"मंत्री आणि प्रशासनाला वटणीवर आणावे लागेल" : आमदार बच्चू कडू मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला, मात्र संबंधित खात्याचा मंत्री त्यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसेल, तर त्या मागचे कारण शोधणे आवश्यक आहे. "पाणी नेमकं कुठे मुरतंय ते पाहणं गरजेचं आहे. केवळ सभागृहात उत्तर देऊन किंवा आश्वासन देऊन जबाबदारी संपत नाही. कायद्याची अंमलबजावणी करताना त्याचा सातत्याने पाठपुरावा होणेही तितकेच महत्त्वाचे आहे," अशा शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी आपल्या सरकारमधील एका मंत्र्यावर अप्रत्यक्ष पण तीव्र टीका केली. बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जनतेच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडल्यानंतर संबंधित विभागाने तत्काळ हालचाल करणे अपेक्षित असते. मात्र मंत्री आणि त्यांचे प्रशासकीय कार्यालय जर त्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर अशा यंत्रणेला "वटणीवर आणावे लागेल," असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षातील समन्वय, प्रशासनाची कार्यपद्धती आणि मंत्र्यांची जबाबदारी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सभागृहात मांडण्यात येणाऱ्या प्रश्नांचा योग्य पाठपुरावा न झाल्यास नागरिकांच्या समस्या अधिक गंभीर बनतात आणि शासनावरील विश्वासही कमी होतो, अशी भावना अनेक लोकप्रतिनिधींनी यापूर्वीही व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी कोणत्या खात्याचा किंवा कोणत्या मंत्र्याचा संदर्भ दिला, याबाबत अधिकृत खुलासा झालेला नसला तरी त्यांच्या वक्तव्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर आणि निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्याच्या कारभारात लोकप्रतिनिधी, मंत्री आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यात प्रभावी समन्वय असणे आवश्यक असल्याचे मतही या निमित्ताने व्यक्त केले जात आहे. आता बच्चू कडू यांच्या या टीकेनंतर संबंधित मंत्री किंवा सरकारकडून यावर कोणती भूमिका मांडली जाते, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

- "हे सगळं साचलय..., या सगळ्या गोष्टींचा उद्रेक बाहेर येतोय...!"1
- Pune : खडकवासला धरणातून 43 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले Pune : खडकवासला धरणातून 43 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले1
- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन पुणे, दि. १: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते. #annabhausathejayanti #amitshah #devendrafadnavis #lokshahirannabhausathe #अण्णाभाऊसाठेजयंती पुणे, AmitShahIn Pune, साहित्यरत्न, MaharashtraPolitics, Pune,1
- पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे1
- विजेच्या धक्क्याने दोन दिवसात दोन गायी ठार ;भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथील घटना विजेच्या धक्क्याने दोन दिवसांत दोन गायी ठार ; हरिश्चंद्रीतील धोकादायक विद्युत वाहिन्यांवर प्रश्नचिन्ह. विक्रम शिंदे /भोर दि. 1ऑगस्ट हरिश्चंद्री, ता. भोर : राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील मेन लाईन तुटून खाली पडल्याने गाभण गायीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि. ३१ जुलै २०२६ रोजी घडली. सुदैवाने यावेळी शेतकरी तसेच इतर जनावरे थोडक्यात बचावली. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने याच परिसरात दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी समीर बाठे यांच्या मालकीची गाभण गाय विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी दि. २९ जुलै रोजी दत्तात्रय गाडे यांच्या गायीच्या अंगावर विद्युत तार पडून तिचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवसाआड घडलेल्या या घटनांमुळे विद्युत वाहिन्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात विद्युत तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत असून, महावितरणच्या देखभालीतील हलगर्जीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाताना जीविताला धोका निर्माण झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. “घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जनावरे चरायला रानात घेऊन जावे की नाही?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी, परिसरातील विद्युत पोल व तारांची पाहणी करून धोकादायक स्थितीतील लाईनची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक कोतवाल अजित झाडे , शिवानंद पटेल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, किकवी सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करण्यात आली. सलग दोन घटनांनंतर महावितरणकडून कोणती कारवाई केली जाणार? मृत गायींच्या मालकांना नुकसानभरपाई मिळणार का? तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना होणार का? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.2
- "शिक्षणाचे बाजारीकरण झाले नाहीये का...? या गोष्टीवर आम्ही चर्चा करायची नाही तर मग कोणी करायची...!"1
- अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!1