logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आदिवासी विकास विभागाच्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ देवरीत शुभारंभ; आमदार संजय पुराम यांच्या हस्ते जनजागृती चित्ररथाला हिरवी झेंडी गोंदिया, 17 : आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध योजना, सेवा व सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ आज १७ सप्टेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरी येथे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते जनजागृतीपर चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाची सुरुवात करण्यात आली. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या महिनाभराच्या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. आदिवासी नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना आणि त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधांची माहिती पोहोचविणे, नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करणे तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या अभियानांतर्गत देवरी प्रकल्प अधिकारी कार्यालयासह गोंदिया जिल्ह्यातील ११ आदिवासी आश्रमशाळांमध्ये विविध उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन देण्यासोबतच आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, शिबिरांचे आयोजन करणे आणि पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे. वन हक्क अधिनियमांतर्गत पात्र अतिक्रमणधारकांना ७/१२ उतारे व हक्क प्रमाणपत्रांचे वाटप, विविध प्रमाणपत्रांसाठी विशेष उपक्रम, महिला सक्षमीकरणासाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला बचत गटांची स्थापना आणि महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ‘फिट इंडिया’ क्रीडा सत्र, आदिवासी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान व ग्रामसभांचे आयोजनही करण्यात येणार आहे. याशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांना आधार कार्ड वाटप, गावागावांत ‘पेसा मोबिलायझर’च्या माध्यमातून योजनांची माहिती व आवश्यक साहित्याचे वाटप तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची तपासणी करून आवश्यक सूचना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अभियानाच्या माध्यमातून प्रशासन आणि आदिवासी नागरिक यांच्यातील थेट संपर्क अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. या शुभारंभ प्रसंगी प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांच्यासह नगराधक्ष संजय उईके, महिला व बालविकास विभागाच्या माजी सभापती सविता पुराण, शारदा उईके, शिला मारगाये, शीलाताई उईके, छाया ताई मडावी, अवंतिका आचरे, नूतन सयाम, प्रभा सलामे, सुषमा पांढरे आदी उपस्थित होते. सेवा, समर्पण, संवेदनशीलता या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा आदिवासी नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांनी केले आहे.

46 min ago
user_Rekhalal Rahangdale
Rekhalal Rahangdale
Journalist तिरोडा, गोंदिया, महाराष्ट्र•
46 min ago
c10a6455-fe79-48b6-b347-e1a8c26750d3

आदिवासी विकास विभागाच्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ देवरीत शुभारंभ; आमदार संजय पुराम यांच्या हस्ते जनजागृती चित्ररथाला हिरवी झेंडी गोंदिया, 17 : आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध योजना, सेवा व सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ आज १७ सप्टेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरी येथे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते जनजागृतीपर चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाची सुरुवात करण्यात आली. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या महिनाभराच्या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. आदिवासी नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना आणि त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधांची माहिती पोहोचविणे, नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करणे तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या अभियानांतर्गत देवरी प्रकल्प अधिकारी कार्यालयासह गोंदिया जिल्ह्यातील ११ आदिवासी आश्रमशाळांमध्ये विविध उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन देण्यासोबतच आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, शिबिरांचे आयोजन करणे आणि पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे. वन

b09ed745-f719-432b-a705-29fbedbeaeeb

हक्क अधिनियमांतर्गत पात्र अतिक्रमणधारकांना ७/१२ उतारे व हक्क प्रमाणपत्रांचे वाटप, विविध प्रमाणपत्रांसाठी विशेष उपक्रम, महिला सक्षमीकरणासाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला बचत गटांची स्थापना आणि महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ‘फिट इंडिया’ क्रीडा सत्र, आदिवासी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान व ग्रामसभांचे आयोजनही करण्यात येणार आहे. याशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांना आधार कार्ड वाटप, गावागावांत ‘पेसा मोबिलायझर’च्या माध्यमातून योजनांची माहिती व आवश्यक साहित्याचे वाटप तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची तपासणी करून आवश्यक सूचना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अभियानाच्या माध्यमातून प्रशासन आणि आदिवासी नागरिक यांच्यातील थेट संपर्क अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. या शुभारंभ प्रसंगी प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांच्यासह नगराधक्ष संजय उईके, महिला व बालविकास विभागाच्या माजी सभापती सविता पुराण, शारदा उईके, शिला मारगाये, शीलाताई उईके, छाया ताई मडावी, अवंतिका आचरे, नूतन सयाम, प्रभा सलामे, सुषमा पांढरे आदी उपस्थित होते. सेवा, समर्पण, संवेदनशीलता या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा आदिवासी नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांनी केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • राजा गांव ग्रामीण अस्पताल का कारनामा आया सामने, जनप्रतिनिधियों का ध्यान नहीं !
    1
    राजा गांव ग्रामीण अस्पताल का कारनामा आया सामने, जनप्रतिनिधियों का ध्यान नहीं !
    user_Nitesh Babu Agase
    Nitesh Babu Agase
    Local News Reporter तिरोडा, गोंदिया, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444 शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444
    1
    शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। 

महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ
चीफ एडिटर नदीम शोहरत
Mo. 9021706444
शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। 
महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ
चीफ एडिटर नदीम शोहरत
Mo. 9021706444
    user_Nadeem Shohorat
    Nadeem Shohorat
    Local News Reporter भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    44 min ago
  • साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गणित शिक्षिका नसल्याने 'तालाठोको' आंदोलन; पालकांच्या तीव्र रोषानंतर मार्ग निघाला नमस्कार, 'सत्य को जानो न्यूज' मध्ये आपले स्वागत आहे. सालेकसा / साकरीटोला : सातगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गणित विषयाच्या शिक्षिका धुवाधपाडे मॅडम यांची चार महिन्यांपूर्वी अन्यत्र बदली करण्यात आली होती. त्यानंतर शाळेत नियमित गणित शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. आगामी १५ दिवसांत प्रथम सत्र परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या विरोधात आज संतप्त विद्यार्थी, पालक, शाळा सुधार समिती व व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेला कुलूप लावून 'तालाठोको' आंदोलन पुकारण्यात आले. प्रतिक्रिया व भूमिका: वंदनाताई काळे (जिल्हा परिषद सदस्य, कारूटोला क्षेत्र): आंदोलनादरम्यान प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई काळे म्हणाल्या की, धुवाधपाडे मॅडम या साकरीटोला शाळेत ९ वी आणि १० वीच्या गणित विषयासाठी कार्यरत असताना त्यांना नियमबाह्यरीत्या जाम्यातिम्या हायस्कूल येथे नेण्यात आले. शिक्षण सेवकाने किमान तीन वर्षे एका ठिकाणी सेवा देणे बंधनकारक असताना अवघ्या काही महिन्यांत अशी तदर्थ बदली करणे नियमबाह्य आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या आदेशाचीही शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंमलबजावणी न केल्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षण अधिकारी, पंचायत समिती कार्यालय सालेकसा: या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, साकरीटोला शाळेत पालक व व्यवस्थापन समितीने आंदोलन करून शाळा बंद केल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. धुवाधपाडे मॅडम यांची सेवा यापूर्वी जाम्यातिम्या येथील हायस्कूलमध्ये संलग्न करण्यात आली होती, परंतु पालकांच्या तीव्र मागणीनुसार त्यांचे ते आदेश रद्द करण्यात आले असून, त्या लवकरच साकरीटोला शाळेत पुन्हा रुजू होणार आहेत. पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे मनोगत: आंदोलनानंतर प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतल्यामुळे आणि पालकांच्या व शाळा समितीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या गणित विषयाच्या शिक्षक नियुक्तीची मागणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. याबद्दल पालक वर्ग व शाळा समितीच्या वतीने समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानण्यात आले. – अमगाव तालुका प्रतिनिधी, स्वराज्यदूत / संपादक, सत्य को जानो न्यूज
    1
    साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गणित शिक्षिका नसल्याने 'तालाठोको' आंदोलन; पालकांच्या तीव्र रोषानंतर मार्ग निघाला
नमस्कार, 'सत्य को जानो न्यूज' मध्ये आपले स्वागत आहे.
सालेकसा / साकरीटोला : सातगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गणित विषयाच्या शिक्षिका धुवाधपाडे मॅडम यांची चार महिन्यांपूर्वी अन्यत्र बदली करण्यात आली होती. त्यानंतर शाळेत नियमित गणित शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. आगामी १५ दिवसांत प्रथम सत्र परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या विरोधात आज संतप्त विद्यार्थी, पालक, शाळा सुधार समिती व व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेला कुलूप लावून 'तालाठोको' आंदोलन पुकारण्यात आले.
प्रतिक्रिया व भूमिका:
वंदनाताई काळे (जिल्हा परिषद सदस्य, कारूटोला क्षेत्र): आंदोलनादरम्यान प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई काळे म्हणाल्या की, धुवाधपाडे मॅडम या साकरीटोला शाळेत ९ वी आणि १० वीच्या गणित विषयासाठी कार्यरत असताना त्यांना नियमबाह्यरीत्या जाम्यातिम्या हायस्कूल येथे नेण्यात आले. शिक्षण सेवकाने किमान तीन वर्षे एका ठिकाणी सेवा देणे बंधनकारक असताना अवघ्या काही महिन्यांत अशी तदर्थ बदली करणे नियमबाह्य आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या आदेशाचीही शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंमलबजावणी न केल्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिक्षण अधिकारी, पंचायत समिती कार्यालय सालेकसा: या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, साकरीटोला शाळेत पालक व व्यवस्थापन समितीने आंदोलन करून शाळा बंद केल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. धुवाधपाडे मॅडम यांची सेवा यापूर्वी जाम्यातिम्या येथील हायस्कूलमध्ये संलग्न करण्यात आली होती, परंतु पालकांच्या तीव्र मागणीनुसार त्यांचे ते आदेश रद्द करण्यात आले असून, त्या लवकरच साकरीटोला शाळेत पुन्हा रुजू होणार आहेत.
पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे मनोगत: आंदोलनानंतर प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतल्यामुळे आणि पालकांच्या व शाळा समितीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या गणित विषयाच्या शिक्षक नियुक्तीची मागणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. याबद्दल पालक वर्ग व शाळा समितीच्या वतीने समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानण्यात आले.
– अमगाव तालुका प्रतिनिधी, स्वराज्यदूत / संपादक, सत्य को जानो न्यूज
