*भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांवर थेट संवाद उच्चस्तरीय समितीसमोर पूर्व विदर्भातील परीक्षार्थींनी मांडल्या अडचणी, अपेक्षा व सूचना* *वर्धा न्यूज़* नागपूर, दिनांक. 16 .9.2026. रोज़ी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासह राज्यातील शासकीय भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उमेदवारकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने बुधवारी पूर्व विदर्भातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. सदर येथील जिल्हा नियोजन भवनात उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्ष तथा अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा आणि इतर सदस्यांनी हितधारकांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. या संवाद कार्यक्रमाला पूर्व विदर्भातील स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक व नागरिक उपस्थित होते. राज्याचे पोलीस महासंचालक तथा समितीचे सदस्य सदानंद दाते, समितीचे सदस्य सचिव तथा पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, आयआयटी मुंबईचे प्रा. श्यामप्रसाद करगड्डे, नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी प्रत्यक्ष तर इलेक्ट्र्रॅानिक्स, माहिती-तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह तसेच संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित भोसले दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. राज्य सरकारने भरती परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी दूर करून उमेदवारांना अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने परीक्षा देता यावी, तसेच भरती प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी विविध घटकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागपुरात विद्यार्थ्यांसोबत हा संवाद आयोजित करण्यात आला. एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. परीक्षांचे वेळापत्रक, परीक्षा केंद्रांची उपलब्धता, अभ्यासक्रमातील बदल, प्रश्नपत्रिकेची गुणवत्ता, परीक्षा आयोजनातील पारदर्शकता, निकाल जाहीर करण्यास लागणारा कालावधी तसेच भरती प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत विद्यार्थ्यांनी सूचना केल्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या अपेक्षाही यावेळी उच्चस्तरीय समितीसमोर मांडण्यात आल्या. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या अडचणी, परीक्षा केंद्रांचे नियोजन, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, उमेदवारांना वेळेवर माहिती उपलब्ध करून देणे आदी विषयांवरही विद्यार्थ्यांनी चर्चा केली. परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही विद्यार्थ्यांकडून सूचना घेण्यात आल्या. उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. केवळ प्रशासकीय पातळीवरून परीक्षा पद्धतीत बदल करण्याऐवजी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे अनुभव आणि प्रत्यक्ष अडचणी समजून घेण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वाचा ठरला. नागपूरसह पूर्व विदर्भातील विविध भागांतून मोठ्या संख्येने विद्यार्थी या संवाद कार्यक्रमासाठी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांनी परीक्षा पद्धती अधिक कार्यक्षम आणि उमेदवारांना अनुकूल करण्यासाठी आपल्या सूचना मांडल्या. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांची उच्चस्तरीय समितीने नोंद घेतली.

- वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .1
- विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.1
- दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! नागपूर | प्रतिनिधी: CJP चे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आज नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देत तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन केले. दीक्षाभूमीवरील या भेटीदरम्यान त्यांनी तथागत बुद्धांच्या विचारांना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन केले. या पवित्र भूमीतून क्रांतिकारी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आपल्या सामाजिक कार्याला नव्या जोमाने सुरुवात करण्याचा संकल्प त्यांनी केला. दीक्षाभूमी ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवमुक्तीच्या चळवळीचे प्रेरणास्थान आहे. या भूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा घेतली. तथागत गौतम बुद्धांचा धम्म, करुणा आणि समतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा विचार यांना केंद्रस्थानी ठेवून पुढील कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.1
- ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews1
- गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप। 2 रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए। 2 घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा। गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप। 2 रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए। 2 घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा।1
- १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;1
- इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें। इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।1