कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्ट्री एक लाख रुपये मदत देण्याची मागणी कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्ट्री एक लाख रुपये मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी सुकलेली सोयाबीन व मका तहसीलदारांना दिली भेट, पंचनामे होत नसल्याने शेतकरी आक्रमक, ठिय्या आंदोलनाने वेधले लक्ष भोकरदन : भोकरदन तालुक्यात यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण असून पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झाली आहे. अनेक भागांमध्ये पिकांची वाढ खुंटली असून पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.मात्र प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी भोकरदन तहसील कार्यालयात सुकलेली मका व सोयाबीन तहसीलदारांना भेट देऊन पंचनामे करीत नसल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. पावसाअभावी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातील परिस्थितीची तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच भोकरदन तालुक्यातील सद्यस्थितीची तातडीने प्रत्यक्ष पाहणी व पंचनामे करून भोकरदन तालुका कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा, तसेच दुष्काळी उपाययोजना लागू करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून द्यावी अशी मागणी तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्याकडे केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव,बळीराजा फाऊंडेशन नारायण लोखंडे, आप्पासाहेब जाधव, समाधान मोरे, सुनिल सिरसाट, भानुदास जाधव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख मागण्या : 1. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्ट्री एक लाख रूपये मदत जाहीर करा. भोकरदन तालुक्यातील सर्व गावांमध्ये पिकांची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत. 2. पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन भोकरदन तालुका कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा. 3. पात्र शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान व पीक नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी. 4. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती देऊन आवश्यक आर्थिक सवलती देण्यात याव्यात. 5. वीजबिल व इतर शासकीय देयकांबाबत दुष्काळी सवलती लागू करण्यात याव्यात. 6. जनावरांसाठी चारा व पाण्याची आवश्यक व्यवस्था करण्यात यावी. 7. पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. 8. तालुक्यातील पावसाची व पिकांची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून शासनाकडे तातडीने अहवाल सादर करण्यात यावा. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांना निवेदन देतांना नारायण लोखंडे, विकास जाधव, आप्पासाहेब जाधव, सुनिल सिरसाट आदी शेतकरी

- जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे यंदाच्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून, जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन करण्यात आले. गणरायाच्या आगमनावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच गावातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशमूर्तीचे आगमन झाल्यानंतर मंडळाच्या वतीने विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण नप्ते, तर उपाध्यक्षपदी संदीप आप्पा काळे यांची जबाबदारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सदस्य गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहेत. गणेशोत्सव काळात दररोज सकाळी व सायंकाळी आरतीचे आयोजन करण्यात येते. आरतीच्या वेळी गावातील मोठ्या संख्येने भाविक भक्त तसेच गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित राहून भक्तिभावाने गणरायाची आरती करतात. आरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिकांचीही मोठी गर्दी होत असून, संपूर्ण उत्सव काळात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने सावळदबारा परिसर भक्तिमय झाला आहे. मंडळाच्या उपक्रमांना गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शांतता व सलोखा राखत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.1
- बोरगाव सारवणीत राज्यमंत्री दर्जा प्राप्त मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांचा भव्य नागरी सत्कार | AQS NEWS इनामूल उलूम उर्दू हायस्कूलच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन; मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांची उपस्थिती | AQS NEWS1
- माजी मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड शहरात तरुणांच्या रोजगारासाठी पैठणी उद्योग सुरू करणार कापसे पैठणी कंपनीला भेट सिल्लोड सोयगाव मतदार संघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी येवला येथील कापसे पैठणी उद्योग येथे भेट देत पैठणी उद्योगाची माहिती घेतली1
- चाँद के पास चमक रहा था एक बेहद तेज़ रोशनी वाला “तारा” लेकिन असली राज़ जानकर आप भी हैरान रह जाएंगे...1
