाजवळ त्यांची दुचाकी समोरून निंबा फाट्याकडे जाणाऱ्या चांदूर बाजार आगाराच्या एम.एच. १४ एम.टी. ०२५३ क्रमांकाच्या एसटी बसशी आदळली. ही बस चांदूर बाजार येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. या घटनेची माहिती मिळताच उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन खंडेराव आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळेच या दोन्ही निष्पाप तरुणांचा बळी गेल्याचा आरोप करत मृतकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोट येथे नेण्यात आले. उरळ पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.1
- डॉ. झीशान हुसैन यांनी म्हटले आहे की, हिंदू-मुस्लिम एकजुटीमुळे काँग्रेसने भाजपला पराभूत केले आहे.1
- अकोल्यात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रशासनाच्या भव्य उपक्रमात विविध क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, अधिकारी आणि अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या हजारोंच्या सहभागातून योगाचा महत्त्वपूर्ण संदेश सर्वत्र पोहोचवण्यात आला.1
- जळगाव पोलिसांनी मुक्ताईनगर तालुक्यातील लाल गोटा, चारठाणा आणि मधापुरी या गावांमध्ये धाड टाकली आहे.1
- २० जून रोजी सायंकाळी ५:५१ च्या सुमारास, अकोट शहर पोलीस स्टेशनला डायल ११२ वर अनिल परशराम जावरकर (वय २९, रा. धारणी, जि. अमरावती) यांनी फोन करून त्यांची पत्नी शर्मिला जावरकर (वय २५) आणि २ वर्षांची मुलगी पायल बस स्टँड परिसरातून हरवल्याची माहिती दिली. अनिल जावरकर यांनी पोलिसांना सांगितले की, ते त्यांची पत्नी व मुलीसह शेगाव येथून धारणीला जाण्यासाठी अकोटला आले होते. त्यांनी पत्नी आणि मुलीला बस स्टँडबाहेर थांबवून खाऊ घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. थोड्याच वेळात परत आल्यावर त्यांना पत्नी व मुलगी बस स्टँडबाहेर दिसल्या नाहीत. या कॉलची तात्काळ दखल घेत, डायल ११२ वरील ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार सपोउपनि हिंमत दंदी आणि पोकॉ स्वप्निल आढे यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे आणि डायल ११२ चे इन्चार्ज पोउपनि अविनाश मोहीते यांना दिली. त्यानंतर हे अधिकारी अनिल जावरकर यांना भेटून त्यांच्यासोबत अकोट शहरातील बस स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन, सिंधी कॅम्प आणि हिवरखेड रोड परिसरात सुमारे एक तास सतत शोध घेत होते. या शोध मोहिमेदरम्यान, अनिल जावरकर यांची पत्नी सौ. शर्मिला जावरकर आणि मुलगी पायल या रेल्वे स्टेशन परिसरात सुखरूप आढळून आल्या. त्यांना सुरक्षितपणे अनिल जावरकर यांच्या ताब्यात देऊन पोलीस स्टेशनमधून रवाना करण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि मा. सहा. पोलीस अधीक्षक अकोट निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर जुनघरे, पोउपनि अविनाश मोहीते, सपोउपनि हिंमत दंदी व पोकॉ स्वप्निल आढे यांनी केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन हरवलेल्या पत्नी आणि मुलीचा शोध घेऊन त्यांना पतीच्या ताब्यात दिले.2
- अकोला जिल्ह्यातील अकोट-शेगाव रस्त्यावर रविवारी अंदुरा गावाजवळ एका भीषण रस्ते अपघातात अकोट शहरातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण आपल्या मोटारसायकलवरून शेगावहून अकोटला जात असताना अंदुरा गावाजवळ त्यांच्या मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने त्यांची मोटारसायकल शेगावकडे जाणाऱ्या समोरून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) बसला धडकली. या धडकेचा परिणाम इतका भीषण होता की, दोन्ही तरुण बसच्या पुढच्या भागाखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेमुळे अकोट शहरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिक अत्यंत दुःखी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच, उरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. सध्या उरळ पोलीस या अपघाताच्या नेमक्या कारणाचा सखोल तपास करत आहेत.4