आज श्री संत गजानन महाराजांची पवित्र पालखी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाली आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि "गण गण गणात बोते" च्या अखंड निनादात गजानन माऊलींची पालखी पंढरीच्या वाटेने मार्गस्थ झाली. या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने गजानन महाराजांना निरोप दिला. "गण गण गणात बोते", "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "पांडुरंग हरी" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी पालखीला वाटी लावून माऊलींचे दर्शन घेतले आणि पंढरीच्या वारीसाठी शुभेच्छा दिल्या. हा पालखी सोहळा श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचे जिवंत प्रतीक असून, तो समाजातील ऐक्य, समर्पण आणि अध्यात्मिक भावनेचे दर्शन घडवतो. हजारो वारकरी आणि भक्त विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाची आस मनात बाळगून या पवित्र वारीत सहभागी झाले आहेत. "गण गण गणात बोते, पंढरीनाथ महाराज की जय!" आणि "ज्ञानोबा-तुकाराम, गजानन माऊलींचा विजय असो!" अशा जयघोषांनी वातावरण भारले होते. सर्व वारकरी भक्तांना पंढरीच्या वारीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून, विठ्ठल-रखुमाई आणि गजानन माऊलींची कृपा सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना करण्यात आली.
आज श्री संत गजानन महाराजांची पवित्र पालखी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाली आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि "गण गण गणात बोते" च्या अखंड निनादात गजानन माऊलींची पालखी पंढरीच्या वाटेने मार्गस्थ झाली. या पालखी प्रस्थान
सोहळ्यावेळी हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने गजानन महाराजांना निरोप दिला. "गण गण गणात बोते", "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "पांडुरंग हरी" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी पालखीला वाटी लावून माऊलींचे दर्शन घेतले आणि पंढरीच्या वारीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा पालखी सोहळा श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचे जिवंत प्रतीक असून, तो समाजातील ऐक्य, समर्पण आणि अध्यात्मिक भावनेचे दर्शन घडवतो. हजारो वारकरी आणि भक्त विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाची आस मनात बाळगून या पवित्र वारीत सहभागी झाले आहेत. "गण गण गणात बोते,
पंढरीनाथ महाराज की जय!" आणि "ज्ञानोबा-तुकाराम, गजानन माऊलींचा विजय असो!" अशा जयघोषांनी वातावरण भारले होते. सर्व वारकरी भक्तांना पंढरीच्या वारीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून, विठ्ठल-रखुमाई आणि गजानन माऊलींची कृपा सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना करण्यात आली.
- आज श्री संत गजानन महाराजांची पवित्र पालखी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाली आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि "गण गण गणात बोते" च्या अखंड निनादात गजानन माऊलींची पालखी पंढरीच्या वाटेने मार्गस्थ झाली. या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने गजानन महाराजांना निरोप दिला. "गण गण गणात बोते", "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "पांडुरंग हरी" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी पालखीला वाटी लावून माऊलींचे दर्शन घेतले आणि पंढरीच्या वारीसाठी शुभेच्छा दिल्या. हा पालखी सोहळा श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचे जिवंत प्रतीक असून, तो समाजातील ऐक्य, समर्पण आणि अध्यात्मिक भावनेचे दर्शन घडवतो. हजारो वारकरी आणि भक्त विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाची आस मनात बाळगून या पवित्र वारीत सहभागी झाले आहेत. "गण गण गणात बोते, पंढरीनाथ महाराज की जय!" आणि "ज्ञानोबा-तुकाराम, गजानन माऊलींचा विजय असो!" अशा जयघोषांनी वातावरण भारले होते. सर्व वारकरी भक्तांना पंढरीच्या वारीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून, विठ्ठल-रखुमाई आणि गजानन माऊलींची कृपा सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना करण्यात आली.4
