logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अशोकनगर येथे संत लहानुजी महाराज जयंतीनिमित्त पालखीचे भक्तिमय आगमन

4 hrs ago
user_Amravati News Update
Amravati News Update
Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
4 hrs ago

अशोकनगर येथे संत लहानुजी महाराज जयंतीनिमित्त पालखीचे भक्तिमय आगमन

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by JKV NEWS 24
    1
    Post by JKV NEWS 24
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात १६ फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री घडलेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून १८ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) यांना अटक करण्यात आली होती. पोलीस  तपासादरम्यान  या प्रकरणात  रजि अहमद खान युसूफ खान रा. दारव्हा याचे नावही समोर आले. त्याच्या सांगण्यावरून कावेरी नगर येथील सप्तशृंगी अक्वा या दुकानाच्या मालकाला ठार करण्याच्या उद्देशाने वरील दोन्ही आरोपी तेथे गेले असता, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या गौरव टारपे याच्यासोबत वाद झाला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील तिसरा मास्टर माईंड असलेला आरोपी रजि अहमद खान युसूफ खान याचा नेमका सप्तशृंगी एक्वा च्या मालकाशी काही दुश्मनी होती की, कोणाकडून सुपारी घेण्यात आली होती या बाजूनेही पोलीस तपास करीत आहेत.
    1
    दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात १६ फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री घडलेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून १८ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) यांना अटक करण्यात आली होती. पोलीस  तपासादरम्यान  या प्रकरणात  रजि अहमद खान युसूफ खान रा. दारव्हा याचे नावही समोर आले. त्याच्या सांगण्यावरून कावेरी नगर येथील सप्तशृंगी अक्वा या दुकानाच्या मालकाला ठार करण्याच्या उद्देशाने वरील दोन्ही आरोपी तेथे गेले असता, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या गौरव टारपे याच्यासोबत वाद झाला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील तिसरा मास्टर माईंड असलेला आरोपी रजि अहमद खान युसूफ खान याचा नेमका सप्तशृंगी एक्वा च्या मालकाशी काही दुश्मनी होती की, कोणाकडून सुपारी घेण्यात आली होती या बाजूनेही पोलीस तपास करीत आहेत.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील बसस्थानकामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतक व्यक्ती हा गणेशपुर कारेगावचा रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन समोर आलं.घटनेचा पुढील तपास हा पोलीसांनी सुरु केला आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील बसस्थानकामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतक व्यक्ती हा गणेशपुर कारेगावचा रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन समोर आलं.घटनेचा पुढील तपास हा पोलीसांनी सुरु केला आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    4 hrs ago
  • Post by Gopal. salame
    1
    Post by Gopal. salame
    user_Gopal. salame
    Gopal. salame
    Farmer नरखेड, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज | शेतकरी अफू प्रकरणात पोलिसांची धाडसत्र, रविकांत तुपकर आक्रमक शेतकरी अफू लागवड प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची खात्री प्रशासनाने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कारवाई पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पोलिसांकडून संशयित ठिकाणी छापे टाकून तपास वेगाने सुरू आहे. काही कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईमुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    ब्रेकिंग न्यूज | शेतकरी अफू प्रकरणात पोलिसांची धाडसत्र, रविकांत तुपकर आक्रमक
