logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची उदगीर कार्यकारणी जाहीर. उदगीर (एल पी उगीले) महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेनभाई रेडकर तसेच लातुर विभागाचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांच्या सुचनेनुसार उदगीर आगार कार्यकारिणी निवडीची बैठक उदगीर शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली . या बैठकीत उदगीर आगार कार्यकारिणी खालीलप्रमाणे निवड करण्यात आली.  प्रमुख सल्लागार म्हणून शिवसेनेचे उदगीर तालुकाप्रमुख प्रशांत मोरे यांची निवड करण्यात आली तर उदगीर  आगार अध्यक्ष पदी: दयानंद फड, आगार सचिव पदी: धनराज स्वामी,  कार्याध्यक्ष: संजय फड, कोषाध्यक्ष: दिलीप म्हेत्रे, उपाध्यक्ष:श्रीडोळे विनायक,पटेल के जी,सहसचिव: महेश निला,संघटक : सुनील चव्हाण,प्रसिद्धी प्रमुख: अनिल फुले,महिला संघटक: सौ. संजना शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना लातुर विभागाचे विभाग अध्यक्ष महेश पोलकर व विभाग सचिव विवेकानंद शेटे यांनी निवड झालेल्या पदाधिकार्यांचे अभिनंदन करत एस.टी. कामगारांच्या आर्थिक प्रश्नासह सर्व प्रश्न मार्गी लावण्यात शिवसेनेचा मोठा वाटा असुन भविष्यातील प्रश्न सोडविण्यासाठी आपली एकजूट दिसणे खुप गरजेचे आहे. त्यामुळे कुडाळ, रत्नागिरी येथे होणाऱ्या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन केले.  तसेच यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत मोरे यांनी निवड झालेल्या पदाधिकार्यांचे अभिनंदन करुण काम करत असताना येणाऱ्या अडचणी च्या वेळी कधीही हाक द्या, शिवसेना तालुकाप्रमुख तुमच्या सोबत आहे. असे आश्वासन दिले. यावेळी उपतालुकाप्रमुख महेश भाऊ फुले, महाराष्ट्र एसटी कामगार सेना लातुर विभागाचे प्रसिद्धी प्रमुख प्रकाश कानगुले, लातुर आगार अध्यक्ष बंकट गायकवाड , संघटक सचिव राजकुमार धनबा, जेष्ठ नेते सचिनभाऊ पटवारी, मठपती अप्पा, संतोष माळी , प्रशांत लासुरे व बहुसंख्य कामगार उपस्थित होते.

4 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
4 hrs ago
413f7550-75db-4cbf-9b0e-cb659440c20d

महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची उदगीर कार्यकारणी जाहीर. उदगीर (एल पी उगीले) महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेनभाई रेडकर तसेच लातुर विभागाचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांच्या सुचनेनुसार उदगीर आगार कार्यकारिणी निवडीची बैठक उदगीर शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली . या बैठकीत उदगीर आगार कार्यकारिणी खालीलप्रमाणे निवड करण्यात आली.  प्रमुख सल्लागार म्हणून शिवसेनेचे उदगीर तालुकाप्रमुख प्रशांत मोरे यांची निवड करण्यात आली तर उदगीर  आगार अध्यक्ष पदी: दयानंद फड, आगार सचिव पदी: धनराज स्वामी,  कार्याध्यक्ष: संजय फड, कोषाध्यक्ष: दिलीप म्हेत्रे, उपाध्यक्ष:श्रीडोळे विनायक,पटेल के जी,सहसचिव: महेश निला,संघटक : सुनील चव्हाण,प्रसिद्धी प्रमुख: अनिल फुले,महिला संघटक: सौ. संजना शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना लातुर विभागाचे विभाग अध्यक्ष महेश पोलकर व विभाग सचिव विवेकानंद शेटे यांनी निवड झालेल्या पदाधिकार्यांचे अभिनंदन करत एस.टी. कामगारांच्या आर्थिक प्रश्नासह सर्व प्रश्न मार्गी लावण्यात शिवसेनेचा मोठा वाटा असुन भविष्यातील प्रश्न सोडविण्यासाठी आपली एकजूट दिसणे खुप गरजेचे आहे. त्यामुळे कुडाळ, रत्नागिरी येथे होणाऱ्या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन केले.  