logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आठ वर्षांपूर्वी अंबाजोगाईतून हरवलेला तरुण दिल्लीत सापडला ..... मुलगा सापडताच वडिलांचे आनंद अश्रु आनावर ...... आठ वर्षांपूर्वी अंबाजोगाईतून हरवलेला तरुण दिल्लीत सापडला ..... मुलगा सापडताच वडिलांचे आनंद अश्रु आनावर ...... अंबाजोगाई प्रतिनिधी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या कौशल्यामुळे अखेर बाप-लेकाची झाली गळाभेट अंबाजोगाई: शिक्षणाच्या ओझ्याखाली दबलेला आणि अपयशाच्या भीतीपोटी आपल्या जन्मदात्यांपासून दुरावलेल्या एका तरुणाचा तब्बल आठ वर्षांनंतर आपल्या वडिलांशी पुनर्भेट झाली आहे. लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला सत्यम महादेव हुडगे हा तरुण ९ मार्च २०१८ रोजी अंबाजोगाई येथून बेपत्ता झाला होता, ज्याचा शोध बीड पोलिसांनी तांत्रिक कौशल्याच्या जोरावर दिल्ली-गाझियाबाद परिसरातून लावला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी २०२६ मध्ये राबवलेल्या विशेष शोध मोहिमेला मोठे यश आले असून, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड आणि त्यांच्या पथकाने केलेल्या या संवेदनशील कामगिरीमुळे एका विखुरलेल्या कुटुंबाची पुन्हा एकदा सांधणी झाली आहे. सत्यम हा अंबाजोगाई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता, मात्र सतत मिळणारे अपयश आणि घरच्यांच्या अपेक्षांचे ओझे यामुळे तो मानसिक तणावात होता. याच नैराश्यातून त्याने आपल्या बँक खात्यातील सर्व रक्कम काढून घेतली आणि कोणालाही काहीही न सांगता घर सोडले. मुलाचा शोध न लागल्याने हताश झालेल्या वडिलांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेल्या आठ वर्षांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, मात्र कोणताच सुगावा लागत नव्हता. अखेर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या प्रकरणाचा नव्याने पाठपुरावा करण्याचे आदेश दिले आणि तपासचक्राला वेग आला. या गुंतागुंतीच्या प्रकरणात पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी तपासाची धुरा अत्यंत कौशल्याने सांभाळली. त्यांनी तांत्रिक सेलच्या मदतीने जुन्या माहितीचे विश्लेषण केले आणि सत्यम वापरत असलेला नवीन मोबाईल क्रमांक शोधून काढला. हे लोकेशन दिल्ली-गाझियाबाद परिसरात असल्याचे निष्पन्न होताच, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी वडिलांशी सतत संपर्क साधून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन आणि तांत्रिक माहिती पुरवली. पोलिसांच्या या अचूक समन्वयामुळे वडिलांना दिल्ली गाठणे शक्य झाले आणि तिथे आपला मुलगा सुरक्षित असल्याचे पाहून त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. सत्यमने या आठ वर्षांच्या काळात स्वतःचे स्वतंत्र आयुष्य उभे केले असून तो तिथे भागीदारीत कुरिअर व्यवसाय करत आहे आणि त्याने विवाह देखील केला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड आणि पोलीस हवालदार पांडुरंग काळे यांनी केलेल्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच एका पित्याची आपल्या मुलाला पाहण्याची दीर्घकालीन प्रतीक्षा संपली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या घटनेच्या निमित्ताने पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत चालला असून, शिक्षणाचा दबाव आणि अपयशाची भीती मुलांमध्ये नैराश्य निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत मुलांनी टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा पालकांशी मनमोकळेपणाने संवाद साधणे आवश्यक आहे, तर पालकांनीही मुलांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्यातील संवाद आणि संयम वाढवणे काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

2 hrs ago
user_अशोक दगडू वाघमारे
अशोक दगडू वाघमारे
अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
2 hrs ago
395576e9-59e5-40dc-8149-47bfe757ceee

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • "ना पाणी मिळालं, ना शब्द पाळला! पालसिंगनमध्ये जल जीवन मिशनचं काम रामभरोसे; आमदार संदीप क्षीरसागरांनी केवळ जरांगे पाटलांच्या नावावर स्वतःचं राजकारण साधलं?" — माजी सरपंच भीमराव खंडागळे यांचा संतापजनक सवाल.
