शेतकऱ्यांना दिलासा : काँग्रेस नेते धनंजय देशमुखांच्या लढ्याला यश सुटाळा बु. येथील २५४.४६ हेक्टर जमीन जिगावच्या आरक्षणातून बाहेर खामगाव : औद्योगिकीकरणाच्या नावाखाली वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या भूसंपादन प्रक्रियेमुळे अडचणीत सापडलेल्या सुटाळा बु. येथील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त खामगाव औद्योगिक क्षेत्राच्या प्रस्तावित विस्तारासाठी संपादनाच्या छायेखाली असलेली २५४.४६ हेक्टर खासगी जमीन जिगाव उपसा सिंचन प्रकल्पाच्या आरक्षणातून अधिकृतपणे वगळण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या निर्णयामुळे संबंधित भूसंपादन प्रस्ताव रद्द होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, काँग्रेस नेते धनंजय देशमुख यांच्या दीर्घकालीन लढ्याला महत्त्वपूर्ण यश मिळाल्याचे मानले जात आहे. सुटाळा बु. (ता. खामगाव) येथील ही जमीन २९ फेब्रुवारी २००६ रोजीच्या अधिसूचनेनुसार जिगाव उपसा सिंचन प्रकल्पासाठी अंशतः आरक्षित असल्याची नोंद सातबारा उताऱ्यावर होती. मात्र, महसूल व वनविभाग मंत्रालयाच्या शासन निर्णय क्रमांक आरपीए-२०२२/प्र.क्र.०९/२-अ (दि. १८ जानेवारी २०२२) नुसार, जिगाव प्रकल्पासाठी आवश्यक नसलेले क्षेत्र आरक्षणातून वगळण्याचे अधिकार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांना देण्यात आले आहेत. या अधिकारानुसार ८ सप्टेंबर २०२२ रोजी कार्यकारी अभियंता, जिगाव उपसा सिंचन विभाग व जिगाव प्रकल्प पुनर्वसन विभाग, खामगाव यांना पत्र पाठवून सुटाळा बु. येथील संबंधित गट क्रमांकांचे आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अंतर्गत अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेत कलम ३२(२) अंतर्गत नोटीस कालावधीत तब्बल ३८ हरकती दाखल झाल्या होत्या. मात्र, जिगाव प्रकल्पाच्या आरक्षणातूनच जमीन वगळण्यात आल्याने सदर भूसंपादनाची गरज अद्याप कायम आहे की नाही, याचा नव्याने विचार करणे अपरिहार्य ठरले आहे. भूसंपादनाची आवश्यकता नसल्यास संबंधित प्रस्ताव रद्द करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरू असून, या घडामोडीमुळे काँग्रेस नेते धनंजय देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, खामगाव यांनी ६ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अकोला यांना पत्र पाठविले. आरक्षणामुळे संबंधित भूधारकांच्या जमिनी अनेक वर्षांपासून लागवडीपासून वंचित राहिल्याने शेती उत्पादनावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी, भविष्यात नुकसानभरपाईसाठी दिवाणी दावे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाचा वेळ व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रकरणात तातडीने अंतिम निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. भूसंपादन नोटिशींविरोधात दाखल झालेल्या ३८ हरकतींमधून शेतकऱ्यांमधील तीव्र नाराजी स्पष्ट झाली होती. अवाजवी आणि गरज नसलेल्या भूसंपादनाविरोधात गावकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचे चित्र या प्रक्रियेत दिसून आले.

- घाटपुरी जलकुंभाच्या मुख्य व्हॉल्व्हचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर; उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता खामगाव:शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत करणाऱ्या घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम आज, १० जानेवारी २०२६ रोजी प्रशासनातर्फे अत्यंत वेगाने हाती घेण्यात आले आहे. खामगाव नगर परिषदेचे पाणी पुरवठा सुपरवायझर सुरजसिंह ठाकुर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली हे काम युद्धपातळीवर सुरू असून, उद्यापासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीचा मुख्य व्हॉल्व्ह तांत्रिक बिघाडामुळे नादुरुस्त झाला होता. परिणामी, संबंधित भागातील पाणी वितरणात अडथळा निर्माण झाला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत दुरुस्तीचे नियोजन केले. आज दिवसभर सुरू असलेल्या या दुरुस्ती कामामुळे पाणीपुरवठा बंद असला तरी, रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सर्व तांत्रिक बाबींची तपासणी झाल्यानंतर उद्या (११ जानेवारी) पासून संबंधित भागातील पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत होण्याची दाट शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. नगर परिषदेच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.2
- जलगांव जामोद नाला करने1
- Post by Peoples News 241
- राजमाता पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज1
- जाफ्राबाद भारज येथे मांस पकडले1
- मुऱ्हा देवी फाट्याजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. MH 27 BX 3694 व MH 27 X 7292 या क्रमांकाच्या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमी व नुकसान याबाबतची अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. पुढील तपास सुरू आहे. #accident #NewsUpdate #viralpost #anjangaonsurji #daryapur #जागरमराठी1
- Post by YUVA JALNA NEWS1
- प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर कारवाई खामगाव : प्रतिबंधित व घातक नायलॉन ने मांजाची विक्री करणाऱ्या एका युवकास शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी मोची गल्ली परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० रिल नायलॉन मांजा असा सुमारे ६,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोची गल्ली भागात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती खामगाव शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरात छापा टाकला.चेतनमुकेश चव्हाण (२७, रा. मोची गल्ली, खामगाव) हा नायलॉन मांजाची विक्री करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या १० रिल जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत कलम १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत श्रींगारे, हेडकॉन्स्टेबल प्रदीप मोटे, तसेच रवींद्र कजर, गणेश कोल्हे, सागर भगत, राहुल थारकर, अंकुश गुरुदेव व अमर ठाकूर यांनी केली.1