तसेच यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत मोरे यांनी निवड झालेल्या पदाधिकार्यांचे अभिनंदन करुण काम करत असताना येणाऱ्या अडचणी च्या वेळी कधीही हाक द्या, शिवसेना तालुकाप्रमुख तुमच्या सोबत आहे. असे आश्वासन दिले. यावेळी उपतालुकाप्रमुख महेश भाऊ फुले, महाराष्ट्र एसटी कामगार सेना लातुर विभागाचे प्रसिद्धी प्रमुख प्रकाश कानगुले, लातुर आगार अध्यक्ष बंकट गायकवाड , संघटक सचिव राजकुमार धनबा, जेष्ठ नेते सचिनभाऊ पटवारी, मठपती अप्पा, संतोष माळी , प्रशांत लासुरे व बहुसंख्य कामगार उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • संस्काराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या गुरु कडून आशीर्वाद हेच जीवनाचे साफल्य - रामभाऊ तिरुके उदगीर (एल पी उगीले) उदगीर तालुक्यातील वाढवणा जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ तिरुके विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्यावर संस्कार केलेल्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत संस्कार करणारे, शिक्षणाची भक्कम पायाभरणी करून देणारे मार्गदर्शक तथा शिक्षक शिवाजीराव पांचाळ गुरुजी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले.  गुरु पेक्षा शिष्य मोठा व्हावा, तोच गुरुला खरा आनंद असतो. भावनेने प्रचंड आनंदाने त्यांनी रामभाऊ तिरुके यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद घेतल्यानंतर बोलताना रामभाऊ तिरुके म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाच्या त्या मजबूत पायावर उभा राहूनच मी पुढील शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू ठेवू शकलो. गेली ३२ वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लोकांनी दिलेला विश्वास, उभं केलेलं काम आणि चार वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढवताना तीन वेळा जनतेने माझ्यावर उधळलेला विजयाचा गुलाल, हे सर्व ऐकून आणि पाहून गुरुजींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता. गुरुजींचे आशीर्वाद हेच माझे खरे बळ असून त्यांच्या कृपाशिर्वादाने समाजसेवेची ही वाटचाल अधिक जोमाने आणि निष्ठेने पुढे सुरू राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या गुरुजनांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या पक्षश्रष्ठींचा सन्मान झाला पाहिजे अशाच पद्धतीचे काम माझ्या हातून होत राहील. आज पर्यंत जो आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे, तोच आदर्श शेवटपर्यंत माझ्यासमोर राहील. त्यामुळे मी समाजसेवा हेच जीवनाचे ध्येय ठेवले आहे, असे स्पष्ट केले.
    1
    संस्काराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या गुरु कडून आशीर्वाद हेच जीवनाचे साफल्य - रामभाऊ तिरुके
उदगीर (एल पी उगीले) उदगीर तालुक्यातील वाढवणा जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ तिरुके विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्यावर संस्कार केलेल्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत संस्कार करणारे, शिक्षणाची भक्कम पायाभरणी करून देणारे मार्गदर्शक तथा शिक्षक शिवाजीराव पांचाळ गुरुजी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले. 
गुरु पेक्षा शिष्य मोठा व्हावा, तोच गुरुला खरा आनंद असतो. भावनेने प्रचंड आनंदाने त्यांनी रामभाऊ तिरुके यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिला.
