logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

संविधानाची मशाल विद्यार्थ्यांच्या हाती; न्या. एम. एस. जावळकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन संविधानाची मशाल विद्यार्थ्यांच्या हाती; न्या. एम. एस. जावळकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन शेगांव / बुलढाणा : लोकशाही मूल्यांची जाण आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या राज्यव्यापी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन आयोजित विशेष सत्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अतिरिक्त न्यायाधीश न्या. एम. एस. जावळकर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा गाभा उलगडून दाखवला. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना संविधानाचे सखोल ज्ञान देणे, लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे आणि सामाजिक न्यायाबाबत संवेदनशील बनविणे हा आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला असून विशेषतः विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय ठरला. आपल्या मार्गदर्शनात न्या. जावळकर यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी दिलेल्या थेट आणि स्पष्ट उत्तरांनी सत्र अधिक संवादात्मक व प्रेरणादायी झाले. या उपक्रमांतर्गत तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रशिक्षण दिले जात आहे. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरचे डॉ. कैलास वसावे, डॉ. दिविता कोठेकर, डॉ. आरती तायडे, डॉ. व्ही. पी. तिवारी तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबईचे डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे आणि डॉ. अमोल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या विशेष सत्रात न्या. आर. सी. चव्हाण, न्या. पृथ्वीराज चव्हाण, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि माजी आयुक्त समाजकल्याण इ. झेड. खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत संविधानिक मूल्यांचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाल अ. थुल यांनी केले. राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयीची जागरूकता वाढविणाऱ्या या उपक्रमामुळे ‘जाणता नागरिक – सशक्त लोकशाही’ या संकल्पनेला नवे बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

5 hrs ago
user_Sachin kadukar
Sachin kadukar
Photographer Shegaon, Buldhana•
5 hrs ago
ea259ea7-4964-446f-8aa0-926fe3b66cf3

संविधानाची मशाल विद्यार्थ्यांच्या हाती; न्या. एम. एस. जावळकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन संविधानाची मशाल विद्यार्थ्यांच्या हाती; न्या. एम. एस. जावळकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन शेगांव / बुलढाणा : लोकशाही मूल्यांची जाण आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या राज्यव्यापी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन आयोजित विशेष सत्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अतिरिक्त न्यायाधीश न्या. एम. एस. जावळकर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा गाभा उलगडून दाखवला. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना संविधानाचे सखोल

d111a737-c319-4b39-b3fd-a71a53e4f6f6

ज्ञान देणे, लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे आणि सामाजिक न्यायाबाबत संवेदनशील बनविणे हा आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला असून विशेषतः विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय ठरला. आपल्या मार्गदर्शनात न्या. जावळकर यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी दिलेल्या थेट आणि स्पष्ट उत्तरांनी सत्र अधिक संवादात्मक व प्रेरणादायी झाले. या उपक्रमांतर्गत तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रशिक्षण दिले जात आहे. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरचे डॉ. कैलास वसावे, डॉ.

