गणेश शंकर लिंगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती संदीप पवार रिसोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहर उपाध्यक्षपदी गणेश शंकर लिंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष तेजराव पाटील वानखडे यांनी लिंगे यांची नियुक्ती जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी तसेच शहरातील पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश शंकर लिंगे हे पक्षाच्या विचारधारेनुसार काम करून सर्वसामान्य नागरिक, युवक आणि कार्यकर्त्यांशी समन्वय साधत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नियुक्तीनंतर गणेश शंकर लिंगे यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरातील विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. लिंगे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
गणेश शंकर लिंगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती संदीप पवार रिसोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहर उपाध्यक्षपदी गणेश शंकर लिंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष तेजराव पाटील वानखडे यांनी लिंगे यांची नियुक्ती जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी तसेच शहरातील पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश शंकर लिंगे हे पक्षाच्या विचारधारेनुसार काम करून सर्वसामान्य नागरिक, युवक आणि कार्यकर्त्यांशी समन्वय साधत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नियुक्तीनंतर गणेश शंकर लिंगे यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरातील विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. लिंगे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
- रिसोड तहसीलदार बनल्या रिल्स स्टर ... रोहित पवार.........1
- सर्व समाज बांधवांना विनंती आहे की उद्या परभणी येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती महाराष्ट्रातील सर्व तमाम धनगर समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे उद्या 17 सप्टेंबर या दिवशी परभणी येथे धनगर एसटी आरक्षण संदर्भामध्ये यलगार मोर्चाची नियोजन केले आहे तरी आपण सर्वांनी सकाळी ठीक दहा वाजता परभणी येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती1
- आजेगाव येथे पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून मागील चार वर्षापासून आजेगाव येथील रवी चौधरी हा विद्यार्थी दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करतो. रवी चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर वृक्ष गजानन गणेश मंडळाचा पर्यावरण पूरक देखावा बघण्यासाठी व पर्यावरण पूरक मूर्ती असलेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कराल झाडावर माया तर मिळेल घनदाट छाया,वृक्षवल्ली आम्हा सोयरे. करा संकल्प जलसंवर्धनाचा,मार्ग सुकर करा उद्याच्या भविष्याचा. अशा विविध प्रकारचे पर्यावरण रक्षणाचे संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आले आहेत मागील चार वर्षापासून आजेगावात पर्यावरण पूरक गणेश मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन देखील रवी चौधरी यांनी केले. सेनगाव तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आकर्षक देखावा गणपती जवळ करण्यात आला असून रवी चौधरी यांच्या या उत्कृष्ट स्तुत्य उपक्रमावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- आमदार संतोष बांगर यांनी केली साळणा शिवारात वाळलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी गेल्या एका महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यात पाऊस पडला नसल्याने सोयाबीन कापूस तूर हळद यासारखी खरीप पिके हातची गेली आहेत,या पार्श्वभूमीवर कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी बुधवारी विधानसभा क्षेत्रातील साळणा शिवारात जाऊन तेथील पाण्याअभावी वाळत असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली आहे . वाळलेल्या पिकाची बिकट परिस्थिती पाहून त्यांनी या संदर्भात हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे सांगितले .शासन लवकरच कोरडा दुष्काळ जाहीर करेल असे त्यांनी ग्वाही दिली .याप्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेना कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .1