हा आशीर्वाद घेतल्यानंतर बोलताना रामभाऊ तिरुके म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाच्या त्या मजबूत पायावर उभा राहूनच मी पुढील शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू ठेवू शकलो. गेली ३२ वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लोकांनी दिलेला विश्वास, उभं केलेलं काम आणि चार वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढवताना तीन वेळा जनतेने माझ्यावर उधळलेला विजयाचा गुलाल, हे सर्व ऐकून आणि पाहून गुरुजींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता. गुरुजींचे आशीर्वाद हेच माझे खरे बळ असून त्यांच्या कृपाशिर्वादाने समाजसेवेची ही वाटचाल अधिक जोमाने आणि निष्ठेने पुढे सुरू राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या गुरुजनांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या पक्षश्रष्ठींचा सन्मान झाला पाहिजे अशाच पद्धतीचे काम माझ्या हातून होत राहील. आज पर्यंत जो आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे, तोच आदर्श शेवटपर्यंत माझ्यासमोर राहील. त्यामुळे मी समाजसेवा हेच जीवनाचे ध्येय ठेवले आहे, असे स्पष्ट केले.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • *शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश* ​ २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जगदाळे कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्याने निर्माण झालेल्या संकटाच्या काळात, त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित होत आहेत. शहीद संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर जगदाळे कुटुंब उघड्यावर पडले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २५ मे २०२५ रोजी जगदाळे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि व्यथा जाणून घेतल्यानंतर, डॉ. गोऱ्हे यांनी २७ मे २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून आसावरी जगदाळे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. ​ डॉ. गोऱ्हे यांच्या पत्राच्या अनुषंगाने १९ जून २०२५ रोजी नगरविकास विभागाने पुणे महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींमुळे नियुक्ती लांबणीवर पडत असताना डॉ. गोऱ्हे यांनी खचून न जाता सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्या आणि सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला. ​ सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणात संवेदनशीलतेने लक्ष घातले. तांत्रिक अडचणी असूनही एका शहीद कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयाला आज यश आले असून आसावरी यांना नोकरी प्राप्त होत आहे. ​"संतोष जगदाळे यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या बलिदानाची परतफेड आपण करू शकत नाही, मात्र त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणे ही आपली संस्कृती नाही. आसावरीला नोकरी मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे थोडा विलंब झाला, त्याबद्दल आम्ही जगदाळे कुटुंबाच्या भावनेशी सहमत आहोत. मात्र, आज तिला नियुक्ती मिळत असल्याचा समाधान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते केवळ राज्याचे प्रमुख नसून खऱ्या अर्थाने 'लाडक्या बहिणीचे राखणदार' आहेत." ​या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून, एका वीरपुत्राच्या बलिदानाचा सन्मान शासनाकडून करण्यात आला आहे.
    1
    *शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश*
​
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आज मोठा दिलासा मिळाला आहे. जगदाळे कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्याने निर्माण झालेल्या संकटाच्या काळात, त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश निर्गमित होत आहेत.
शहीद संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर जगदाळे कुटुंब उघड्यावर पडले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २५ मे २०२५ रोजी जगदाळे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि व्यथा जाणून घेतल्यानंतर, डॉ. गोऱ्हे यांनी २७ मे २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून आसावरी जगदाळे यांना विशेष बाब म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती.
​
डॉ. गोऱ्हे यांच्या पत्राच्या अनुषंगाने १९ जून २०२५ रोजी नगरविकास विभागाने पुणे महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींमुळे नियुक्ती लांबणीवर पडत असताना डॉ. गोऱ्हे यांनी खचून न जाता सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेतल्या आणि सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला.
​
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी या प्रकरणात संवेदनशीलतेने लक्ष घातले. तांत्रिक अडचणी असूनही एका शहीद कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. डॉ. गोऱ्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयाला आज यश आले असून आसावरी यांना नोकरी प्राप्त होत आहे.
​"संतोष जगदाळे यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांचे जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. त्यांच्या बलिदानाची परतफेड आपण करू शकत नाही, मात्र त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणे ही आपली संस्कृती नाही. आसावरीला नोकरी मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे थोडा विलंब झाला, त्याबद्दल आम्ही जगदाळे कुटुंबाच्या भावनेशी सहमत आहोत. मात्र, आज तिला नियुक्ती मिळत असल्याचा समाधान आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते केवळ राज्याचे प्रमुख नसून खऱ्या अर्थाने 'लाडक्या बहिणीचे राखणदार' आहेत."
​या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभणार असून, एका वीरपुत्राच्या बलिदानाचा सन्मान शासनाकडून करण्यात आला आहे.