दिविता कोठेकर, डॉ. आरती तायडे, डॉ. व्ही. पी. तिवारी तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबईचे डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे आणि डॉ. अमोल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या विशेष सत्रात न्या. आर. सी. चव्हाण, न्या. पृथ्वीराज चव्हाण, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि माजी आयुक्त समाजकल्याण इ. झेड. खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत संविधानिक मूल्यांचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाल अ. थुल यांनी केले. राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयीची जागरूकता वाढविणाऱ्या या उपक्रमामुळे ‘जाणता नागरिक – सशक्त लोकशाही’ या संकल्पनेला नवे बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ब्रेकिंग न्यूज | शेतकरी अफू प्रकरणात पोलिसांची धाडसत्र, रविकांत तुपकर आक्रमक शेतकरी अफू लागवड प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची खात्री प्रशासनाने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कारवाई पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पोलिसांकडून संशयित ठिकाणी छापे टाकून तपास वेगाने सुरू आहे. काही कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईमुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    ब्रेकिंग न्यूज | शेतकरी अफू प्रकरणात पोलिसांची धाडसत्र, रविकांत तुपकर आक्रमक
शेतकरी अफू लागवड प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची खात्री प्रशासनाने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच कारवाई पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पोलिसांकडून संशयित ठिकाणी छापे टाकून तपास वेगाने सुरू आहे. काही कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
या कारवाईमुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • संविधानाची मशाल विद्यार्थ्यांच्या हाती; न्या. एम. एस. जावळकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन शेगांव / बुलढाणा : लोकशाही मूल्यांची जाण आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या राज्यव्यापी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन आयोजित विशेष सत्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अतिरिक्त न्यायाधीश न्या. एम. एस. जावळकर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा गाभा उलगडून दाखवला. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना संविधानाचे सखोल ज्ञान देणे, लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे आणि सामाजिक न्यायाबाबत संवेदनशील बनविणे हा आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला असून विशेषतः विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय ठरला. आपल्या मार्गदर्शनात न्या. जावळकर यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी दिलेल्या थेट आणि स्पष्ट उत्तरांनी सत्र अधिक संवादात्मक व प्रेरणादायी झाले. या उपक्रमांतर्गत तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रशिक्षण दिले जात आहे. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरचे डॉ. कैलास वसावे, डॉ. दिविता कोठेकर, डॉ. आरती तायडे, डॉ. व्ही. पी. तिवारी तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबईचे डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे आणि डॉ. अमोल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या विशेष सत्रात न्या. आर. सी. चव्हाण, न्या. पृथ्वीराज चव्हाण, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि माजी आयुक्त समाजकल्याण इ. झेड. खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत संविधानिक मूल्यांचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाल अ. थुल यांनी केले. राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयीची जागरूकता वाढविणाऱ्या या उपक्रमामुळे ‘जाणता नागरिक – सशक्त लोकशाही’ या संकल्पनेला नवे बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
    3
    संविधानाची मशाल विद्यार्थ्यांच्या हाती; न्या. एम. एस. जावळकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
शेगांव / बुलढाणा : लोकशाही मूल्यांची जाण आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या राज्यव्यापी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन आयोजित विशेष सत्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अतिरिक्त न्यायाधीश न्या. एम. एस. जावळकर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा गाभा उलगडून दाखवला.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना संविधानाचे सखोल ज्ञान देणे, लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे आणि सामाजिक न्यायाबाबत संवेदनशील बनविणे हा आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला असून विशेषतः विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय ठरला.
आपल्या मार्गदर्शनात न्या. जावळकर यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी दिलेल्या थेट आणि स्पष्ट उत्तरांनी सत्र अधिक संवादात्मक व प्रेरणादायी झाले.
या उपक्रमांतर्गत तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रशिक्षण दिले जात आहे. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरचे डॉ. कैलास वसावे, डॉ. दिविता कोठेकर, डॉ. आरती तायडे, डॉ. व्ही. पी. तिवारी तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबईचे डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे आणि डॉ. अमोल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
या विशेष सत्रात न्या. आर. सी. चव्हाण, न्या. पृथ्वीराज चव्हाण, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि माजी आयुक्त समाजकल्याण इ. झेड. खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत संविधानिक मूल्यांचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाल अ. थुल यांनी केले.
राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयीची जागरूकता वाढविणाऱ्या या उपक्रमामुळे ‘जाणता नागरिक – सशक्त लोकशाही’ या संकल्पनेला नवे बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    5 hrs ago
  • ​खामगाव : शहरातील चांदमारी येथील जय भवानी मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एक नवा आणि आदर्श पायंडा पाडला आहे. शिवजयंतीच्या शोभायात्रेत कानठळ्या बसवणाऱ्या डीजेचा वापर न करता, पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढल्याबद्दल खामगावचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा हार घालून विशेष सत्कार केला. ​सध्या सण-उत्सवांमध्ये मोठ्या आवाजाचे डीजे लावण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. मात्र, चांदमारी येथील जय भवानी मंडळाने सामाजिक भान राखत यावर्षी 'डीजे मुक्त' शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा त्रास झाला नाही आणि अत्यंत मंगलमय वातावरणात शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ​मंडळाच्या या सकारात्मक पावलाची दखल घेत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. पोलिसांनी केलेल्या या आगळ्यावेगळ्या सत्काराची चर्चा संपूर्ण खामगाव शहरात होत आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यावर कारवाई करणारे पोलीस, जेव्हा नियमांचे पालन झाल्यावर सत्कार करतात, तेव्हा समाजात एक सकारात्मक संदेश जातो, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
    2
    ​खामगाव : शहरातील चांदमारी येथील जय भवानी मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एक नवा आणि आदर्श पायंडा पाडला आहे. शिवजयंतीच्या शोभायात्रेत कानठळ्या बसवणाऱ्या डीजेचा वापर न करता, पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढल्याबद्दल खामगावचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा हार घालून विशेष सत्कार केला. ​सध्या सण-उत्सवांमध्ये मोठ्या आवाजाचे डीजे लावण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. मात्र, चांदमारी येथील जय भवानी मंडळाने सामाजिक भान राखत यावर्षी 'डीजे मुक्त' शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा त्रास झाला नाही आणि अत्यंत मंगलमय वातावरणात शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ​मंडळाच्या या सकारात्मक पावलाची दखल घेत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. पोलिसांनी केलेल्या या आगळ्यावेगळ्या सत्काराची चर्चा संपूर्ण खामगाव शहरात होत आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यावर कारवाई करणारे पोलीस, जेव्हा नियमांचे पालन झाल्यावर सत्कार करतात, तेव्हा समाजात एक सकारात्मक संदेश जातो, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • 🚨 BREAKING: खामगाव दगडफेक प्रकरणाचे सत्य समोर! 🚨 खामगावातील दगडफेकीची घटना ही कोणत्याही समुदायाशी संबंधित नसून ती वैयक्तिक वादातून घडली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी केले आहे. 📢 #Khamgaon #BreakingNews #PoliceUpdate #KhamgaonCity #Alert #Truth #MaharashtraPolice
    1
    🚨 BREAKING: खामगाव दगडफेक प्रकरणाचे सत्य समोर! 🚨
खामगावातील दगडफेकीची घटना ही कोणत्याही समुदायाशी संबंधित नसून ती वैयक्तिक वादातून घडली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी केले आहे. 📢
#Khamgaon #BreakingNews #PoliceUpdate #KhamgaonCity #Alert #Truth #MaharashtraPolice
    user_DIVYAVARHAD NEWS BULDHANA
    DIVYAVARHAD NEWS BULDHANA
    पत्रकार खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by स्वामींनी
    1
    Post by स्वामींनी
    user_स्वामींनी
    स्वामींनी
    बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Samrat Dhole
    1
    Post by Samrat Dhole
    user_Samrat Dhole
    Samrat Dhole
    बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • बुलडाणा :-महाराष्ट्राचे आराध्य दैवत, 'प्रौढ प्रताप पुरंधर' छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज बुलढाणा शहरात अत्यंत देदीप्यमान आणि ऐतिहासिक उत्साहात साजरी करण्यात आली. 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले असून, सकाळपासूनच शहराच्या कानाकोपऱ्यात भगवे चैतन्य पाहायला मिळाले. प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागाने या सोहळ्याला विशेष भव्यता प्राप्त झाली. शहराचे मुख्य केंद्र असलेल्या संगम चौक येथे शिवजयंतीचा मुख्य सोहळा पार पडला. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या उपस्थितीत महाराजांची भव्य आरती करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात झालेल्या या महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. आमदार गायकवाड यांनी यावेळी शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन करत सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय स्तरावरही या उत्सवाचा मोठा सहभाग दिसून आला. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य दुचाकी रॅलीला (Bike Rally) जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. शेकडो दुचाकीस्वार कर्मचारी भगवे फेटे बांधून या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते. शाळकरी विद्यार्थ्यांचा महाकुंभ आणि 'बाल शिवाजी'चे आकर्षण यावर्षीच्या उत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे शहरातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. हजारो विद्यार्थी आपल्या शालेय गणवेशात आणि पारंपरिक वेशभूषेत रॅलीमध्ये सामील झाले होते. विशेषतः 'बाल शिवाजी'च्या वेषात सज्ज झालेले लहान चिमुरडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. डोक्यावर जिरेटोप, कपाळावर चंद्रकोर आणि हातात ढाल-तलवार घेतलेले हे बाल शिवबा पाहून उपस्थितांना प्रत्यक्ष शिवकाळाची प्रचिती येत होती. केवळ रॅलीच नव्हे, तर शहरात ठिकठिकाणी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चौकाचौकात लावलेले भगवे ध्वज, रांगोळ्या आणि विद्युत रोषणाईमुळे शहराचे रूप पालटून गेले होते. अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आणि शिवचरित्रावर आधारित व्याख्यानांचेही आयोजन केले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर असताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बुलढाणा पोलिसांनी चोख नियोजन केले होते. रॅलीच्या मार्गावर आणि शहराच्या संवेदनशील नाक्यांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
    1
    बुलडाणा :-महाराष्ट्राचे आराध्य दैवत, 'प्रौढ प्रताप पुरंधर' छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज बुलढाणा शहरात अत्यंत देदीप्यमान आणि ऐतिहासिक उत्साहात साजरी करण्यात आली. 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले असून, सकाळपासूनच शहराच्या कानाकोपऱ्यात भगवे चैतन्य पाहायला मिळाले. प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागाने या सोहळ्याला विशेष भव्यता प्राप्त झाली.
शहराचे मुख्य केंद्र असलेल्या संगम चौक येथे शिवजयंतीचा मुख्य सोहळा पार पडला. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या उपस्थितीत महाराजांची भव्य आरती करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात झालेल्या या महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. आमदार गायकवाड यांनी यावेळी शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन करत सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या.
प्रशासकीय स्तरावरही या उत्सवाचा मोठा सहभाग दिसून आला. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य दुचाकी रॅलीला (Bike Rally) जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. शेकडो दुचाकीस्वार कर्मचारी भगवे फेटे बांधून या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते.
शाळकरी विद्यार्थ्यांचा महाकुंभ आणि 'बाल शिवाजी'चे आकर्षण
यावर्षीच्या उत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे शहरातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. हजारो विद्यार्थी आपल्या शालेय गणवेशात आणि पारंपरिक वेशभूषेत रॅलीमध्ये सामील झाले होते. विशेषतः 'बाल शिवाजी'च्या वेषात सज्ज झालेले लहान चिमुरडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. डोक्यावर जिरेटोप, कपाळावर चंद्रकोर आणि हातात ढाल-तलवार घेतलेले हे बाल शिवबा पाहून उपस्थितांना प्रत्यक्ष शिवकाळाची प्रचिती येत होती.