    1
    "ना पाणी मिळालं, ना शब्द पाळला! पालसिंगनमध्ये जल जीवन मिशनचं काम रामभरोसे; आमदार संदीप क्षीरसागरांनी केवळ जरांगे पाटलांच्या नावावर स्वतःचं राजकारण साधलं?"
— माजी सरपंच भीमराव खंडागळे यांचा संतापजनक सवाल.
    user_Hanumant Shinde
    Hanumant Shinde
    Voice of people बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ
    1
    खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    15 hrs ago
  • ------- पाटोदा (प्रतिनिधी) :- पाटोदा शहरातील महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पावन वास्तव्याने धन्य झालेल्या श्रीकृष्ण मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भक्तनिवास वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या वेळी बोलताना आमदार धस म्हणाले की सन २०१९-२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना श्री.देवेंद्रजी फडणवीस व पर्यटन मंत्री मा.श्री.जयकुमारजी रावल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागाच्या विशेष योजनेतून मंजूर ₹२.५१ कोटी निधीतून सुसज्ज हॉल, निवासी खोल्या, टॉयलेट-बाथरूम सुविधा, संरक्षण भिंत, पाणी फिल्टर आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. नानासाहेब डिडुळ, सतीश बप्पा जाधव व सहकाऱ्यांनी अत्यंत गुणवत्तापूर्ण काम करून पाटोद्यात एक सुंदर वास्तू साकारली आहे. महानुभाव पंथाची समता, साधेपणा व सर्वसमावेशकता अधोरेखित करत, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी मराठीतील ‘लीळाचरित्र’ च्या माध्यमातून दिलेला सामाजिक संदेश आज ही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. पाटोदा हे त्यांच्या वास्तव्याने पवित्र स्थळ असून, या ठिकाणाचा विकास आणि भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्धार या वेळी आमदार सुरेश आण्णा धस यांनी व्यक्त केला. राज्य शासनाकडून महानुभव पंथ व श्री चक्रधर स्वामी मंदिर विकासासाठी मोठा निधी मंजूर झाल्याने भविष्यात पाटोदा शहराला धार्मिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमास विविध मान्यवर, महंत, पदाधिकारी व महानुभव पंथीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    -------
पाटोदा (प्रतिनिधी) :- पाटोदा शहरातील महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पावन वास्तव्याने धन्य झालेल्या श्रीकृष्ण मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भक्तनिवास वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या वेळी बोलताना आमदार धस म्हणाले की सन २०१९-२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना श्री.देवेंद्रजी फडणवीस व पर्यटन मंत्री मा.श्री.जयकुमारजी रावल  यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागाच्या विशेष योजनेतून मंजूर ₹२.५१ कोटी निधीतून सुसज्ज हॉल, निवासी खोल्या, टॉयलेट-बाथरूम सुविधा, संरक्षण भिंत, पाणी फिल्टर आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. नानासाहेब डिडुळ, सतीश बप्पा जाधव व सहकाऱ्यांनी अत्यंत गुणवत्तापूर्ण काम करून पाटोद्यात एक सुंदर वास्तू साकारली आहे. महानुभाव पंथाची समता, साधेपणा व सर्वसमावेशकता अधोरेखित करत, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी मराठीतील ‘लीळाचरित्र’ च्या माध्यमातून दिलेला सामाजिक संदेश आज ही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. पाटोदा हे त्यांच्या वास्तव्याने पवित्र स्थळ असून, या ठिकाणाचा विकास आणि भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्धार या वेळी आमदार सुरेश आण्णा धस यांनी व्यक्त केला. राज्य शासनाकडून महानुभव पंथ व श्री चक्रधर स्वामी मंदिर विकासासाठी मोठा निधी मंजूर झाल्याने भविष्यात पाटोदा शहराला धार्मिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमास विविध मान्यवर, महंत, पदाधिकारी व महानुभव पंथीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Sanjhsuyog News Channel