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by EKMAT DIGITAL
    1
    Post by EKMAT DIGITAL
    user_EKMAT DIGITAL
    EKMAT DIGITAL
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • विरहनुमान रोड साळे गल्ली येथील हनुमान मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त नीलकंटेश्वर महादेवाचा रुद्र अभिषेक करण्यात आला यावेळेस शेकडो भाविक भक्त उपस्थित होते अतिशय भक्ती मय वातावरणात अभिषेक संपन्न झाला
    1
    विरहनुमान रोड साळे गल्ली येथील हनुमान मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त नीलकंटेश्वर महादेवाचा रुद्र अभिषेक करण्यात आला यावेळेस शेकडो भाविक भक्त उपस्थित होते अतिशय भक्ती मय वातावरणात अभिषेक संपन्न झाला
    user_अखंड भारत
    अखंड भारत
    Samaj Sevak Latur, Mumbai•
    19 hrs ago
  • लातूर (प्रतिनिधी): शहरातील लाहोटी तंत्रनिकेतन समोरील मुख्य रस्त्यावर सोमवारी सायंकाळी एका युवकावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ शासकीय रुग्णालय लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अचानक युवकाला गाठत त्याच्यावर चाकूने वार केले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच लातूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून संशयितांचा शोध घेतला. या प्रकरणात एकास ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, जखमी युवकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    2
    लातूर (प्रतिनिधी): शहरातील लाहोटी तंत्रनिकेतन समोरील मुख्य रस्त्यावर सोमवारी सायंकाळी एका युवकावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ शासकीय रुग्णालय लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अचानक युवकाला गाठत त्याच्यावर चाकूने वार केले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच लातूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून संशयितांचा शोध घेतला. या प्रकरणात एकास ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, जखमी युवकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    23 hrs ago
  • वसंत स्मृती येथील बैठकीत कडक इशारा..! नायगाव पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केवळ पद मिळवणे पुरेसे नाही तर गावपातळीवर जाऊन गोरगरीब जनतेची कामे करणे आवश्यक आहे पद घेऊन घरी बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही कामात कसूर करणाऱ्यांना तातडीने पदावरून कमी करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असा स्पष्ट इशारा खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला नायगाव येथील वसंत स्मृती मेमोरियल मध्ये आयोजित नांदेड दक्षिण काँग्रेस'च्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते
    1
    वसंत स्मृती येथील बैठकीत कडक इशारा..!
नायगाव पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केवळ पद मिळवणे पुरेसे नाही तर गावपातळीवर जाऊन गोरगरीब जनतेची कामे करणे आवश्यक आहे
पद घेऊन घरी बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही कामात कसूर करणाऱ्यांना तातडीने पदावरून कमी करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल
असा स्पष्ट इशारा खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला
नायगाव येथील वसंत स्मृती मेमोरियल मध्ये आयोजित नांदेड दक्षिण काँग्रेस'च्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • आशिव येथील शाळकरी मुलांच्या नृत्याने शिवस्मारक यात्रेचे जंगी स्वागत
    1
    आशिव येथील शाळकरी मुलांच्या नृत्याने शिवस्मारक यात्रेचे जंगी स्वागत
    user_बाळकृष्ण प्रकाश कदम
    बाळकृष्ण प्रकाश कदम
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • उदगीर (एल पी उगीले) येथील जीवन फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आद्य क्रांतिगृह असतात लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रामुख्याने जीवन प्रयाग फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी, प्रा. संजय बीबीनवरे, सामाजिक कार्यकर्ते दयानंद कांबळे, चंद्रकला सूर्यवंशी यांच्यासह वस्ताद लहुजी साळवे यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
    1
    उदगीर (एल पी उगीले) येथील जीवन फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आद्य क्रांतिगृह असतात लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रामुख्याने जीवन प्रयाग फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी, प्रा. संजय बीबीनवरे, सामाजिक कार्यकर्ते दयानंद कांबळे, चंद्रकला सूर्यवंशी यांच्यासह वस्ताद लहुजी साळवे यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.