केवळ रॅलीच नव्हे, तर शहरात ठिकठिकाणी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चौकाचौकात लावलेले भगवे ध्वज, रांगोळ्या आणि विद्युत रोषणाईमुळे शहराचे रूप पालटून गेले होते. अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आणि शिवचरित्रावर आधारित व्याख्यानांचेही आयोजन केले होते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर असताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बुलढाणा पोलिसांनी चोख नियोजन केले होते. रॅलीच्या मार्गावर आणि शहराच्या संवेदनशील नाक्यांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
    user_Ajay Rajgure
    Ajay Rajgure
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 min ago
  • *ॲड. जयश्री शेळके यांची पणन मंत्र्यांसह मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी* बुलढाणा: जिल्ह्यात मक्याचे विक्रमी उत्पादन झाले असताना नाफेडकडून केली जाणारी खरेदी मर्यादा अत्यंत तुटपुंजी आहे. उद्दिष्ट संपल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील अनेक मका खरेदी केंद्रे बंद करण्यात आली असून, यामुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, मका खरेदीचे उद्दिष्ट तातडीने वाढवून सर्व केंद्रे पूर्ववत सुरू करावीत, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड.जयश्री शेळके यांनी पणन मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, बुलढाणा जिल्ह्यात २०२५-२६ च्या खरीप हंगामात एकूण ५२,८५५.७ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली आहे. नाफेडच्या निकषानुसार हेक्टरी ३९ क्विंटल उत्पादन गृहीत धरल्यास जिल्ह्यात अंदाजे २०,६१,३७२ क्विंटल मका उत्पादन अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यासाठी प्रत्यक्षात केवळ ६०,००० क्विंटल इतकेच खरेदी उद्दिष्ट देण्यात आले आहे, जे एकूण उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. जिल्ह्यातील सुमारे ५,७०० शेतकऱ्यांनी नाफेडकडे मका खरेदीसाठी रीतसर नोंदणी केलेली असतानाही, 'उद्दिष्ट पूर्ण झाले' असे कारण पुढे करून अनेक खरेदी केंद्रांवरील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. मका खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात माल शिल्लक आहे. याचा गैरफायदा खासगी व्यापारी घेत असून बाजारभाव पाडले जात आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून त्यांच्यामध्ये सरकारविरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे. "एकीकडे शासन हमीभावाच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे प्रत्यक्षात खरेदी बंद करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते, हे अन्यायकारक आहे," अशी भूमिका ॲड. जयश्री शेळके यांनी मांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपेक्षित मका उत्पादनाच्या प्रमाणात नाफेडचे खरेदी उद्दिष्ट तातडीने वाढवून द्यावे, बंद असलेली सर्व खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत आणि नोंदणीकृत प्रत्येक शेतकऱ्याचा मका हमीभावाने खरेदी केला जाईल याची खात्री करावी. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
    1
    *ॲड. जयश्री शेळके यांची पणन मंत्र्यांसह मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी*
बुलढाणा: जिल्ह्यात मक्याचे विक्रमी उत्पादन झाले असताना नाफेडकडून केली जाणारी खरेदी मर्यादा अत्यंत तुटपुंजी आहे. उद्दिष्ट संपल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील अनेक मका खरेदी केंद्रे बंद करण्यात आली असून, यामुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, मका खरेदीचे उद्दिष्ट तातडीने वाढवून सर्व केंद्रे पूर्ववत सुरू करावीत, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड.जयश्री शेळके यांनी पणन मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, बुलढाणा जिल्ह्यात २०२५-२६ च्या खरीप हंगामात एकूण ५२,८५५.७ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली आहे. नाफेडच्या निकषानुसार हेक्टरी ३९ क्विंटल उत्पादन गृहीत धरल्यास जिल्ह्यात अंदाजे २०,६१,३७२ क्विंटल मका उत्पादन अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यासाठी प्रत्यक्षात केवळ ६०,००० क्विंटल इतकेच खरेदी उद्दिष्ट देण्यात आले आहे, जे एकूण उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. जिल्ह्यातील सुमारे ५,७०० शेतकऱ्यांनी नाफेडकडे मका खरेदीसाठी रीतसर नोंदणी केलेली असतानाही, 'उद्दिष्ट पूर्ण झाले' असे कारण पुढे करून अनेक खरेदी केंद्रांवरील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
मका खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात माल शिल्लक आहे. याचा गैरफायदा खासगी व्यापारी घेत असून बाजारभाव पाडले जात आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून त्यांच्यामध्ये सरकारविरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे. "एकीकडे शासन हमीभावाच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे प्रत्यक्षात खरेदी बंद करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते, हे अन्यायकारक आहे," अशी भूमिका ॲड. जयश्री शेळके यांनी मांडली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील अपेक्षित मका उत्पादनाच्या प्रमाणात नाफेडचे खरेदी उद्दिष्ट तातडीने वाढवून द्यावे, बंद असलेली सर्व खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत आणि नोंदणीकृत प्रत्येक शेतकऱ्याचा मका हमीभावाने खरेदी केला जाईल याची खात्री करावी. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.