चांदवड येथील चंद्रेश्वर गडावर ऋषिपंचमी निमित्त महिला भाविकांची अलोट गर्दी सालाबाद प्रमाणे याही वर्षी महिला भाविकांनी श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे ऋषीपंचमी निमित्त सप्तऋषींचे पूजन व श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगडाचे प्रथम व द्वितीय चंद्रेश्वर बाबा यांच्या समाधीचे पूजन केले. प्राचीन काळापासून श्रीक्षेत्र चंद्रेश्वगड हा असंख्य ऋषीमुनींची तपश्चर्या करण्याची पावन भूमी असल्याकारणाने या परम पावन गडावर ऋषिपंचमीचे एक अनोखे असे आध्यात्मिक महत्त्व आहे. भगवान चंद्रदेव यांची तपोभूमी व महान ऋषी जमदग्नी व भगवान परशुराम यांच्या वास्तव्याने ही भूमी परम पावन भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी केलेली साधना व व्रत तात्काळ फळाला येते अशी धारणा भाविकांची असल्यामुळे या पुण्य भूमीवर ऋषिपंचमी निमित्त महिला भाविकांची अलोट गर्दी दरवर्षी होत असते. ऋषिपंचमी निमित्त चंद्रेश्वरगडाचे महंत स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराच्या वतीने येणाऱ्या महिला भाविकांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली. व चांदवड पोलीस स्टेशनच्या वतीने चांगल्या स्वरूपातील पोलीस बंदोबस्त देण्यात आला.
चांदवड येथील चंद्रेश्वर गडावर ऋषिपंचमी निमित्त महिला भाविकांची अलोट गर्दी सालाबाद प्रमाणे याही वर्षी महिला भाविकांनी श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे ऋषीपंचमी निमित्त सप्तऋषींचे पूजन व श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगडाचे प्रथम व द्वितीय चंद्रेश्वर बाबा यांच्या समाधीचे पूजन केले. प्राचीन काळापासून श्रीक्षेत्र चंद्रेश्वगड हा असंख्य ऋषीमुनींची तपश्चर्या करण्याची पावन भूमी असल्याकारणाने या परम पावन गडावर ऋषिपंचमीचे एक अनोखे असे आध्यात्मिक महत्त्व आहे. भगवान चंद्रदेव यांची तपोभूमी व महान ऋषी जमदग्नी व भगवान परशुराम
यांच्या वास्तव्याने ही भूमी परम पावन भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी केलेली साधना व व्रत तात्काळ फळाला येते अशी धारणा भाविकांची असल्यामुळे या पुण्य भूमीवर ऋषिपंचमी निमित्त महिला भाविकांची अलोट गर्दी दरवर्षी होत असते. ऋषिपंचमी निमित्त चंद्रेश्वरगडाचे महंत स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराच्या वतीने येणाऱ्या महिला भाविकांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली. व चांदवड पोलीस स्टेशनच्या वतीने चांगल्या स्वरूपातील पोलीस बंदोबस्त देण्यात आला.
- येवल्यात श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) निमित्त श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर (विंचुर रोड, येवला) येथे श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्रीं ना महावस्त्र अर्पण आणि महाअभिषेक पूजेने झाली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्रीं ची बावन्नी, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत हिरालाल नारायणसा बाकळे, दिगंबर नारायणसा बाकळे व समस्त बाकळे परिवार (येवला) यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास वक्रतुंड बिल्डर्स & डेव्हलपर्स (येवला व कोपरगाव) आणि इंजि. ऋषिकेश हिरालाल बाकळे यांचे सहकार्य लाभले. श्री गजानन महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- ऋषिपंचमी निमित्ताने आज मार्कंडेश्वर पर्वतावरती महिला भाविकांची मोठी गर्दी ऋषिपंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर ती महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती - पुराणात सांगितले आहे की ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी ज्या शेतात बैलाने शेतीमध्ये राबलेले किंवा बैलाच्या साह्याने केलेली शेती त्याच्यातून निघालेले उत्पन्न हे ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांना खाता येत नाही त्या दिवशी सुवासिनी महिला व इतर महिला या सकाळी उठल्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करून आल्यानंतर त्या महिला ज्या ठिकाणी ऋषी चे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात . सप्तऋषीपैकी नाशिक जिल्ह्यात करंजी येथे कर्दम ऋषी मार्कंडेश्वर पर्वतावर ती मार्कंड ऋषी त्रंबकेश्वर येथे गौतम ऋषी व मनमाड जवळ अगस्ती ऋषी हे असून या ठिकाणी आज कृषी पंचमी निमित्ताने महिलांनी मोठी गर्दी केली होती . मार्कंडेश्वर पर्वतावरती दर्शनासाठी धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व नगर येथील महिला भाविक ह्या दर्शनासाठी आल्या होत्या . यावेळेस कळवण पोलीस स्टेशन व दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ही ठेवला होता .1