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • भजियापार टोला येथे गणेशोत्सवानिमित्त समाजप्रबोधनातून एकतेचा संदेश गोंदिया आमगांव:भजियापार टोला, ता. आमगाव, जि. गोंदिया : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त भजियापार टोला येथील भजियापार नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने विविध सार्वजनिक व समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये एकता, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा मजबूत करण्यासोबतच विविध सामाजिक विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गौरव रहांगडाले, उपाध्यक्ष मोहित रहांगडाले, सचिव आदित्य रहांगडाले यांच्यासह गावातील ज्येष्ठ नेते राधेलाल रहांगडाले, शितल चौधरी, तीलकचंद कटरे, मेघराज चौधरी ,केशरी रहांगडाले तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘एकता आणि सामाजिक जनजागृती’ हा संदेश देण्याचा मंडळाचा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला.
    1
    भजियापार टोला येथे गणेशोत्सवानिमित्त समाजप्रबोधनातून एकतेचा संदेश
गोंदिया आमगांव:भजियापार टोला, ता. आमगाव, जि. गोंदिया : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त भजियापार टोला येथील भजियापार नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने विविध सार्वजनिक व समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये एकता, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा मजबूत करण्यासोबतच विविध सामाजिक विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष गौरव रहांगडाले, उपाध्यक्ष मोहित रहांगडाले, सचिव आदित्य रहांगडाले यांच्यासह गावातील ज्येष्ठ नेते राधेलाल रहांगडाले, शितल चौधरी, तीलकचंद कटरे, मेघराज चौधरी ,केशरी रहांगडाले तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘एकता आणि सामाजिक जनजागृती’ हा संदेश देण्याचा मंडळाचा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला.
    user_तामेश्वर पंधरे पत्रकार
    तामेश्वर पंधरे पत्रकार
    Media company आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते. मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    1
    वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक 
सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती
देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते.
मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला.
वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    user_Umesh Fulbel
    Umesh Fulbel
    रामटेक, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, महागाव तालुक्यातील शिरपुली व परिसरात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन कापूस यासह खरीप पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यवतमाळ जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सचिन उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे
    1
    शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी,
शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी,
महागाव तालुक्यातील शिरपुली व परिसरात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन कापूस यासह खरीप पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यवतमाळ जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सचिन उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews
    1
    ================================================================================
🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨
================================================================================

 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥

  कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा!

================================================================================

🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा!

🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब!

🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त!

🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात?

================================================================================
 ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡

 "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा,
 अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!"
================================================================================

📢 विशेष वृत्त:
पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही
================================================================================

#PTNNews
================================================================================
🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨
================================================================================
💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥
कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा!
================================================================================
🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा!
🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब!
🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त!
🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात?
================================================================================
⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡
"दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा,
अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!"
================================================================================
📢 विशेष वृत्त:
पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही
================================================================================
#PTNNews
    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Local News Reporter कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • ​विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.
    1
    ​विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.