शेतकरी अफू लागवड प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची खात्री प्रशासनाने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कारवाई पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पोलिसांकडून संशयित ठिकाणी छापे टाकून तपास वेगाने सुरू आहे. काही कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
या कारवाईमुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    30 min ago
  • रिसोड: चिमुकल्यांनी मिरवणुकी द्वारे शिवछत्रपतींना मानवंदना दिली .............................................. ज्ञानेशप्रसाद ब्युरो चिफ वाशिम जिल्हा वाशिम: रिसोड येथील चिमुकल्यांनी दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी अकरा वाजता शिवछत्रपतींचे जन्मोत्सव सोहळ्याच्या अनुषंगाने शहरातील पालखी मार्गाने अतिशय उत्साहात डोक्यावर खुर्ची घेऊन त्या खुर्चीमध्ये शिवछत्रपतींची प्रतिमा अतिशय दिमाखात स्थापन करून हार अर्पण अगरबत्तीच्या सुगंध दरवळत संपूर्ण शहरातून शिवछत्रपतींना मानवंदना वाहत वाहत जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा शिवप्रभूंच्या जय घोषाने आकाश दुमदुमून गेले होते. बालकांचा उत्साह पाहून घरातील महिला मंडळी गणपती मिरवणुकीप्रमाणे या बालकांनी काढलेले ही शिवजन्मोत्सव मिरवणूक पाहून आश्चर्यचकित होऊन डोक्यावर खुर्चीत विराजमान असलेल्या शिवछत्रपतींचे दर्शन घेतल्याशिवाय राहवले नाही. व त्याच्या एक तासानंतर मित्र परिवारातील दुसऱ्या गटाने चार चाकी गाडीवर श्री शिवछत्रपतींचा पुतळा विराजमान करून ढोल ताशांच्या गजरांमध्ये भगवा झेंडा फडकवत पुन्हा एक शिवछत्र प्रभुंची मिरवणूक काढली अशा रीतीने या शाळकरी मुलांनी शिवछत्रपती प्रति आपली सद्भावना व्यक्त करून हिंदवी स्वराज्य निर्माता छत्रपतींना मानवंदना वाहिली व आपली त्यांच्याप्रती असलेली भक्ती भाव प्रकट केला तदनंतर, शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे या चिमुकल्यांनी या मिरवणुकीची सांगता केली.
    1
    रिसोड: चिमुकल्यांनी मिरवणुकी द्वारे शिवछत्रपतींना मानवंदना दिली
..............................................
ज्ञानेशप्रसाद ब्युरो चिफ वाशिम जिल्हा 
वाशिम: रिसोड येथील चिमुकल्यांनी दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी अकरा वाजता शिवछत्रपतींचे जन्मोत्सव सोहळ्याच्या अनुषंगाने शहरातील पालखी मार्गाने अतिशय उत्साहात डोक्यावर खुर्ची घेऊन त्या खुर्चीमध्ये शिवछत्रपतींची प्रतिमा अतिशय दिमाखात स्थापन करून हार अर्पण अगरबत्तीच्या सुगंध दरवळत संपूर्ण शहरातून शिवछत्रपतींना मानवंदना वाहत वाहत जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा शिवप्रभूंच्या जय घोषाने आकाश दुमदुमून गेले होते. बालकांचा उत्साह पाहून घरातील महिला मंडळी गणपती मिरवणुकीप्रमाणे या बालकांनी काढलेले ही शिवजन्मोत्सव मिरवणूक पाहून आश्चर्यचकित होऊन डोक्यावर खुर्चीत विराजमान असलेल्या शिवछत्रपतींचे दर्शन घेतल्याशिवाय राहवले नाही. व त्याच्या एक तासानंतर मित्र परिवारातील दुसऱ्या गटाने चार चाकी गाडीवर श्री शिवछत्रपतींचा पुतळा विराजमान करून ढोल ताशांच्या गजरांमध्ये भगवा झेंडा फडकवत पुन्हा एक शिवछत्र प्रभुंची मिरवणूक काढली अशा रीतीने या शाळकरी मुलांनी शिवछत्रपती प्रति आपली सद्भावना व्यक्त करून हिंदवी स्वराज्य निर्माता छत्रपतींना मानवंदना वाहिली व आपली त्यांच्याप्रती असलेली भक्ती भाव प्रकट केला तदनंतर, शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे या चिमुकल्यांनी या मिरवणुकीची सांगता केली.
    user_Dnyaneshprasad
    Dnyaneshprasad
    वाशिम, वाशिम, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • यवतमाळच्या मेटीखेडा जवळ दोन दुचाकीमध्ये समोरासमोर धडक बसुन भीषण अपघात झाला. या अपघातात वाकी येथील रहिवासी जीवन जाधव याचा मृत्यु झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची पुढील तपास हा वडगांव जंगल पोलीसांनी सुरु केला आहे.