- लाडगाव–हट्टी रस्ता ‘मरणाच्या दारात’; फरशी पुलाची अवस्था ‘आज मरू की उद्या?’ जीवघेण्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा कशासाठी? लाडगाव–हट्टी रस्ता ‘मरणाच्या दारात’; फरशी पुलाची अवस्था ‘आज मरू की उद्या?’ जीवघेण्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा कशासाठी? प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल सुरगाणा तालुक्यातील लाडगाव–हट्टी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या मार्गावरील फरशी पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. पुलाची झालेली झीज पाहता हा पूल ‘आज मरू की उद्या?’ अशा अवस्थेत पोहोचला असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, फरशी पुलाचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत असून, पुलावरून पाणी वाहत असताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गाचा वापर परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारक मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र रस्त्याची आणि पुलाची अवस्था पाहता प्रशासन एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून फरशी पुलाची दुरुस्ती अथवा आवश्यक ठिकाणी नव्याने बांधकाम करावे, तसेच रस्त्याची कायमस्वरूपी डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.1
- आईच्या आरोग्यासाठी १२ ज्योतिर्लिंग धावती यात्रा करणाऱ्या मोनूचे त्र्यंबकेश्वर मध्ये उत्स्फूर्त स्वागत त्र्यंबकेश्वर :- आपल्या आईच्या उत्तम आरोग्यासाठी नवस करत देशातील १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प केलेला बिहारमधील धावपटू मोनू सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. मोनूने आतापर्यंत पायांनी तब्बल ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला असून, त्याने आतापर्यंत ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले आहे. आपल्या या प्रेरणादायी प्रवासादरम्यान मोनूचे आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले. त्यावेळी त्याचे उत्स्फूर्त आणि जोरदार स्वागत करण्यात आले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास मोरे आणि योगेश महाले यांनी मोनूचे स्वागत करून त्याच्या या अनोख्या संकल्पाला शुभेच्छा दिल्या. यानंतर मोनूने Sapkal Knowledge Hub येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी देशभरात विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेले विविध प्रश्न, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता तसेच MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या यावरही त्याने भाष्य केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोनूने मेहनत, सातत्य आणि ध्येयावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचेही यावेळी व्यक्त करण्यात आले. मोनूचा हा प्रवास केवळ धार्मिक यात्रा नसून आईच्या आरोग्यासाठी केलेला संकल्प, श्रद्धा, जिद्द, शारीरिक क्षमता आणि देशभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश देणारा ठरत आहे. महाराष्ट्रात मोनू चर्चेचा विषय आईच्या आरोग्यासाठी नवस करून १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन निघालेला बिहारचा मोनू सध्या महाराष्ट्रात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास आणि ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करून त्याची ही प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे.1
- नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा नंदुरबार येथील श्रीमती डीआर हायस्कूल येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.1
- येवला शहरातील नांदगाव रोड लगतच्या वसाहतीत संशयास्पद हालचालींमुळे कुंटणखाना सुरू असल्याचा संशय स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला येवला शहरातील नांदगाव रोड लगतच्या वसाहतीत संशयास्पद हालचालींमुळे कुंटणखाना सुरू असल्याचा संशय स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असले तरी नेमकी काय कारवाई झाली, हे अद्याप अस्पष्ट आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे आदेश दिलेले असताना, शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने चालतो, असा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.1
- इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए1
- मोतीवाला कॉलेजच्या पाठीमागील हनुमान नगर परिसरात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू मोतीवाला कॉलेजच्या पाठीमागील हनुमान नगर परिसरात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कमळाबाई अनाजी वळवी (६५) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात त्यांच्या मुलावरच संशयाची सुई असून, गंगापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा संशय आहे. सकाळी परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची कार्यवाही केली. या प्रकरणात मुलगा तानाजी अनाजी वळवी (४०) याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. घटना घडली त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली दरम्यान, कमळाबाई वळवी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यांच्यावर हल्ला झाला होता का, तसेच या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास गंगापूर पोलीस करीत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुलावरच आईच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने या घटनेने हनुमान नगर परिसरात खळबळ उडाली असून, सून आणि मुलाच्या झालेल्या वादा नंतरच ही घटना घडल्याचे देखील बोलले जात आहे दरम्यान पोलिसांच्या तपासानंतर या संशयास्पद मृत्यूमागचे नेमके सत्य समोर येणार आहे.4