    1
    Post by Sanjhsuyog News Channel
    user_Sanjhsuyog News Channel
    Sanjhsuyog News Channel
    Beed, Maharashtra•
    16 hrs ago
  • महाराष्ट्र दिनी लातूर पोलिसांचा रक्तदानाचा अभिनव उपक्रम. खाकी’तील माणुसकीचा स्पर्श! रक्तदात्यांना हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट; सहा केंद्रांवर उत्स्फूर्त सहभाग. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शुक्रवार दिनांक 01 मे 2026. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘खाकी’तील माणुसकीचा प्रत्यय देणाऱ्या या उपक्रमात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाअंतर्गत शहरातील पत्रकार प्रकाश कंकाळ यांच्यासह विविध स्तरातील नागरिकांनी रक्तदान करून सहा विविध केंद्रांवर रक्तसंकलन करण्यात आले. सकाळपासूनच रक्तदात्यांची गर्दी दिसून आली. पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही या शिबिरात उत्साहाने भाग घेतला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास पोलिसांकडून हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट देण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे रक्तदानासोबतच रस्ते सुरक्षा जनजागृतीचाही संदेश देण्यात आला. लातूर पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘सेवा आणि सुरक्षा’ या ब्रीदवाक्याला साजेसा उपक्रम ठरला आहे.
    3
    महाराष्ट्र दिनी लातूर पोलिसांचा रक्तदानाचा अभिनव उपक्रम.
खाकी’तील माणुसकीचा स्पर्श!
रक्तदात्यांना हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट; सहा केंद्रांवर उत्स्फूर्त सहभाग.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
शुक्रवार दिनांक 01 मे 2026. 
महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘खाकी’तील माणुसकीचा प्रत्यय देणाऱ्या या उपक्रमात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली.
या उपक्रमाअंतर्गत शहरातील पत्रकार प्रकाश कंकाळ यांच्यासह विविध स्तरातील नागरिकांनी रक्तदान करून सहा विविध केंद्रांवर रक्तसंकलन करण्यात आले. सकाळपासूनच रक्तदात्यांची गर्दी दिसून आली. पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही या शिबिरात उत्साहाने भाग घेतला.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास पोलिसांकडून हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट देण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे रक्तदानासोबतच रस्ते सुरक्षा जनजागृतीचाही संदेश देण्यात आला.
लातूर पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘सेवा आणि सुरक्षा’ या ब्रीदवाक्याला साजेसा उपक्रम ठरला आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • विधवा,निराधार,श्रावण बाळ सेवा योजनेच्या पात्र लाभधारकांचे अनुदान पुर्ववत सुरू करा- महिला काँग्रेस वर्कर्स अध्यक्षा जानु बी शेख
    1
    विधवा,निराधार,श्रावण बाळ सेवा योजनेच्या पात्र लाभधारकांचे अनुदान पुर्ववत सुरू करा- महिला काँग्रेस वर्कर्स अध्यक्षा जानु बी शेख
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    15 hrs ago
  • बीडमध्ये अल्पसंख्यांकांचा एल्गार; संरक्षण कायद्यासाठी उपोषण आंदोलन
    1
    बीडमध्ये अल्पसंख्यांकांचा एल्गार; संरक्षण कायद्यासाठी उपोषण आंदोलन
    user_Sanjhsuyog News Channel
    Sanjhsuyog News Channel
    Beed, Maharashtra•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.