    1
    यवतमाळच्या मेटीखेडा जवळ दोन दुचाकीमध्ये समोरासमोर धडक बसुन भीषण अपघात झाला. या अपघातात वाकी येथील रहिवासी जीवन जाधव याचा मृत्यु झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची पुढील तपास हा वडगांव जंगल पोलीसांनी सुरु केला आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    5 hrs ago
  • Post by Gopal. salame
    1
    Post by Gopal. salame
    user_Gopal. salame
    Gopal. salame
    Farmer नरखेड, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • संविधानाची मशाल विद्यार्थ्यांच्या हाती; न्या. एम. एस. जावळकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन शेगांव / बुलढाणा : लोकशाही मूल्यांची जाण आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या राज्यव्यापी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन आयोजित विशेष सत्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अतिरिक्त न्यायाधीश न्या. एम. एस. जावळकर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा गाभा उलगडून दाखवला. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना संविधानाचे सखोल ज्ञान देणे, लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे आणि सामाजिक न्यायाबाबत संवेदनशील बनविणे हा आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला असून विशेषतः विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय ठरला. आपल्या मार्गदर्शनात न्या. जावळकर यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी दिलेल्या थेट आणि स्पष्ट उत्तरांनी सत्र अधिक संवादात्मक व प्रेरणादायी झाले. या उपक्रमांतर्गत तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रशिक्षण दिले जात आहे. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरचे डॉ. कैलास वसावे, डॉ. दिविता कोठेकर, डॉ. आरती तायडे, डॉ. व्ही. पी. तिवारी तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबईचे डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे आणि डॉ. अमोल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या विशेष सत्रात न्या. आर. सी. चव्हाण, न्या. पृथ्वीराज चव्हाण, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि माजी आयुक्त समाजकल्याण इ. झेड. खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत संविधानिक मूल्यांचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाल अ. थुल यांनी केले. राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयीची जागरूकता वाढविणाऱ्या या उपक्रमामुळे ‘जाणता नागरिक – सशक्त लोकशाही’ या संकल्पनेला नवे बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
    3
    संविधानाची मशाल विद्यार्थ्यांच्या हाती; न्या. एम. एस. जावळकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
शेगांव / बुलढाणा : लोकशाही मूल्यांची जाण आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या राज्यव्यापी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन आयोजित विशेष सत्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अतिरिक्त न्यायाधीश न्या. एम. एस. जावळकर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा गाभा उलगडून दाखवला.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना संविधानाचे सखोल ज्ञान देणे, लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे आणि सामाजिक न्यायाबाबत संवेदनशील बनविणे हा आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला असून विशेषतः विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय ठरला.
आपल्या मार्गदर्शनात न्या. जावळकर यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी दिलेल्या थेट आणि स्पष्ट उत्तरांनी सत्र अधिक संवादात्मक व प्रेरणादायी झाले.
या उपक्रमांतर्गत तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रशिक्षण दिले जात आहे. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरचे डॉ. कैलास वसावे, डॉ. दिविता कोठेकर, डॉ. आरती तायडे, डॉ. व्ही. पी. तिवारी तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबईचे डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे आणि डॉ. अमोल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
या विशेष सत्रात न्या. आर. सी. चव्हाण, न्या. पृथ्वीराज चव्हाण, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि माजी आयुक्त समाजकल्याण इ. झेड. खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत संविधानिक मूल्यांचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाल अ. थुल यांनी केले.
राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयीची जागरूकता वाढविणाऱ्या या उपक्रमामुळे ‘जाणता नागरिक – सशक्त लोकशाही’ या संकल्पनेला नवे बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.