logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हल्ल्याच्या सूत्रधाराचा शोध घेऊन अटक करा; रमेश चव्हाण यांची मागणी पत्रकार परिषदेत भाजपातील बड्या नेत्यावर गंभीर आरोप; पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उमरखेड : माझ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असून, हल्ल्याचा कट नेमका कोणी रचला याचा सखोल तपास करून सूत्रधारासह सर्व संबंधितांना अटक करावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते रमेश चव्हाण यांनी केली. हल्ल्यापूर्वी धमक्या मिळाल्या होत्या, तसेच आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. २५ ऑगस्ट रोजी उमरखेड येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या तपास प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख ॲड. संजीवकुमार जाधव, बसवेश्वर क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, ते मागील ३३ वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते. पक्षातील विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर अलीकडील काळात पक्षातील कथित एकाधिकारशाहीविरोधात त्यांनी भूमिका घेतली. जिल्हा परिषद मालकीच्या जमिनीबाबत माहितीच्या अधिकारातून माहिती मागितल्यामुळे धमक्या मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच नगरपरिषद निवडणुकीच्या काळात पुसद येथील एका कार्यक्रमाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित केल्यानंतरही धमक्या आल्याचे त्यांनी सांगितले. १७ जून रोजी रात्री सुमारे ७.४५ वाजता नाथनगर परिसरातून दुचाकीवरून घरी जात असताना चार ते पाच जणांनी चाकू व लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा दावा चव्हाण यांनी केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले व पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. जबाब फाडल्याचा गंभीर आरोप रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे यांनी आपला जबाब नोंदविल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्या जबाबात काही व्यक्तींची नावे नमूद केल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, ठाणेदार शंकर पांचाळ यांनी तो जबाब पाहिल्यानंतर ‘बयान चुकले आहे’ असे सांगून तो फाडून टाकल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपण जबाब देण्याच्या स्थितीत असल्याचे स्पष्ट केले असतानाही पुन्हा जबाब घेण्याची प्रक्रिया का करण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संबंधित जबाबात काही राजकीय व्यक्तींची नावे येऊ नयेत, या उद्देशाने हस्तक्षेप झाला का, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. CDR तपासा, हल्ल्याचा कट उघड करा! हल्ल्यातील आरोपींचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), हल्ल्यापूर्वीचे फोन संपर्क, संशयित व्यक्तींशी असलेले संबंध आणि हल्ल्यापूर्वीची हालचाल यांची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. केवळ हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कारवाई न करता, त्यामागील आर्थिक, राजकीय किंवा अन्य कारणांचा तपास करून हल्ल्याचा खरा सूत्रधार कोण, हे जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना शहरप्रमुख ॲड. संजीवकुमार जाधव यांनीही पोलिसांच्या तपासाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. चौकट : ‘पोलिसांची भूमिका संशयास्पद?’ — ॲड. जाधव ॲड. संजीवकुमार जाधव यांनी दावा केला की, रमेश चव्हाण यांचा जबाब घेत असताना ठाणेदार शंकर पांचाळ यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून फोन चव्हाण यांच्या कानाला लावला. तसेच संबंधित जबाबात कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे नाव घेऊ नये, असे सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांची निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी होऊन जबाब नोंदविण्याची संपूर्ण प्रक्रिया, उपलब्ध रेकॉर्ड, संबंधित पोलिसांचे मोबाईल/कॉल तपशील आणि तपासातील कागदपत्रांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली. आता प्रश्न केवळ हल्ला करणाऱ्या आरोपींच्या अटकेचा नाही; तर या हल्ल्यामागे कोणाचा कट होता आणि सूत्रधारापर्यंत तपास यंत्रणा पोहोचणार का, हा खरा सवाल आहे. संबंधित आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे आवश्यक असून, दोषी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे.

4 hrs ago
user_Shaikh irfan Shaikh isa
Shaikh irfan Shaikh isa
उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
4 hrs ago
4b7debb6-60d5-4f3a-b5ef-cd8a84af9f1d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून  शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे.  सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास  कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .
    1
    कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल
कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून  शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे. 
सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास  कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ईद-ए-मीलादुन्नबी च्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात पोलिसांचे भव्य पथ संचलन शहरात सुरक्षेचा आढावा
    1
    ईद-ए-मीलादुन्नबी च्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात पोलिसांचे भव्य पथ संचलन शहरात सुरक्षेचा आढावा
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer किनवट, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे
    1
    मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे ,
धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    1
    🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
 शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू,
📍 वसमत, जि. हिंगोली
शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली—
🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
असा स्पष्ट इशारा!
✊ जमीन आमची — निर्णय आमचा!
🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द!
#शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    user_Ramprasad Magar news reporter
    Ramprasad Magar news reporter
    Local News Reporter बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    1
    सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न 
अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    7 hrs ago
  • मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले. तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे. सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.
    1
    मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले.

तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे.

सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • 🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात! 📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes
    1
    🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात!

📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा!
#NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    17 hrs ago
  • हदगावा तालुक्यातील तामसा येथे भव्य भोम प्रदोष कावड यात्रा काढण्यात आली.
    1
    हदगावा तालुक्यातील तामसा येथे भव्य भोम प्रदोष कावड यात्रा काढण्यात आली.
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer किनवट, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.