- भोकरदन शहरात शहीद स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी मांडला ठराव माजी सैनिकांच्या मागणीला मिळाला न्याय भोकरदन इसरारखान पठाण भोकरदन नगर परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत तालुक्यातील शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. माजी सैनिकांच्या मागणीला मान देऊन भोकरदन शहरात ‘शहीद स्मारक’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. हा महत्त्वपूर्ण ठराव नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी सभागृहात मांडला. सभेदरम्यान हातात ठरावाची प्रत घेऊन उभे राहत रणवीर सिंग देशमुख यांनी भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या देशाकरता जे जवान शहीद होतात... त्या शहिदांकरता आपल्या तालुक्यात कुठंही स्मारक नाही. नगरपालिकेच्या ठिकाणी पैसा आहे, तर तो आपल्या काळात आपण सर्वांनी हात वर करून हा ठराव मंजूर करावा. रणवीरसिंग देशमुख यांनी मांडलेल्या या ठरावाला उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवकांनी तत्काळ पाठिंबा दर्शवला. नगराध्यक्षा सौ. समरीन नाज बेग वसीम मिर्झा आणि उपनगराध्यक्षा सौ. सुरेखाताई जाधव यांनी ठरावाला संमती देत हा निर्णय एकमताने पारित केला. या ठरावाचे अनुमोदक म्हणून कदीर बापू यांचे नाव जाहीर करण्यात आले. ठराव मंजूर झाल्यानंतर बोलताना नगरसेवक रणवीर सिंग देशमुख म्हणाले, आज भोकरदन नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या विनंतीला मान देऊन भोकरदन शहरात शहीद स्मारक व्हावे याकरिता या सभेत जागा मागणीचा ठराव मांडला. उपस्थित सर्व सदस्य, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा यांनी सर्व संमतीने ठराव मंजूर केला. अनुमोदक म्हणून कदीर बापू सह सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. सभेच्या व्हिडिओमध्ये दिसते की, नगरसेवक रणवीर सिंग देशमुख कागदपत्र हातात घेऊन ठरावाचे वाचन करत आहेत. सभागृहात नगरसेवक पांढऱ्या वेशात बसलेले असून, अधिकारी वर्ग समोर टेबलवर उपस्थित आहे. ठराव मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी हात वर करून एकमताने संमती दर्शवली हा ठराव मंजूर झाल्याने आता नगर परिषद प्रशासनाकडून शहीद स्मारकासाठी योग्य जागेची निवड, आराखडा व निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भोकरदन तालुक्यातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जतन करण्यासाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास माजी सैनिक संघटना व नागरिकांनी व्यक्त केला आहे. तालुक्यात आतापर्यंत शहीद जवानांसाठी स्वतंत्र स्मारक नसल्याची खंत अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी उचललेल्या या पावलामुळे शहीद कुटुंबीयांच्या भावनांचा सन्मान झाला असून, येणाऱ्या पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळणार आहे. स्मारकाच्या कामास लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती नगर परिषद सूत्रांनी दिली.1
- मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे यांची प्रतिक्रिया मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे. यांची प्रतिक्रिया1
- श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन... श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन...1
- कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त*....... * कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त* -------------------------- -:बदनापूर पोलिसांची कारवाई बदनापूर शहरातील SBI बँकेतून दिनांक 04/09/2026 रोजी फिर्यादी - नामे विष्णु कुंडलीकराव कोल्हे रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना यांनी 10 लाख रुपये काढून आपल्या कारमध्ये घेऊन जात असताना त्यावर चोरट्यांनी पाळत ठेवून फिर्यादीच्या कारचा पाठलाग करून धोपटेश्वर शिवरातील धोपटेश्वर ते देवगाव रोडवर आपली कार उभी करून शेतात जाऊन परत आले असता कारच्या मागील दरवाजाचे काच तुटलेले दिसले असता गाडीतील रक्कम दिसेनाशी झाली. त्यानंतर फिर्यादी विष्णु कुंडलीकराव कोल्हे वय 49 वर्ष रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना हे पोलिस स्टेशन बदनापूर येथे येऊन रिपोर्ट दिल्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एम. टी. सुरवसे, पोलिस निरीक्षक बदनापूर यांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन २ टीम तयार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये CCTV फुटेज चेक केले तसेच तांत्रिक तपास केला असता एक मोटार सायकल वर दोन चोरट्यांनी कारचा पाठलाग करून कारची काच फोडून पैसे चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे 1) गुंजी चालराजु जबराज 2) गुड्डेटी विनोत प्रभुदास दोन्ही रा. कपरला टिपा. ता. बिटरगुंटा जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, या आरोपीस अटक करणे कामी तपास पथक यांना आंध्र प्रदेश येथे रवाना करून आरोपी चा शोध घेतला असता मिळून आला नाही, परंतु त्याच्या राहत्या घरातून चोरीस गेलेले 6 लाख रुपये जप्त करण्यास तपास पथक यांना यश प्राप्त झाले आहे. बाकी आरोपी व उर्वरीत रक्कम यांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले आहेत. सदरची कारवाई मा. श्री. तेघबिर सिंह संधु साहेब, पोलीस अधीक्षक जालना, मा. विक्रम साळी साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब जालना, मा. अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, जालना यांचे मार्गदर्शनाखाली १) एम. टी. सुरवसे, पोलिस स्टेशन पोलीस ठाणे बदनापूर, २) पोउपनि एस. आर.कुकलारे, ३) पोहेकॉ/671 ए.एस.दासर, ४) पोको/227 भडंगे, ५) पोको/342 पी. के. गोलवाल, ६) पोको/1699 एस. जे. तडवी यांनी केली आहे.1