उमरी तालुक्यात ‘सहकार बचाव पॅनल’ची निवडणुकीत रंगत; विरोधकांना दिले आव्हान! नांदेड उमरी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “सहकार बचाव पॅनल”च्या उमेदवारांनी विविध भागांत जोरदार प्रचार सुरू केला असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकृत पत्रकाद्वारे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक रविवार, दि. 29 मार्च 2026 रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत होणार असून मतदान केंद्र जिल्हा परिषद कन्या शाळा, उमरी येथे निश्चित करण्यात आले आहे. सहकार बचाव पॅनलकडून मारतराव कवळे गुरुजी यांनी सर्व मतदारांना “सिलाई मशीन” या निवडणूक चिन्हासमोर मतदान करून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हे पॅनल तालुक्यातील सहकारी संस्थांना बळकटी देऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उमरी तालुक्यात ‘सहकार बचाव पॅनल’ची निवडणुकीत रंगत; विरोधकांना दिले आव्हान! नांदेड उमरी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “सहकार बचाव पॅनल”च्या उमेदवारांनी विविध भागांत जोरदार प्रचार सुरू केला असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकृत पत्रकाद्वारे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक रविवार, दि. 29 मार्च 2026 रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत होणार असून मतदान केंद्र जिल्हा परिषद कन्या शाळा, उमरी येथे निश्चित करण्यात आले आहे. सहकार बचाव पॅनलकडून मारतराव कवळे गुरुजी यांनी सर्व मतदारांना “सिलाई मशीन” या निवडणूक चिन्हासमोर मतदान करून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हे पॅनल तालुक्यातील सहकारी संस्थांना बळकटी देऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- 🚩 नांदेडमध्ये शिवकालीन वैभव अवतरणार: 'सुवर्ण होन' आणि पुरातन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन! नांदेड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणारे 'शिवकालीन सुवर्ण होन' आणि ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन नांदेडमध्ये आयोजित करण्यात आले आहे. 'नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार' आणि 'नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था, नांदेड' यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, नांदेडकरांसाठी ही एक दुर्मिळ पर्वणी ठरणार आहे. 🔍 प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे: शिवकालीन सुवर्ण होन: श्री अशोक सिंह ठाकूरजी यांनी संग्रहित केलेला, शिवरायंच्या राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला सोन्याचा 'होन' पाहण्याची संधी पहिल्यांदाच नांदेडमध्ये उपलब्ध झाली आहे. प्राचीन नाणी: निलंगा (लातूर) येथील 'श्री चक्रधर संग्रहालय' यांच्या संग्रहातील इ.स. पूर्व ६०० वर्षांपासूनची दुर्मिळ नाणी प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. ऐतिहासिक शस्त्रास्त्रे: 'शहाजीराजे भोसले ऐतिहासिक वस्तू संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट' यांच्याकडील शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन यावेळी करण्यात येईल. 📍 प्रदर्शनाचा तपशील: दिनांक: शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ ते रविवार, ५ एप्रिल २०२६. वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत. स्थळ: नंदगिरी किल्ला, होळी परिसर, नावघाट, नांदेड. विशेष टीप: छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी सोन्याचे 'होन' चलनात आणले होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अशा दुर्मिळ ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडणार आहे. नांदेडमधील इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.4
- Post by Today One Live1
- महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार1
- बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळीत येथे आज दिनांक ४ एप्रिल रोजी संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपीठ झाली आहे.1
- Post by वैजनाथ पावडे1
- हिमायतनगरात शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन तात्पुरते स्थगित छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर सुरू असलेले आंदोलन सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलकांनी 21 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. तसेच 22 तारखेला संपूर्ण ‘गाव बंद’ ठेवण्याची हाकही देण्यात आली आहे. ⚠️ प्रशासनासमोर मोठे आव्हान ⚠️ नागरिकांचे लक्ष पुढील निर्णयाकडे 👉 पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे... जय शिवराय! 🚩 #Himayatnagar #ShivajiMaharaj #Andolan #GavBandh #BreakingNews Maharashtra Maratha Shivray NewsUpdate SocialMedia1
- उदगीर शहरातील गांधी नगर व मुसा नगर परिसरात ४ एप्रिलच्या रात्री अचानक तुफान दगडफेक, दोन गटात राडा !! जवळपास 50 लोकांवर गुन्हा दाखल!! पोलिसाच्या जीपचेही मोठे नुकसान!! उदगीर (एल पी उगीले) उदगीर शहरातील गांधीनगर व मुसा नगर परिसरातील दोन गटांमध्ये अचानक वाद उसळल्याने तुफान दगडफेक झाली. याप्रकरणी उसळलेल्या दंगलीला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली खरी मात्र चिडलेल्या जमावाने चक्क पोलीस गाडीवर प्रचंड दगडफेक करून पोलिसाच्या जीपचे मोठे नुकसान केले. याप्रकरणी पोलिस अंमलदार सतीश भानुदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 99 /26 कलम 132, 121 (1), 125 (A), 189 (2), 191 (2)(3), 190, 324 (3) भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगाने तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 व सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी आजम असलम जहागीरदार, आसिफ शेख लातूरकर, शार्दुल रशीद शेख, आशा उर्फ असलम शेख, रोशन ताजुद्दीन शेख (बिलाल), मोहित जागीरदार, जाकीर जागीरदार, बाबर शेख, आरिफ शेख, एजाज फारुख शेख, मोहेल लाला शेख, साहिल लाला शेख, मोईन हैदरसाब शेख, जुबेर मुसा शेख, इब्राहिम मुसा शेख, फिरोज ताहेर शेख, मोहसीन मकदुल मौलासाब शेख, मोहेल शेख, बबलू उर्फ मोहम्मद रफी, सोहेल लाईक लदाफ, वजीर मोईदिन शेख, दस्तगीर मोईदिन शेख, रईस बासू पटेल, सईद मुस्ताक जागीरदार, रोहित मुस्ताम जागीरदार, आदिल नजीर शेख, मोनू कालिया, मुज्जू कडबेवाल, गौस हकानी शेख, अयाज इस्माईल शेख उर्फ वाळूवाला, साहिल चांद पाशा मणियार, सय्यद बलीम अली, सय्यद अलीम इस्माईल, शेख इरफान इम्तियाज, किशोर ईश्वर मोतीराम, दिनेश धीरज कांबळे, सुमित कांबळे, या 37 व्यक्ती शिवाय इतर आठ ते दहा जण असा उल्लेख तक्रारीत करण्यात आलेला आहे. पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की दिनांक चार एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मौलाना आझाद शाळेजवळ मुसा नगरी येथे आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून तसेच जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून तसेच शासकीय जीपवर दगडफेक करून फिर्यादी जखमी करून सोबतचे सहकारी यांना शासकीय काम करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलीस जीपचे अंदाजे 15000 रुपयांचे नुकसान केले आहे वगैरे प्रमाणे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील उदगीर शहर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करत आहेत. प्रथमदर्शनी किरकोळ कारणांवरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडफेकीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडांचा खच आढळून आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.4
- परभणी महापालिका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ गोबाडे यांची निवड1