- शेगाव तालुक्यात, आठ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर शासनाने ग्रामीण भागातील रेशन कार्डधारकांसाठी तब्बल १२ हजार लिटर रॉकेलचा पुरवठा केला. मात्र, काळाच्या ओघात बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि आधुनिक इंधन पर्यायांच्या वाढत्या वापरामुळे या निर्णयाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामस्थांनी रॉकेलकडे पाठ फिरवल्याने हा संपूर्ण उपक्रमच चर्चेचा विषय ठरला आहे. १५ जून रोजी तालुक्यातील ग्रामीण भागातील रेशन कार्डधारकांसाठी रेशन दुकानदारांमार्फत प्रति कार्ड ३ लिटर या प्रमाणात रॉकेल वितरणाची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, प्रतिलिटर ६५ रुपये दर असूनही, तसेच ग्रामीण भागात रॉकेल स्टोव्हचा वापर जवळजवळ बंद झाल्यामुळे नागरिकांनी रॉकेल घेण्यासाठी कोणताही विशेष उत्साह दाखवला नाही. एकेकाळी स्वयंपाक, दिवे आणि दैनंदिन वापरासाठी रॉकेल अत्यावश्यक मानले जात होते व रेशन दुकानांसमोर रांगा लागत होत्या; मात्र आता उज्ज्वला योजनेसह एलपीजी गॅसचा वाढता वापर, सौरऊर्जा साधने आणि वीज उपलब्धतेतील सुधारणा यामुळे रॉकेलचे महत्त्व संपुष्टात आले आहे. या परिस्थितीत, अनेक ग्रामीण नागरिकांनी रॉकेल घेण्यासाठी रेशन दुकानांकडे फिरकलेच नसल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाने केलेला हा पुरवठा प्रत्यक्ष गरजेनुसार होता की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या वस्तूची मागणीच उरलेली नाही, तिच्या पुरवठ्यावर खर्च होणारा निधी आणि यंत्रणा याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील सध्याचे वास्तव लक्षात घेता, आता रॉकेलऐवजी इतर आवश्यक वस्तू किंवा योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. बदलत्या गरजांनुसार धोरणांमध्ये सुधारणा न झाल्यास अशा योजना केवळ कागदोपत्री राहण्याचा धोका असल्याचे जाणकारांचे मत आहे. पूर्वी ज्या रॉकेलसाठी नागरिक प्रतीक्षा करत होते, त्याच रॉकेलकडे आज ग्रामस्थांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत असल्याने, शासनाचा हा पुरवठा ग्रामीण गरजांची पूर्तता करणारा ठरला की केवळ औपचारिकता, यावर आता चर्चा रंगू लागली आहे.1
- बुलढाणा जिल्ह्यातील चोंडी गावात असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचे समोर आले आहे.1
- महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील एका हनुमान मंदिराच्या हॉलचे छत अचानक कोसळले. या दुर्घटनेवेळी मंदिर परिसरात अनेक भाविक उपस्थित होते, ज्यामुळे अनेक जण जखमी झाले. जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ आणि अफरा-तफरीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.1
- अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या.1
- महाराष्ट्रातील पातुर येथे आयोजित काँग्रेसच्या जाहीर सभेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेसाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमला होता, ज्यामुळे सभेला जनसागर उसळल्याचे चित्र होते.1
- २० जून रोजी सायंकाळी ५:५१ च्या सुमारास, अकोट शहर पोलीस स्टेशनला डायल ११२ वर अनिल परशराम जावरकर (वय २९, रा. धारणी, जि. अमरावती) यांनी फोन करून त्यांची पत्नी शर्मिला जावरकर (वय २५) आणि २ वर्षांची मुलगी पायल बस स्टँड परिसरातून हरवल्याची माहिती दिली. अनिल जावरकर यांनी पोलिसांना सांगितले की, ते त्यांची पत्नी व मुलीसह शेगाव येथून धारणीला जाण्यासाठी अकोटला आले होते. त्यांनी पत्नी आणि मुलीला बस स्टँडबाहेर थांबवून खाऊ घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. थोड्याच वेळात परत आल्यावर त्यांना पत्नी व मुलगी बस स्टँडबाहेर दिसल्या नाहीत. या कॉलची तात्काळ दखल घेत, डायल ११२ वरील ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार सपोउपनि हिंमत दंदी आणि पोकॉ स्वप्निल आढे यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे आणि डायल ११२ चे इन्चार्ज पोउपनि अविनाश मोहीते यांना दिली. त्यानंतर हे अधिकारी अनिल जावरकर यांना भेटून त्यांच्यासोबत अकोट शहरातील बस स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन, सिंधी कॅम्प आणि हिवरखेड रोड परिसरात सुमारे एक तास सतत शोध घेत होते. या शोध मोहिमेदरम्यान, अनिल जावरकर यांची पत्नी सौ. शर्मिला जावरकर आणि मुलगी पायल या रेल्वे स्टेशन परिसरात सुखरूप आढळून आल्या. त्यांना सुरक्षितपणे अनिल जावरकर यांच्या ताब्यात देऊन पोलीस स्टेशनमधून रवाना करण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि मा. सहा. पोलीस अधीक्षक अकोट निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर जुनघरे, पोउपनि अविनाश मोहीते, सपोउपनि हिंमत दंदी व पोकॉ स्वप्निल आढे यांनी केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन हरवलेल्या पत्नी आणि मुलीचा शोध घेऊन त्यांना पतीच्या ताब्यात दिले.2
- पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली NEET परीक्षा उद्या, म्हणजेच २१ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये या परीक्षेसाठी १७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक केंद्रावर कडक तपासणी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान तैनात ठेवण्यासारख्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.1