- मंजूर झालेले सोलर संबंधित सोलर कंपनीने बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सोलर तात्काळ बसून देण्याची सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांची महावितरण कडे मागणी मंजुर सोलर परंतु न बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्या अभावी नुकसान! (शेतकऱ्यांनी वर्ग संबंधित ऑफिसमध्ये मारतात चक्ररा) तात्काळ सोलर बसवावे जाधव यांनी केली मागणी, मालेगाव प्रतिनिधी,दि,१५:- पावसाने तर मारली दांडी परंतु सोलर व महावितरण अधिकारी पण देत आहेत उडवा उडी चे उत्तर, पाण्याअभावी शेतकऱ्यांचे शेतातील हळद सोयाबीन इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात होत आहे नुकसान शासन दरबारी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सोलर सह इतर योजना असल्या तरी मात्र पात्र लाभार्थ्यांनी दोन दोन तीन तीन महिने पूर्वी लागणारी कागदपत्रे व सोलर साठी लागणारी रक्कम ची भरणा केली परंतु अद्यापही त्यांना सोलर कंपनी मार्फत सोलर तसेच महावितरण कंपनीकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून खंत शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत, मालेगाव तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध सोलर कंपन्याकडे ऑनलाइन अर्ज केले आहेत, अमानी येथील शेतकरी राजू भिमराव गवळी,व अनिल गंगाराम जाधव यांनी मागील दोन - महीन्यापृर्वी सोलर साठी,ओस्वाल कंपनी साठी ऑनलाइन अर्ज केला तसेच लागणारी रक्कम सुद्धा भरली परंतु अद्याप यांच्या शेतात बोरवर सोलर बसवण्यात आले नसल्याने यांचे हळद ,सोयाबीन इतर पिक वाळून चालले यांनी मालेगाव महावितरण कंपनीकडे तसेच वाशिम कंपनीकडे चकरा मारून परेशान झाले असता आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय वाशिम संदीप दत्तात्रेय दरवडे यांची प्रत्यक्ष भेट सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव तसेच शेतकरी राजु गवळी यांनी घेतली असता, त्यांनी संबंधित महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्हि बी चव्हाण, तसेच ओसवाल कंपनीचे विनोद ब्रह्मेकर यांच्याशी संपर्क साधून या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात सांगितले, याबाबत ओबीसी सेलचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख विवेक गवळी यांनी सुद्धा दूरध्वनीवरून साहेबांशी संपर्क साधून विचारणा केली, सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी थेट महावितरण चे वरिष्ठ अधीक्षक दरवडे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली व त्यांनी तात्काळ दाखल घेऊन दोनच दिवसात सोलर बसवल्या जातील असे यावेळी जाधव यांना सांगितले, जाधव यांनी महावितरण व सोलर कंपनी वाले शेतकऱ्याकडून पैशाची मागणी देखील करतात असे सांगितले असता, दरवडे म्हणाले ज्यांनी पैशाची मागणी केली असेल त्यांना डायरेक्ट लाच लुचपत विभागाकडे तक्रार करून पकडून द्या , काही शेतकरी तर आमचे अधिकाऱ्यांचे पाय धरायचे राहिले हो साहेब असे म्हणाले तेव्हा या बाबीची तात्काळ दखल घेऊन पात्र परंतु सोलर पासून वंचित असलेले सर्व शेतकऱ्यांचे सोलर तात्काळ बसून द्यावे अशी मागणीही अनिल जाधव यांनी यावेळी केली2
- परभणी येथील मोर्चाला समाज बांधवांनी उपस्थित राहावे -विष्णु भाऊ कु-हाडे धनगर समाजाला घटना दत्त stआरक्षण मिळावे यासाठी दि १७सप्टेबर रोजी होत असलेल्या परभणी येथील मोर्चाला सर्व धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यशवंत संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांनी केले आहे1
- आमच्या गावाची स्वच्छता आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.3
- बोथी येथे चोरट्यांनी चार शेळ्या केल्या लंपास,पोलिसात अज्ञात चोरावर गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील बोथी येथून शेतकऱ्यांच्या चार शेळ्या चोरट्यांनी लंपास केल्या प्रकरणी दि.15सप्टेंबर रोजी मंगळवारी दुपारी आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यातील विविध भागात शेळ्या चोरी बरोबर पशुधन चोरी घटना वरचेवर घडत आहेत. बोथी येथील शेतकरी केशव कृष्णा काळे यांनी आपल्या घरा शेजारी नेहमी प्रमाणे बांधलेल्या चार लहान मोठ्या शेळ्या किंमत २२ हजार रुपये, दि . ११ सप्टेबर रोजी सायंकाळी ते १२ सप्टेंबर पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास रामेश्वर तांडा पोलीस चौकी प्रमुख सिताराम मस्के करत आहेत.1