कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील ग्रामसेवक कोरे यांनी जेम (GeM) पोर्टलवरून केलेल्या सिमेंट काँक्रेटच्या बेंच खरेदीत मोठा भ्रष्टाचार आणि काळाबाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाजारभावानुसार केवळ ३,००० रुपये किंमत असणारे बेंच जेम पोर्टलवरून एकास ९,९९९ रुपये या दराने खरेदी करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण ९ बेंच तब्बल ८९,९९१ रुपयांना खरेदी करण्यात आले असून, या वस्तूंना सोन्याचे किंवा चांदीचे पॉलिश केले आहे का, असा उपरोधिक सवाल करत गटविकास अधिकारी (बीडीओ) कळंब व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणी सुनावणी झाली असली तरी आजपर्यंत कोणतीही पारदर्शक कारवाई झालेली नाही. त्यामुळे बीडीओ कळंब यांनी जेम पोर्टलच्या नावाने चाललेला हा काळाबाजार बंद करून शासन व जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी, दोषींवर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी आणि बाजारभावानुसारच खरेदी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील ग्रामसेवक कोरे यांनी जेम (GeM) पोर्टलवरून केलेल्या सिमेंट काँक्रेटच्या बेंच खरेदीत मोठा भ्रष्टाचार आणि काळाबाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाजारभावानुसार केवळ ३,००० रुपये किंमत असणारे बेंच जेम पोर्टलवरून एकास ९,९९९ रुपये या दराने खरेदी करण्यात आले आहेत. अशा प्रकारे
एकूण ९ बेंच तब्बल ८९,९९१ रुपयांना खरेदी करण्यात आले असून, या वस्तूंना सोन्याचे किंवा चांदीचे पॉलिश केले आहे का, असा उपरोधिक सवाल करत गटविकास अधिकारी (बीडीओ) कळंब व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणी सुनावणी झाली असली तरी
आजपर्यंत कोणतीही पारदर्शक कारवाई झालेली नाही. त्यामुळे बीडीओ कळंब यांनी जेम पोर्टलच्या नावाने चाललेला हा काळाबाजार बंद करून शासन व जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी, दोषींवर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी आणि बाजारभावानुसारच खरेदी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट इशारा देत स्पष्ट केले आहे की, जर आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्हाला हातात कुऱ्हाड घ्यावी लागेल.1
- शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या माध्यमातून ५६ लाख शेतकऱ्यांना एकूण ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.1
- आता या देशावर 'इंग्रज तरी बरे होते' असे म्हणण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले आहे. साप्ताहिक समृद्ध कर्जतचे राशीन प्रतिनिधी जावेद काझी यांनी हे वृत्त दिले आहे.1
- सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यासह भीमा नदीकाठच्या परिसरासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नीरा नदीतून सोडण्यात आलेले पाणी सध्या भीमा नदीमार्गे अरळी बंधाऱ्यात दाखल झाले असून, बंधारा आता भरू लागला आहे. पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्यामुळे शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि भूजल पातळी सुधारण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1
- जालना जिल्ह्यातील मंठा येथील विवेकानंद सेवा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचा उत्साहात जागर करण्यात आला.1
- साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी जालन्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक लहुजी सेना, जालना जिल्ह्याच्या वतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, भाजप नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत या सर्व आयोजनाची माहिती दिली. या जयंती महोत्सवानिमित्त शहरात रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप आणि भव्य मोटारसायकल रॅली यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी हे सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.1
- काँग्रेस प्रभारी रेहाना रियाज चिस्ती यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली.1
- श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत राशीन शहर व परिसरात सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत कडकडीत बंद पाळण्यात आला. विद्यार्थ्यांवर आणि इतर नागरिकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या या बंदला राशीनमध्ये नागरिकांसह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात राशीनमधील व्यापारी व ग्रामस्थांनी स्वतःहून व्यवहार बंद ठेवून या निषेध आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या बंद व निषेध मोर्चामध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश साळवे, कर्जत तालुकाध्यक्ष पोपटराव शेटे, राशीन शहराध्यक्ष दादासाहेब आढाव, शहर उपाध्यक्ष दत्तात्रय सोनवणे, कायदेशीर सल्लागार ॲड. शुभम पानसरे, महासचिव अनिल आढाव, सहसल्लागार ॲड. आकाश साळवे आणि शहर संघटक मुकुंद आढाव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाला माजी सरपंच रामकिसन साळवे, गणेश कदम, अनिल लष्करे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सुभाष जाधव, बहुजन समाज पार्टी, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड आणि छत्रपती शासन महाराष्ट्र राज्य ग्रुप यांसह विविध पक्ष व सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा देऊन निषेध मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. मोर्च्यादरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर प्रशासनाने केलेला लाठीचार्ज हा लोकशाहीचा गळा आवळणारा प्रकार असून, या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. संपूर्ण राशीन शहर परिसरात हा बंद अत्यंत शांततेत व कडकडीत पार पडला.2
- जालना शहरातील झोपडपट्टीधारकांना पीआर कार्ड (प्रमाणपत्र) मिळवून देण्याचे दिलेले आश्वासन अखेर पूर्ण झाले आहे. मुक्तेश्वर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' अभियानात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना पीआर कार्डांचे वितरण करण्यात आले. हे पीआर कार्ड वाटप शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते पार पडले. आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच या प्रयत्नांना यश आले असून त्यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण केला आहे. रविवारी दिनांक २६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, या समाधान शिबिरादरम्यान उपस्थित असलेल्या लाभार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.1